नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
नमस्कार मित्रांनो आपण आजच्या लेखातून कोकण भागातील 10 पर्यटन स्थळांचा आढावा घेणार आहोत. साधारणता कोकणात जाण्यासाठी ऑक्टोबर ते मे या महिन्यात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. एप्रिल आणि मे या महिन्यात कोकणात आंब्याचा आनंद ही घेता येतो. रायगड, रत्नागिरी या दोन जिल्ह्यात जास्त पर्यटक येत असतात.
नंबर.1 – तारकर्ली बीच : मित्रांनो कोकणात आल्यानंतर सर्वात आधी ओढ लागते ती समुद्र किनाऱ्याची आणि कोकणामध्ये तारकर्ली नावाचा हा समुद्रकिनारा खूपच प्रसिद्ध आहे आहे, कारण नुकतीच या समुद्र किनाऱ्यावर स्कुबा डायविंग आणि विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटी सुरू केलेले आहे. तारकर्ली बीच वर तुम्हाला डॉल्फिन बघण्याचा आनंद घेता येईल. या बीचवर जाण्यासाठी मडगाव स्टेशनवरून रिक्षा किंवा बसची सोय करता येईल.
नंबर.२- लोकमान्य टिळक हाऊस : लोकमान्य टिळक म्हटले की एक रुबाबदार मराठी व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर येईल लोकमान्य टिळकांचे घर रत्नागिरीमध्येच आहे. आजही अनेक पर्यटकांसाठी हे घर उघडे आहेत जर तुम्ही सहलीसाठी कोकणात जाणार असाल तर या पर्यटन स्थळाला भेट द्या, हे जर पाहिल्यानंतर तुम्हाला लोकमान्य टिळकांचा अभिमान वाटेल.
नंबर.३- श्रीवर्धन बीच : अतिशय शांत आणि रमणीय असणारा हा समुद्रकिनारा त्याच्या स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध किनारा पैकी हा एक समुद्रकिनारा आहे, त्याच्यात तुम्हाला समुद्र लाटांचा आनंद घेता येईल या ठिकाणी सूर्यास्ताच्या वेळी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते श्रीवर्धनमधील लक्ष्मीनारायण मंदिर खूपच प्रसिद्ध आहे.
नंबर.४- थिबा राजवाडा : कोकणामध्ये थिबा राजवाडा हा रत्नागिरीमध्ये आहे. या ठिकाणी पर्यटनासाठी समुद्रकिनार्यापासून राजवाडा पर्यंत सर्व काही आहे या राजवाड्यात प्रादेशिक वस्तुसंग्रहालय देखील आहे पूर्वी प्रह्मदेशाच्या थिबा मिल या राज्याला नजर कैदेत ठेवण्यात आले होते. थिबा राजवाडा हा ब्रिटिशांनी बांधलेल्या असून आता ते एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
नंबर.५- किहीम बीच समुद्र किनारा : अलिबाग मध्ये असणारा हा कोकणातील स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नऊ दलासाठी हा समुद्रकिनारा महत्त्वाचा मानण्यात आला होता आता या समुद्र किनार्यावर अनेक पर्यटक फिरायला येत असतात. या समुद्रकिनाऱ्यावर तुम्हाला पांढरे वाळू मध्ये फिरण्याचा आनंद घेता येईल.
नंबर.६- मुरुड जंजिरा : अलिबाग मधील मुरुड जंजिरा हे ठिकाण कोकणातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. रायगड जिल्ह्यातील हा किल्ला महाराष्ट्र मध्ये खूपच प्रसिद्ध आहे हा किल्ला चारही बाजूंनी आरबी समुद्राने वेढलेला आहे. जंजिरा याचा अर्थ समुद्राने वेढलेला असाही होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा किल्ला शेवटपर्यंत अजेय राहिला.
नंबर.७- आरे वारे समुद्रकिनारा : आरेवारे समुद्रकिनारा रत्नागिरी मधला आरे वारे बीच अतिशय स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा आहे. या ठिकाणी तुम्हाला मनाला मिळणारी शांतता आणि स्वच्छ पणा हा आकर्षणाचा विषय आहे. दोन्ही बाजूला डोंगर आणि मध्ये समुद्र असा नजारा तुम्हाला इथे पाहायला मिळेल या ठिकाणी बरेच पर्यटक दिवसेंदिवस या पर्यटनस्थळाला भेट देतात.
नंबर.८- रायगड किल्ला : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील राजधानी म्हणून ओळखला जाणारा रायगड किल्ला महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ल्या यापैकी एक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा भाग कोकण पट्ट्यात येतो इतक्या वर्षानंतरही महाराष्ट्राने रायगड किल्ल्याची शान जपून ठेवली आहे दरवर्षी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला मोठा सोहळा साजरा करण्यात येतो.
नंबर.९- दापोली : मुंबई पासून फक्त काही अंतरावर असणारे हे ठिकाण कोकणाचे हृदय म्हणून ओळखले जाते. दापोलीला तुम्हाला निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेता येईल निसर्गाचे वरदान लाभलेल्या या दापोली ठिकाणाला दररोज कितीतरी पर्यटक येत असतात मित्रांनो तुम्ही कधीही कोकण सहल काढली तर नक्की या पर्यटन स्थळांना भेट द्या.
नंबर.१०- गणपतीपुळे : कोकण म्हणजे एक प्रकारचे गणपतीपुळेच झाला आहे, सोळाशे वर्षापूर्वीचे स्वयंभू गणपती मंदिर हे येथील वैशिष्ट्य आहे हा समुद्रकिनारा कोकणात खूपच प्रसिद्ध आहे. याठिकाणी गणपती मंदिरात या कारणाने या ठिकाणाला पवित्र मानला जात तेथे जाण्यासाठी तुम्हाला मुंबई सेंट्रल वरून इस्की व ट्रेन ची सोय आहे. तर मित्रांनो ही होती कोकण भागातील 10 पर्यटनस्थळे तुम्ही यामधील कोणकोणती पर्यटन स्थळांना भेट दिली आहेत त्या आम्हाला कमेंट करून कळवा.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.