महाराष्ट्रातील सर्वात मोठे उपयुक्त जलसाठा असलेली 5 धरणे ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

उपयुक्त जलसाठा असलेले महाराष्ट्रातील 5 व्या क्रमांकाचे धरण आहे इसापूर धरण. हे धरण भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. हे धरण पैनगंगा नदीवर बांधलेले आहे. या धरणाची उंची 47 मीटर म्हणजे 187 फूट आहे. या धरणाची लांबी 4120 मीटर म्हणजेच 13517 फूट एवढे आहे.

या धरणाचा उपयुक्त जलसाठा 33.58 टी.एम.सी., या धरणाचा एकूण जलसाठा 44.28 टी.एम.सी, या धरणाचे बांधकाम 1971 ते 1982 साली झाले. या धरणाला 15 दरवाजे आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा उपयुक्त जलसाठा असलेले 4 थ्या क्रमांकाचे धरण आहे तोतलाडोह धरण हे धरण महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्य ह्या दोन राज्यांच्या सीमेवर आहे.

महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात तसेच मध्यप्रदेश राज्यातील छंदवाडा जिल्ह्याच्या सीमेवर आहे. हे धरण रामटेक शहराच्या जवळ आहे. या धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग हा संपूर्ण महाराष्ट्रात येत असल्याने हे धरण महाराष्ट्रासाठी अतिशय उपयुक्त आहे. हे धरण पेंच नदीवर बांधण्यात आलेले आहे. या धरणाची उंची 74.5 मीटर म्हणजेच 244 फूट इतकी आहे. या धरणाची लांबी 680 मीटर म्हणजेच 2230 फूट इतकी आहे.

या धरणाचा उपयुक्त जलसाठा 38.53 टी.एम.सी,, या धरणाचा एकूण जलसाठा 43.83 टी.एम.सी. धरणाची वीजनिर्मिती क्षमता 160 मेगा व्हॉट इतकी आहे. हे धरण 1989 साली बांधून पूर्ण झाले. महाराष्ट्रातील 3 ऱ्या क्रमांकाचे उपयुक्त जलसाठा असलेले धरण म्हणजेच उजनी धरण उजनी धरणाचा संपूर्ण पाणीसाठा उपयुक्त पाणीसाठ्या पेक्षा दुप्पट आहे.

यामुळे बऱ्याचवेळा हा प्रश्न असतो 123 टी.एम.सी पाणीसाठा असून हे धरण महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे धरण कसे? याचे उत्तर असे आहे की पाणीसाठ्या एकूण पेक्षा त्याच्या उपयुक्त साठा त्यावरून धरणाचा नंबर आणि त्याचे महत्व ठरते. उजनी धरण हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील तेमबुर्णी तसेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरा शेजारी आहे. हे धरण भीमा नदीवर बांधलेले आहे. हे धरण 1969 ते 1989 साली बांधण्यात आले. या धरणाची उंची 56.4 मीटर म्हणजेच 156 फूट इतकी आहे.

या धरणाची लांबी 2535 मीटर म्हणजेच 8314 फूट एवढी आहे. या धरणाचा उपयुक्त जलसाठा 53.57 टी.एम.सी. आहे, धरणाचा एकूण जलसाठा 110.89 टी.एम.सी आहे. या धरणाची वीजनिर्मिती क्षमता 12 मेगा व्हॉट आहे. या धरणातून 2 कॅनॉल जातात, त्यात डावा कॅनॉल 126 कि.मी. वाहत जातो, तर उजवा कॅनॉल 112 कि.मी. वाहत जातो. हे उजनी धरण बांधल्यानंतर ह्या पाण्याच्या पाणलोट क्षेत्रात एक प्राचीन मंदिर होते त्याचे नाव पळसनाथ हे मंदिर ह्या पाणलोट क्षेत्रात पूर्णपणे बुडून गेलं.

धरणातील पाणीसाठा कमी झाला की दर्शन होते ते पळसनाथाच. हे अतिशय प्राचीन मंदिर असल्याने ह्या मंदिराचे दर्शन होऊ लागल्यावर अनेक पर्यटक, भाविक, मंदिरात गर्दी करतात. धरणाच्या पाणीसाठ्याला “यशवंत सागर” असे म्हणतात. या धरणाला एकूण 41 दरवाजे आहे. या धरणातील पाणी पुणे शहरातील वाहणाऱ्या मुळा-मुठा, तसच आजूबाजूच्या परिसरातील अनेक नद्यांच्या मधून येते. या धरणाचा जलसाठा प्रचंड मोठा आणि खोल असल्यामुळं या धरणामध्ये मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.

महाराष्ट्रातील 2 ऱ्या क्रमांकाचे उपयुक्त जलसाठा असलेले धरण जायकवाडी धरण हे धरण महाराष्ट्रातील अहमनगर तसेच औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमेवर पैठण या गावाशेजारी अवघ्या 2 की.मी अंतरावर हे धरण आहे. या धरणाचा विसर्ग औरंगाबाद मध्ये असल्याने औरंगाबाद जिल्ह्याला फारच महत्त्व प्राप्त झाले आहे. हे धरण गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले आहे. धरणाची उंची 41.30 मीटर म्हणजेच 135 फूट इतकी आहे, तसेच या धरणाची लांबी 9998 मीटर म्हणजेच 33802 फूट इतकी आहे.

या धरणाचा उपयुक्त जलसाठा 76.63 टी.एम.सी. आहे, तर एकूण जलसाठा 102.73 टी.एम.सी. इतका आहे. या धरणाचे बांधकाम 1965 ते 1976 साली पूर्ण झाले. या धरणाला 27 दरवाजे आहे. या धरणाला त्या काळी 4700 कोटी रुपये खर्च आला होता. या धरणाच्या जलाशयाला “नाथसागर” असे म्हणतात. धरणाची वीजनिर्मिती क्षमता 12 मेगा व्हॉट इतकी आहे. या धरणातून 2 कालवे जातात. डावा कालवा 208 किलोमीटर वाहत जातो, तर उजवा कालवा 132 किलोमीटर वाहत जातो.

कोयना हे धरण महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेले पहिल्या क्रमांकाचे धरण आहे. महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्या मध्ये कोयना नगर गावाशेजारी हे धरण वसलेलं आहे. महाबळेश्वर येथे उगम पावलेल्या कोयना नदीवर हे धरण बांधण्यात आलेले आहे. हे धरण शिवसागर या नावाने ओळखले जाते. या धरणाची उंची 103.2 मीटर म्हणजेच 339 फूट इतकी आहे. या धरणाची लांबी 860 मीटर म्हणजेच 2648 फूट इतकी आहे.

या धरणाचे बांधकाम 1954 ते 1967 साली झाले. या धरणाचा उपयुक्त जलसाठा 93.23 टी.एम.सी. आहे, तर एकूण जलसाठा 98.89 टी.एम.सी. इतका आहे. या धरणाला एकूण 6 दरवाजे आहेत. या धरणाचे काम महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्वतः लक्ष देवून पूर्ण करून घेतले. तसेच या धरणाचे उदघाटन स्वतः यशवंतराव चव्हाण यांनीच केले. हे धरण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचे आहे, या धरणावर 4 टप्प्यांवर वीजप्रकल्प उभारण्यात आलेला आहे.

वीजनिर्मिती साठी हे धरण अत्यंत महत्वाचे ठरले, या धरणाची वीजनिर्मिती क्षमता 1960 मेगा व्हॉट इतकी आहे. हे धरण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमिमध्ये असल्यामुळें या धरणाच्या जलाशयाला “शिवसागर” असे म्हणतात. हे धरण सह्याद्री पर्वतरांगा मध्ये असल्यामुळं इथे दरवर्षी खूप पावूस असतो हे धरण दरवर्षी पूर्ण भरून निघते. ह्या धरणाच्या सभोवताली अभयारण्ये आहे. हे धरण व याच्या आसपासचा परिसर पर्यटकांना नेहमी आकर्षित करतो.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.