नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
एखाद्याची स्तुती सगळ्यांसमोर करा पण त्याचे दोष मात्र एकट्यात त्यालाच सांगा : प्रत्येकाला आपली प्रतिमा खूप महत्वाची असते त्यामुळे जर तुम्ही कोणाला त्याचा दोष सगळ्यांसमोर सांगितला तर ती व्यक्ती तुमचा तिरस्कार करायला लागते त्यामुळे चांगले गुण हे सगळ्यांसमोर सांगा मात्र दोष हे व्यक्तीशः सांगावे.
जो मदत करतो त्याला धन्यवाद द्या : आपल्याला अडचणीच्या किंवा गरजेच्या काळात जे कोणी आपल्याला मदत करेल त्यांचे नेहमी धन्यवाद माना. त्यांनी आपल्या गरजेच्या वेळी मदत केलेली असते.
आपली चूक असेल तर माफी मागा : आपल्याकडून काही चूक झालेली असेल तर माफी मागायला कधीच लाजू नये. अहंकार न बाळगता चूक स्वीकारून ती सुधारण्यासाठी प्रयत्न करावे. चूक स्वीकारण्याने आपले नुकसान तर होणार नाहीच मात्र आपल्याला सुधारण्यास नक्की मदत होईल.
तुम्ही एखाद्याकडून उधार घेतलेले पैसे त्याने मागण्या अगोदर परत करा, तीच गोष्ट छत्री,पुस्तक आणि पेनाबाबत सुद्धा : आपली समाजातील किंमत हि आपण आपल्या शब्दाला किती खरे ठरवतो यावर अवलंबून असते त्यामुळे आपण कोणाकडून काही उधार घेतलेले असेल तर ते समोरच्याने मागण्या अगोदर परत करावे जेणेकरून आपल्या अडचणीत ती व्यक्ती पुन्हा मदत करायला विचार करत नाही.
तुम्ही जेवढा मान श्रीमंताला द्याल तेवढाच गरिबाला पण द्या : गरीब असो व श्रीमंत हा प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी सामान असायला हवा. प्रत्येक व्यक्तीचा ह्या जगातला आपला असा १ रोल असतो तो ती व्यक्ती निभावत असते. समोरच्या व्यक्तीची पैशावरून व्यक्तिरेखा बनवू नका. कदाचित आज गरीब असलेली व्यक्ती उद्या तुमच्यापेक्षाही जास्त श्रीमंत झालेली असेल.
आपल्या हाताखालच्या माणसांना तुम्ही किती आदराची वागणूक देता यावर तुमच्या व्यक्तिमत्त्वाची उंची ठरवली जाते. जोपर्यंत तुम्हाला कोणी सल्ला मागत नाही तोपर्यंत कोणालाही स्वतःहून सल्ला देऊ नका. ज्या व्यक्तीला तुमच्या भावनांची कदर नाही त्याच्यासमोर कधीच रडू नका. एखादी व्यक्ती तुम्हाला टाळत असेल तर त्या व्यक्तीच्या सारखे मागे लागू नका कदाचित कदाचित त्या व्यक्तीला त्या वेळेस तुमच्या पेक्षा दुसरे कोणी महत्त्वाचे वाटतं असेल.
आपल्या मित्राविषयी इतर कोणी काही वाईट सांगितलं तर ते मनात ठेवू नका. कोणालाही त्याच्या शारीरिक व्यंगाबाबतीत स्वतःहून विचारू नका त्यांना वाटल तर ते तुम्हाला स्वतःहून सांगतील. माणूस जिवंत असताना त्यांची किंमत करा जिवंतपणी त्यांना गृहीत धरले तर ते सोडून गेल्यावर आयुष्यभर फक्त पश्चाताप व अश्रू सोबत राहतील.
जर तुम्ही कोणाची मस्करी करत असाल आणि त्या व्यक्तीला त्याचा त्रास होत असल्यास ती मस्करी ताबडतोब थांबवा. जेव्हा एखादा त्याच्या मोबाईल मधील फोटो तुम्हाला दाखवतो तेव्हा डावीकडे किंवा उजवीकडे स्क्रोल करू नका, कारण त्यात त्याचे वैयक्तिक फोटो असू शकतात.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.