बचत गट मार्गदर्शन भाग-2 ।। बचत गटाचे नियम? बचत गटासाठी कागदपत्रे? ।। बचत गटाने ठेवायचे नोंदी (आर्थिक रेकॉर्ड) ।। बचत गट फुटण्याचे किंवा बंद होण्याची कारणे जाणून घ्या या लेखातून !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

बचत गटाचे नियम? बचत गटासाठी कागदपत्रे?: आपण बचत गटाविषयी माहिती घेत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण पाहिले आहे की बचत गट म्हणजे काय? आणि बचत गट कसा स्थापन करायचा. या भागामध्ये आपण खालीला मुद्दे पाहणार आहोत. 1. बचत गट स्थापन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे. 2. बचत गटाची वैशिष्ट्ये. 3. बचत गटाचे नियम. 4. बचत गटाने ठेवायचे नोंदी (आर्थिक रेकॉर्ड) 5. बचत गट फुटण्याचे किंवा बंद होण्याची कारणे.

१. बचत गट स्थापन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: १.बँकेचे खाते २.ठराव पत्र ३.गट सभासदांची यादी ४.गटातील सभासदांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि सोबत त्यांचे दोन पासपोर्ट साईज फोटो पण आवश्यक लागते. ५.बचत गटाचे रजिस्ट्रेशन हे आवश्यक नसते जर तुम्हाला भविष्यामध्ये सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असेल तोपर्यंत नाही.

२. प्रथम बघूया बँकेचे खाते कसं ओपन करायचे: बँकेच्या खात्यासाठी सर्वप्रथम आपल्या जवळील बँक शोधायची ती राष्ट्रीयकृत बँका किंवा को-ऑपरेटिव बँक असावी. त्याच्यामध्ये आपल्याला एक अर्ज करत असतो. त्या अर्जाचा मसुदा तयार करायचा आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्रति माननीय शाखाधिकारी त्यांचे नाव. नंतर गटाचे बचत खाते सुरू करण्याबाबत विषय टाकायचा आहे.

आणि अर्जदार म्हणजे तुमच्या गटाचे नाव यायला हवे. पुढे महोदय वरील विषयास अनुसरून आम्ही आपणास विनंती करतो की…….. बचत गट या बचत गटाचे खाते आपल्या बँकेत सुरू करावे पासबुक व चेक बुक देऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती. आपले येथे तुमच्या अध्यक्षांची नावे आणि त्यांची सही येणार आणि पुढे सचिवांचे नाव आणि त्यांची सही सोबत ठराव व नावे म्हणजेच तुमच्या बचत गटातील जेवढे सदस्य आहेत या सदस्यांनी केलेला ठराव व त्यांचे डॉक्युमेंट त्याला जोडून हे अर्ज बँक मॅनेजरला म्हणजे बँकेच्या शाखा अधिकाऱ्याला द्यायचा आहे.

ठराव कसा करायचा: बँकेमध्ये आयडेंटी प्रूफ साठी बचत गटाचा ठराव मंजूर करावा लागतो. त्यासाठी ठरावाचा नमुना: सर्वप्रथम दिनांक टाकायचे आहे. आपल्या बचत गटाचे नाव टाकायचे आहे. आणि ही सभा सर्वानुमते ठराव करण्यात येते की बचत गटाचे खाते ….. या बँकेच्या …. या शाखेत ….या बचत गटाच्या नावाने उघडण्यात यावे.

पुढे सदर खाते दोन प्रतिनिधींच्या संयुक्त सह्यांनी हाताळण्यात यावे म्हणजेच जे कोण सदस्य बँकेचे व्यवहार भविष्यामध्ये बघत असतील तर त्यांच्या नावाने जे काय बँकेचे व्यवहार आहेत ते दोन व्यक्ती येथे बघू शकतील. यानंतर सूचक आणि अनुमोदक ठरवून सही करून हे ठराव पत्र बँकेच्या खात्या सोबत जोडायचे आहे. तुम्हाला सर्व सदस्यांचे डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत. तुमच्या सभासदांची यादी पण महत्त्वाचे आहे.

त्यात सभासदांची माहीती असते. पूर्ण नाव, त्यांचं वय, त्यांच्या शिक्षण आणि व्यवसाय काय करतात व त्यांच्या माहिती समोर त्यांच्या सर्वांच्या सह्या घ्यायच्या. यादी झाल्यानंतर सचिवांची व अध्यक्षांची सही घ्यायची. अशी आपल्याला गट सभासद सुची म्हणजेच बचत गटाची यादी तयार करायची आहे.

३.बचत गटाची वैशिष्ट्ये: १. बचत गटाचे सभासद होण्यासाठी सर्वप्रथम त्या सभासदाला त्याची इच्छा असणे महत्वाचे आहे. जबरदस्तीने त्या गटाचे सभासद करून घेतल्यास आपल्या बचत गटाचा फायदा होण्यापेक्षा तोटाच होईल. २. सर्वांनी मिळून केलेले नियम: सभासद बैठकीला आल्यानंतर ते सर्व मिळून नियम तयार करतात सर्व मिळून आधी केलेले नियम हा बदलू पण शकतात.

म्हणजेच काय ठरावा मध्ये आपण जो काही नियम करत असतो तो नियम सर्वांनी मिळून करायचा असतो आणि तो नियम हा आपण बदलू शकतो. ३. गटामध्ये एका कुटुंबातील एकच सभासद असावा. जर दोन सभासद असल्यास त्यांना एकदम कर्ज देऊ नये. ४. सर्व सभासद एकाच परिसरात होणारे सारखा विचार करणारे आणि सारखे मिळकत म्हणजेच उत्पन्न असणारे असावे जेणेकरून सभासदांमध्ये एक मत एक विचारधारा एकसंधपणा असण्यास मदत होते.

५. गटांमध्ये सर्व सभासद एकत्र पुरुष किंवा स्त्रिया असाव्यात. त्यामुळे निर्णय घेण्यास किंवा बैठकीत बसण्यास सभासदांना संकोच वाटणार नाही. ६. कोणत्याही व्यक्तीने दोन पदावरती काम करू नये. ७. बचत गटांमध्ये संघटन निर्माण करण्यासाठी सर्वांना विचारून निर्णय घ्यावा व प्रत्येकाला मत मांडण्यासाठी वेळ द्यावा.

४.बचत गटाची नियमावली: १.बचत आठवड्याला किंवा महिन्याला करावे आणि बचतीची रक्कम किती असावी असे सर्व नियम सभासदांनी मिळून ठरवावे. २. बचतीच्या रकमेची सक्ती करू नये. आणि बचत नियमित करायची आहे याची सर्व सभासदांना कल्पना द्यावी. ३. पदाधिकारी प्रत्येक वर्षी बदलले पाहिजेत असे नाही परंतु गटातील इतर सभासदांना ही कामकाजाचा अनुभव यावा म्हणून बचत गटांमध्ये बदल करण्यास हरकत नाही. परंतु केलेला बदल हा बँकेत कळवावा.

४. बचतीची रक्कम पदाधिकाऱ्यांकडे द्यावी किंवा त्यांच्याकडे जमा करावी. ५. सर्व सभासदांच्या सोयीने गटाच्या बैठकीची वेळ, ठिकाण आणि तारीख ठरवावी. ६.सर्व सभासदांनी मिळून गटाचे नाव ठरवावे कारण बँकेमध्ये व इतर व्यवहार गटाच्या नावाने होत असतात.

७. शक्यतो पहिले तीन महिने कर्ज व्यवहार करू नये आणि चौथ्या महिन्यापासून कर्ज व्यवहार करावेत कारण आपल्या बचत गटांमध्ये विश्वास निर्माण व्हायला वेळ लागतो आणि एकदा विश्वास निर्माण झाला की कर्ज वाटप करू शकता. ८. कर्जावरील व्याजाचा दर हा दरमहा 2% पेक्षा जास्त नसावा आणि कर्ज किती रकमेची द्यावे?

कर्जाची परतफेड किती हप्त्यात करावी? याबाबत सर्वांनी मिळून निर्णय घ्यावा. ९. सर्व सदस्य बैठकीला हजर असणे गटातील आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. १०. सदस्यांनी वेळेवर कर्ज हप्ता न भरल्यास त्यांच्याकडून दंड आकारण्यात यावा. दंड किती असेल ते सभासदांमध्ये निर्णय घ्यावा.

५.बचत गटाचे काही महत्वाचे नियम: १. सभासद हे बैठकीला हजर असणे आवश्यकच असते. २. सर्व सभासदांनी बैठकीतील बोलणे बैठकीतच सोडावे. त्याबाबत बाहेर कुठेही त्याची चर्चा किंवा वाद करून नये. ३. बहुमताचा मान ठेवावा. ४. कर्ज गटा बाहेरील व्यक्तीला हवे असेल तर त्यांना कर्ज देण्यात येऊ नये. ५. कर्ज निर्णय बहुमताने घ्यावा. ६. बैठकीत जमा झालेली रक्कम दुसऱ्या दिवशी समूहाच्या बँकेच्या खात्यात जमा करावि. ७. जे काही बचत गटाचे व्यवहार असतात ते सर्व व्यवहार चेक ने करावेत.

६.बचत गटाने ठेवायचा नोंदी त्यालाच आर्थिक रेकॉर्ड असेही म्हणतात: बचत गटाचे आपले व्यवहार/हिशोब ठेवण्यासाठी खलील गोष्टींचा समावेश करावा. १. खाता वही- या वही मध्ये गटाने आपल्या प्रत्येक सदस्यांशी केलेल्या सर्व व्यवहार एकत्रितपणे नोंदविला जातो. या वही मध्ये सदस्यांना त्यांच्या बचतीची आणि त्यांनी घेतलेल्या कर्जाची व परतफेड त्याची नोंद होते.

उदाहरणार्थ तुमच्या सभासदाने कर्ज घेतल्यास किती कर्ज घेतलं किंवा कर्जाची परतफेड कधी होणार त्या सर्वांचा हिशोब तुमच्या खाता वही मध्ये असणे आवश्यक असते. २. कर्ज अर्ज व मंजुरी: सदस्यांना समूहाकडून कर्ज पाहिजे असेल म्हणजे सदस्यांना बचत गटाकडून कर्ज पाहिजे असेल अशा सदस्यांना कर्ज मागणीसाठी अर्ज भरावा लागतो. या वही मध्ये कर्जाची रक्कम कर्ज घेण्याचे कारण व कर्ज किती हप्त्यांमध्ये कर्जफेड करणार याची नोंद असते.

३. जमाखर्च व नोंद अहवाल: या अहवालामध्ये बचत गटाचा जमाखर्च आणि शिल्लक निधी चा हिशोब असतो. म्हणजेच तुमच्या बचत गटामध्ये महिन्याला कितीचा निधी येतोय किती खर्च होतात किती जमा होतात असा सर्व हिशोब या जमाखर्च व नोंद अहवालामध्ये असतो.

४.दरमहा अहवाल: हा अहवाल म्हणजे समूहाचे स्थापनेपासून ते महिन्यांपर्यंतच्या आर्थिक व्यवहाराचे हिशोब असतात. या अहवालानुसार गटाची आर्थिक स्थिती कळते. ५. वैयक्तिक पासबुक: सदस्यांचा गटासोबत होणाऱ्या सर्व आर्थिक व्यवहार वैयक्तिक पासबुकात लिहिले जातात. सदस्यांचे बचत, त्याने घेतलेले कर्ज आणि त्यांची परतफेड, भरलेला दंड इत्यादी बाबींची स्वतंत्र नोंद या पासबुक मध्ये असते.

६. बैठक नोंद वही: सभे मध्ये जे निर्णय घेतले जातात त्याची नोंद या वही मध्ये केली जाते. तसेच सभेला हजर असलेल्या सभासदांच्या सह्या त्यावर घेतल्या जातात. गटाने वेळोवेळी केलेल्या सर्व ठरावाची नोंद या वहीमध्ये असते. ७. सभासदांनी बैठकीला बसताना गोल राऊंड मध्ये बसायचे असते.

७. बचत गट फुटण्याची किंवा बंद होण्याचे कारण: १. बचत गटाच्या हिशोबात गडबड असणे. २. नियमित बचत न करणे. ३. दंडाची रक्कम न भरणे. ४.ओळखीच्या सभासदांना कर्ज पुरवठा करून त्यांचा फायदा करणे. ५. निर्णय गटात न करणे. ६.एकमेकावर विश्वास न ठेवणे. ७. एकमेकांचा अनादर अपमान करणे.

८. बाहेरचे व्यक्तींचा बचत गटांमध्ये हस्तक्षेप असणे. ९. सभासदांपैकी एकाची दादागिरी असणे. १०. बैठकी बाहेरचे वाद गटात न आणने. ११. अध्यक्ष व सचिवावर आर्थिक भार पाडणे. १२. सामूहिक जबाबदारी टाळणे. १३. बचत गटाच्या झालेल्या व्यवहाराबद्दल संशय घेणे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.