सोन्याचे दागिने आणि इतर वस्तूंसाठी हॉल मार्किंग म्हणजेच सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र अनिवार्य होणार ।। तुमच्याकडे असलेल्या सोन्याच्या वस्तूंवर हॉलमार्क चा शिक्का नसेल तर काय होईल? ।। सोनार आता फक्त १४, १८ आणि २२ कॅरेटचेच दागिने विकू शकतील ।। या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या सविस्तरपणे या लेखातून !

अर्थकारण बातम्या लोकप्रिय शैक्षणिक

सोन्याचे दागिने किंवा इतर वस्तू घ्यायला कोणाला आवडत नाही. काही जण तर सोन्याची बिस्किटे आणि नाणी यामध्ये गुंतवणूकही करत असतात. आता सोन्याचे दागिने आणि इतर वस्तूंसाठी हॉल मार्किंग म्हणजेच सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र अनिवार्य असणार आहे.

तरच या वस्तू सोनार विकू शकेल. शिवाय सोनार आता चौदा, अठरा आणि बावीस कॅरेट चेच दागिने विकू शकणार आहेत. घाबरू नका हॉलमार्किंग ग्राहकांच्या भल्यासाठीच आहे. पण त्याचा नेमका फायदा काय? आणि आत्ता तुमच्याकडे असलेल्या सोन्याच्या वस्तूंवर हॉलमार्क चा शिक्का नसेल तर काय होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता जाणून घेऊया.

तुमच्याकडे असलेला एखादा सोन्याचा दागिना नीट निरखून पहा. मागच्या बाजूला साध्या नजरेला दिसणारे नाही अशा सूक्ष्म अक्षरात काही आकडे आणि अक्षरे कोरलेली असतील. यातला पहिला असेल ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजे बी आय एस चा लोगो. त्यानंतर दागिन्यात सोन्याचा प्रमाण किंवा शुद्धता नेमके किती आहे? हे दाखवणारा आकडा.

आणि पुढे सोन्याची शुद्धता ज्या केंद्रात तपासण्यात आली आहे. त्या केंद्राचा लोगो. आणि सगळ्यात शेवटी सोनाराचा स्वतःचा लोगो. या चारही गोष्टी तुमच्याकडच्या दागिन्याच्या मागे उरलेल्या असतील. तर समजा सोन हॉलमार्क प्रमाणित आहे. केंद्र सरकारने आता असं हॉलमार्क असलेलं सोनं, खरेदी विक्री करता येईल. असा नियम बनवले आहे.

केंद्रीय ग्राहक सेवा मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली. ग्राहकांची सुरक्षा आणि समाधान याला प्राधान्य देत सोन्याच्या वस्तूंचा होल मार्किंग आम्ही अनिवार्य करत आहोत. सुरुवातीला देशातल्या २५६ जिल्ह्यांमध्ये हा नियम लागू होत आहे. पुढे टप्प्याटप्प्याने देशभर हॉलमार्किंग अनिवार्य होईल. यामुळे ग्राहकांची फसवणूक टाळेल.

सोन्याला उष्णता दिली. की त्याला हवा तो आकार देता येऊ शकतो. दागिनेही असेच घडवले जातात. पण सोने हा धातू नाजूक असल्याने आकार देताना त्याची मजबुती जाते. किंवा ते तुटू शकतात. म्हणूनच दागिने घडवताना त्यात थोडं तांबे मिसळला जाते. खरं तर किती प्रमाणात तांबा मिसळायचं हे प्रमाण ही ठरलेला आहे.

पण अनेकदा सोनार यामध्ये लबाडी करतात. आणि म्हणूनच सोन्याची शुद्धता म्हणजे दागिन्यात किती प्रमाणात सोनं आहे? हे तपासणे महत्त्वाचे ठरते. सोन्या वरचा हॉल मार्कचा शिक्का आणि बरोबर मिळणारे प्रमाणपत्र तुम्हाला नेमकी ही शुद्धता सांगत असतं. आता पर्यंत दागिन्यांचा हॉलमार्किंग अनिवार्य नव्हतं. कारण सोन्याची शुद्धता तपासणाऱ्या पुरेशी केंद्र देशात नव्हती.

पण २०१७ पासून केंद्र सरकारने अशा केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केलेत. आणि या घडीला देशात सोन्याची शुद्धता तपासून ते प्रमाणित करणारी ९४५ केंद्रे आहेत. वर्षभरात १४ कोटी सोन्याच्या वस्तू प्रमाणित करण्याची क्षमता आता भारताकडे आहे. असा दावा सरकारने केला आहे. आणि ही सुविधा उपलब्ध झाल्यावरच हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले.

हॉलमार्किंग चं ग्राहकांना नेमके फायदे कोणते? आणि ते कसे होतात? देशात सध्या चार लाखांच्या वर सोनार आपल्या पेढ्या चालवत आहेत. पण यातल्या फक्त ३५ हजार ८८९ सोनारा या कडेच बी आय एस प्रमाणपत्र आहे. म्हणजे जर ग्राहकांची फसवणूक झाली. तर ते दाद मागणार कशी? कारण तुम्हाला मिळणारी पावतीच मुळी कच्ची आहे. पण हॉलमार्किंग अनिवार्य झाल्यावर हे चित्र बदलेल असे जाणकार सांगतात.

महत्त्वाचं म्हणजे सोन्यात सोनारा कडून होणारी भेसळ थांबेल. आणि ग्राहकांची फसवणूक होणार नाही. सोनार आता १४, १८ आणि २२ कॅरेट चे दागिने विकू शकतील. २०, २३ आणि २४ कॅरेट च्या दागिन्यांचा हॉलमार्किंग मात्र होऊ शकेल. महाराष्ट्रात सध्या १२२ हॉलमार्किंग केंद्र आहे. तर पश्चिम भारतात मिळून एकूण १९९. त्यामुळे महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, जळगाव, पुणे, सातारा, नागपूर अशा सगळ्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य होणार आहे.

सध्या सोन्याचे घड्याळ, फाउंटन पेन, कुंदन पोलकी, जडाव यासारखे काही विशिष्ट दागिने यांना हॉलमार्किंग मधून सूट देण्यात आली आहे. ग्राहकांकडून जुने हॉलमार्क नसलेले दागिने विकत घेण्याची परवानगी मात्र सोनारांना आहे. सोनारांनी हॉलमार्क नसलेले दागिने विकले हे स्पष्ट झालं. तर त्यांच्यावर दागिन्याच्या किमतीच्या पाचपट दंड किंवा एक वर्षांपर्यंतचा कारावास होऊ शकतो. दागिन्यांच्या हॉलमार्किंग साठी नोंदणी करायची असेल. तर ती ऑनलाईन होऊ शकते.

सरकारच्या निर्णयाचे फायदे आणि तोटे समजून घेऊया कमॉडिटी तज्ञ अमित मोडक यांच्याकडून. जे सोनं मिळणार आहे ते शुद्ध मिळावं आणि त्याची खात्री असावी यासाठी हॉलमार्क आहे. हॉलमार्क अस्तित्वात येऊन वीस वर्षे झाली. मँडेटरी किंवा कंपलसरी करायचं हे वीस वर्षे वाट पाहात होते.

आणि ते कंपलसरी झाले. सरकारनं इन्फ्रास्ट्रक्चर वर सर्वात जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी हॉलमार्क सेंटर अनेक ठिकाणी नाही. त्यामुळे ईन्फास्ट्रक्चर उपलब्ध होणं हे खूप महत्त्वाचे आहे. आणि व्यापाऱ्यांना ते सोयीच राहील. व्यापार्यांना आणि ग्राहक दोघांनाही हिताचे आहे.

छोट्या व्यापाऱ्यांना थोड्या सुरुवातीला अवघड जाईल. पण शेवटी शिस्त बद्ध काम कधी ही चांगलं. तुमच्याकडे सध्या असलेले दागिने हे तुम्ही जवळच्या केंद्रात जाऊन प्रमाणित करून घेऊ शकता. आणि हॉलमार्क शिवाय सध्याच्या घडीला ते विकू ही शकता. तेव्हा जर हॉलमार्क नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. पण इथून पुढे मात्र दागिने किंवा इतर सोन्याच्या वस्तू खरेदी करताना हॉलमार्क नक्की तपासा.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.