विधवा पुनर्विवाह आणि वारसा हक्क

कायदा शेती शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

एखाद्या विधवा स्त्रीने पुनर्विवाह केल्यानंतर तिला आपल्या पहिल्या मयत पतीच्या मालमत्तेमध्ये वारसा हक्क मिळू शकतो का?
सर्वसाधारणतः ज्यांना कायद्याची जुजबी माहिती आहे त्यांना जर तुम्ही हा प्रश्न विचारला तर साहजिकपणे याचं उत्तर नकारार्थी येईल. पण जेव्हा असं कोणतही प्रकरण न्यायालयात पोहोचतं तेव्हा त्या प्रकरणातला सगळ्या घटनाक्रम सगळे वस्तुस्थिती आणि त्याच्या अनुषंगाने अस्तित्वात असलेल्या कायदेशीर तरतुदी या दोन्हीचा जेव्हा एकत्रित अभ्यास केला जातो त्याच्या नंतरच एक निष्कर्षावर न्यायालय येतं आणि त्या अनुषंगाने तो निकाल दिला जातो.

तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा जो निकाल दिलेला आहे त्यात विधवा स्त्रीला पुनर्विवाह नंतर पहिल्या पतीच्या मालमत्तेमध्ये वारसा हक्क असतो असा निकाल दिलेला आहे. आता हा निकाल जो आहे हा सर्वत्र लागू होईल का? तर नाही. तर हा निकाल कुठे लागू होईल? तर या निकालासारखी परिस्थिती जिथे उद्भवलेली असेल त्या प्रकरणांमध्ये हा निकाल निश्चितपणे लागू होईल.

एक झालेली केस बघूया. मग आता या प्रकरणाची वस्तुस्थिती काय आहे तर या स्त्रीचे पहिलं लग्न झालं होतं. त्याच्यानंतर त्या स्त्रीचा पहिला पती जो होता त्याचं निधन झालं. त्याच्या निधनानंतर थोडे दिवसांनी तिने दुसरा विवाह केला आणि त्याच्यानंतर मयत पतीच्या मालमत्तेवरून वाद निर्माण झाला आणि त्यामध्ये त्या विधवा स्त्रीने सुद्धा आपला हक्क सांगितला.

तर यामध्ये एखाद्या विधवा स्त्रीला त्या मयत पतीच्या मालमत्तेमध्ये तिच्या पुनर्विवाह नंतर हक्क आहे किंवा नाही याच्याकरता हिंदू सक्सेशन ऍक्ट म्हणजे हिंदू उत्तराधिकार कायदा याचा यथायोग्य तो विचार न्यायालयाने या निकालामध्ये केलेला आहे. या निकालाचा जर घटनाक्रम आपण बघितला तर मगाशी म्हटल्याप्रमाणे तिचा पहिला विवाह झाला, त्याच्यानंतर पहिल्या पतीचे निधन झालं आणि त्याच्या नंतर तिने दुसरा विवाह केला.

आता आपल्या सकसेशन ॲक्ट नुसार कोणत्याही माणसाचा वारसा हक्क कधी अस्तित्वात येतो तर जेव्हा एखाद्या व्यक्तीचे निधन होतं त्या निधनाच्या क्षणी त्याचे जे कोणी वारस असतील त्या सगळ्यांना त्या माणसाचा वारसा हक्क किंवा मालमत्तेमध्ये वारसा हक्क प्राप्त होतो. मग ह्या पार्श्वभूमीवर जर आपण हा घटनाक्रम बघितला तर त्या विधवा स्त्रीला वारसा हक्क कधी प्राप्त झाला तर तिच्या पहिल्या पतीचे निधन झालं तेव्हा.

तेव्हा ती विधवा होती का तर निश्चितपणे होती व त्या पतीचे निधन जेव्हा झालं त्या क्षणी त्या दिवशी ती विधवा होती. त्यामुळे त्या दिवशी तिला वारसा हक्क हा प्राप्त झालेला आहे आणि त्या दिवशी प्राप्त झालेला वारसा हक्क त्याच्यानंतरच्या घटनांमुळे किंवा नंतरच्या पुनर्विवाह मुळे नाहीसा होऊ शकत नाही, असा महत्त्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने या निकालामध्ये दिलेला आहे.

अर्थात आता ती जी विधवा स्त्री आहे तिला तो मालमत्तेमधला वारसा हक्क बाकी वर्ग १ चे जे वारस आहेत त्या सगळ्यांबरोबर समानतेने मिळालेला आहे. म्हणजे त्या मयत माणसाची जर आई असेल आणि ही पत्नी तर दोघांना क्लास वन म्हणजे वर्ग एक वारस असल्यामुळे पन्नास-पन्नास टक्के हक्क किंवा हिस्सा त्या मालमत्तेमध्ये मिळणार आहे.

या निकालातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली जर शिकायची असेल तर ती म्हणजे कोणत्याही ऐकिव बातमीच्या आधारे किंवा कायदेशीर तरतुदीचा वरवर वाचन करून वरवर समजून घेऊन कोणत्याही निष्कर्षावर आपण ताबडतोब येऊ नये किंवा उडी मारू नये. विधवेला मालमत्तेमध्ये हक्क नसतो किंवा विधवेला मालमत्तेमध्ये हक्क असतो किंवा विधवेने पुनर्विवाह केल्याने तिचा पहिल्या पतीच्या मालमत्ते मधील हक्क नाहीसा होतो आहे पटापट निष्कर्ष जे आपल्या ऐकण्यात किंवा वाचनात येतात ते आपण जसेच्या तसे मान्य करू नयेत.

कारण प्रत्येक प्रकरण हे वेगळे असते, प्रत्येक प्रकरणाचा घटनाक्रम, प्रत्येक प्रकरणाची गुणवत्ता वेगळी असते. त्यामुळे तुम्ही जे कायदेशीर तरतूद वाचली किंवा आपल्या कानावर ज्या बातम्या येतात जे विविध निकाला संदर्भात माहिती येते ती जशीच्या तशी सगळ्या ठिकाणी लागू होत नाही, हे आपण कायम ध्यानात ठेवले पाहिजे. म्हणून कोणतही प्रकरण मग ते तुमचं स्वतःचं असो किंवा तुमच्याकडे पक्षकार म्हणून कोणी आणून दिलेल असो त्याच्यावर अभ्यास चिंतन मनन केल्याशिवाय कोणताही अंतिम निष्कर्ष ताबडतोब काढू नये.

त्या पक्षगाराला सल्ला देताना तुम्ही तो सल्ला जरूर द्यावा पण अजून सुद्धा याच्यात काही होऊ शकता का किंवा याचा मी अजून थोडा अभ्यास करतो आणि मला या संदर्भात जर वेगळी काही माहिती मिळाली तर तसं मी पुन्हा आपल्याला कळवतो, असं सांगून ठेवणं हे पक्षकारांच्या आणि वकिलांच्या दृष्टीने निश्चितपणे फायद्याचं ठरतं. याचे दोन फायदे होतात एक म्हणजे त्या पक्षाकाराला त्याच्या केस मध्ये फायदा होतोच पण दुसरं वकील म्हणून आपल्या सुद्धा ज्ञानामध्ये भर पडते,

आपला सुद्धा दृष्टिकोन हा विस्तारत जातो आणि अशा स्वरूपाचे जेव्हा आपण विविध प्रकारचे खटले किंवा निकाल अभ्यास करतो त्याचा आपल्याला आपल्याकडे येणाऱ्या प्रकरणांमध्ये आपल्या पक्षकांरांच्या प्रकरणांमध्ये चिक्कार उपयोग होत जातो. म्हणून जेव्हा कोणतही विशिष्ट प्रकरण तुमच्याकडे येईल तेव्हा त्याच्या अनुषंगाने त्याआधी अशा झालेल्या महत्त्वाच्या निकालांचा अभ्यास हा आपण केला पाहिजे. तो आपल्या पक्षगाराकरता आणि आपल्या स्वतः करता निश्चितपणे फायद्याचा ठरतो.

तूर्तास या निकालातून आपण एवढाच जर बोध घ्यायचा असेल तर एवढा बोध घ्यावा की विधवा स्त्री असेल आणि पती निधनानंतर काही दिवसांनी तिने पुनर्विवाह केला असेल तर पतीच्या निधनाच्या दिवशी तिचा वारसा हक्क जो तिला प्राप्त झालाय तो तिने नंतर केलेला लग्नामुळे नाहीसा होत नाही. तिचा तो वारसा हक्क कायम राहतो. विधवा आणि पुनर्विवाह आणि वारसा हक्क यासंदर्भात महत्त्वाच्या निकालाची माहिती आपण आत्ता पाहिली.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.