तुमच्याकडे जर कोणत्याच प्रकारची शेतजमीन नसेल ।। तुम्ही शेतकरी नसाल ।। आणि तुम्हाला जमीन खरेदी करायची आहे तर ती कोणत्या मार्गाने केली जाऊ शकते याबद्दल महत्वपूर्ण माहिती !

शेती शैक्षणिक

मित्रांनो तुमच्याकडे जर कोणत्याही प्रकारची शेतजमीन नसेल तर ती कशी खरेदी करायची ते आज आपण जाणून घेणार आहोत. यासाठी तीन पर्याय आहेत ते खालील प्रमाणे: 1.तुमच्याकडे शेतजमीन आहे, म्हणजेच तुमच्या आई वडिलांचे नावे शेतजमीन आहे तर त्या दाखल्या च्या मदतीने तुम्ही स्वतःच्या नावावर शेतजमीन खरेदी करू शकता.

दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आई वडिलांच्या नावे शेतजमीन नाही पण तुमच्या सासु सासऱ्यांच्या नावावर शेतजमीन आहे तर तुमच्या बायकोच्या नावावर तुम्ही शेतजमीन ही खरेदी करू शकता. हा झाला पहिला मार्ग.

2.दुसरा मार्ग म्हणजे तुमच्याकडे शेतजमीन होती पण कुठल्यातरी गव्हर्मेंट प्रोजेक्टमध्ये जमीन गेलेली आहे आता दुसरी कुठली शेत जमीन पाहिजे आहे यामध्ये आपण तहसीलदारांकडे अर्ज करू शकतात की, ही आमची पूर्वापार अशी शेतजमीन होती आणि गव्हर्मेंट प्रोजेक्टमध्ये आमची ही शेतजमीन गेलेली आहे.

आणि आता पर्यायी स्वरूपात आम्हाला दुसरी शेतजमीन विकत घ्यायची आहे, तर तसा आम्हाला दाखला देण्यात यावा. तहसीलदार यांच्या कडून तसा दाखला मिळतो आणि त्या दाखल्या च्या साहाय्याने तुम्ही शेतजमीन खरेदी करू शकता.

3.तिसरी गोष्ट म्हणजे काय की माझ्या आईवडिलांचे नाव शेतजमीन नाहीये, माझ्या सासू-सासऱ्यांचा नावाची जमीन नाही आहे, ना माझी कुठली जुनी जमीन आहे, जी आहे ती गव्हनर्मेंट प्रोजेक्ट मध्ये गेलेली आहे, तर तशा केसमध्ये काय करायचं तर त्याला एकच पर्याय आहे तो म्हणजे जमीन N/A करायची.

जागा N/A करून विकत घेणे हा एक कायदेशीर पर्याय आहे ज्यामुळे तुम्ही मोठी जमीन देखील विकत घेऊ शकता, जरी तुमच्याकडे शेतीचा दाखला नसेल तरी तुम्हाला हवी तेवढी मोठी क्षेत्राफळाची जमीन तुम्ही विकत घेऊ शकता, फक्त हा थोडा खर्चिक प्रकार होतो.

तो म्हणजे काय तर सर्वात आधी तुमच्यामध्ये आणि जागा मालकांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे जागेची रक्कम जी आहे ती आधी ठरवून घ्यायला पाहिजे, त्यानंतर जो जागेचा पहिला मालक आहे त्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे त्या N/A जागेसाठी लागणारी कागदपत्रे सुपूर्त करावी लागतात, आणि हे थोडं खर्चिक आहे कारण.

साधारण दोन एकर जमीन असेल तर एक लाख रुपये च्या आसपास त्याला खर्च येतो हा खर्च अतिरिक्त खर्च आहे. N/A करताना जमीन जो पहिला जो मालक आहे त्याच्या नावावर ती जाते कारण तुम्हाला जमीन विकत घेताना N/A प्लॉट विकत घ्यावा लागणार आहे आणि त्यासाठी जो लागणारा अतिरिक्त खर्च आहे जो की साधारण एक-दीड लाख रुपये पर्यंत येऊ शकतो तो तुम्हालाच करावे लागेल.

त्यामुळे तुम्हाला जमीन मालकासोबत एक MOU करावा लागेल ज्यामध्ये तुम्हाला जो काही खर्च लागणार आहे तो तुम्ही करणार आहात असे दिलेले असेल आणि त्यानंतर तुम्हाला पुढील वाटचाल करता येऊ शकते, त्यानंतर असे की जमीन खरेदी करण्यापूर्वी तुमचं जमीन मालकासोबत असे बोलणे झालेले असावे.

की तो जमीन मालक तुम्हाला ती जागा N/A करून देत आहे आणि तोपर्यंत तो थांबायला तयार आहे आणि एकदा तो प्लॉट N/A झाला की तुम्ही त्याला मग विकत घेऊ शकता त्यामध्ये आणखी खर्च वाढेल तो म्हणजे ती जागा N/A झाल्यामुळे त्याची जी स्टॅम्प ड्युटी आहे त्याचा खर्च देखील वाढेल ज्यामध्ये प्लॉटची स्टॅम्प ड्युटी तुम्हाला द्यावी लागेल.

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही शेत जमीन खरेदी करू शकता जर तुमच्याकडे कोणतीही शेतजमीन नाही तर हा शेत जमीन खरेदीसाठी चा कायदेशीर मार्ग आहे.मित्रानो तुम्हाला आमची माहिती आवडत असेल तर माहिती इतरांना देखील शेअर करत चला आमच्या व्हाट्सएप ग्रुप ला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती तुमच्या फोन वर मिळेल.

8 thoughts on “तुमच्याकडे जर कोणत्याच प्रकारची शेतजमीन नसेल ।। तुम्ही शेतकरी नसाल ।। आणि तुम्हाला जमीन खरेदी करायची आहे तर ती कोणत्या मार्गाने केली जाऊ शकते याबद्दल महत्वपूर्ण माहिती !

 1. नमस्कार 🙏
  जमीनी विषयीची इथंभूत माहिती मग ती जमीन कोणत्याही प्रकारची असो, त्याविषयीचे व्यवहार, हक्क घ्याव्याची खबरदारी ई अभ्यास करण्यासाठी मला मर्गदर्शन व मद्त करावी ही विनंती 🙏

 2. आम्ही 8जणांनी मुरबाड कल्याण येथे शेतीची जमिनीची 20गुंठे खरेदी केलेली आहे त्याचे रजिस्ट्रेशन हि झालेल आहे परंतु 7/12वर आमची नांवे चढत नाहीत आणी जमिन मालक जागा मोजुन ही देत नाही आणी कोणते ही सहकार्य करीत नाही तर जागेचा ताबा आणी आमची नाव नोंदणी कशी होईल सहकार्य कराल?

  1. मला काॕल करा सहकार्य मिळेल…
   कायदेशीर व मसल पाॕवर सुद्धा मिळेल 9146144441

 3. जमिन एन ए करून घेण्या पेक्षा तलाठ्या कडून शेतमजूर असल्याचे प्रमाणपत्र घेवुन त्याद्वारे सुद्धा शेत जमिन खरेदी करता येते , प्रयत्न करून बघा .

 4. माझ्या आजोबांकडे शेत जमीन होती पण त्यांनी ती विकली आता कोणाच्याही नावे जमीन नाही , परंतु जी जमीन होती त्या आधारे नवीन जमीन खरेदि करता येईल का ?

 5. माझे आजोबा घर जवई होते त्यांनी खरेदी जमिनी घेतली आजिच्य नावाची ? पण त्या जमिनी मध्ये आदला बदल झाली आहे . आजीच्य घरातल्या बरोबर त्यात कुळ कायदा येतो का?
  त्याची जमीन आम्ही कस्त आहे आमची ती कसत आहेत ७/१२ मध्ये नाव पण तसच आहे?

Comments are closed.