घर भाड्याने घ्यावे की विकत?।। फायना’न्शिअल प्लॅनिंगच्या दृष्टीने काय योग्य आहे? ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

अर्थकारण शैक्षणिक

घर विकत घ्यावे की भाड्याने घ्यावे हा प्रश्न खूप सार्‍या यंगस्टर्स ला पडत असेल, ज्यांनी जॉब सुरू केला असेल काही लोकांचा दोन -चार वर्षाचा जॉब झालेला असेल आणि हा एक यक्ष प्रश्न असतो आपल्या समोर, की घर घेऊ का नको. घर घ्यावे की भाड्याने राहू. तर मी एक केस स्टडी तुमच्या सोबत डिस्कस करणार आहे. आपण असे समजूया कि 50 लाख रुपये मध्ये तुम्ही घर घेऊ शकता.

विकत घ्यायचं म्हटल्यावर आपल्याला दोन गोष्टी पाहिजे, एक म्हणजे डाऊन पेमेंट, आपल्याकडे 20% असायला पाहिजे म्हणजे दहा लाख रुपये आपल्याकडे असायला पाहिजेत आणि चाळीस लाख रुपयांचा आपल्याला लोन घेता येईल. तर दहा लाख रुपये आपल्याला सेविंग करून किंवा ते सगळं प्लॅनिंग करावे लागेल. आपला पहिला पहिला मेजर फिनान्शिअल गोल म्हणजे डाउनपेमेंट.

चाळीस लाखाचे लोन घ्यायचा म्हणजे आपण किती वर्षाचा लोन टेन्युअर घेतो, मग वीस वर्षे घेतो, पंचवीस वर्षाचा घेतो किंवा काही काही बँक तीस वर्षाचा सुद्धा तुम्हाला ऑफर करत असते. त्याप्रमाणे 30,000 ते 40000 रुपयांचा इ एम आय तुम्हाला बसेल. आता इथे आपल्याला 10 लाख रुपये डाऊन पेमेंट करायचं आहे आणि वरून तीस ते चाळीस हजार रुपयांचा इ एम आय घेण्याची आपली कॅपॅसिटी आहे का? हे आपल्याला पाहायचे आहे.

काऊंट करायचे आणि मगच या गोष्टी ठरवायच्या. आता हेच पन्नास लाखांचे घर तुम्ही विकत घेण्यापेक्षा जर भाड्याने घेतलं तर ते बारा साडेबारा हजार रुपये महिना प्रमाणे त्याचे भाडे असेल. म्हणजे वर्षाचे दीड लाख रुपये, 50 लाखाचे प्रॉपर्टी तुम्ही तीन टक्क्यांचा रेंटल ईल्ड देऊन तुम्ही घेऊ शकता. प्रॅक्टिकली बघितलं तर 10 लाख कॅश भरा नंतर 40 लाख रुपये कर्जाचे, तीस ते चाळीस हजार रुपये तुम्ही एम आय म्हणून भरायचे.

या सगळ्या गोष्टी मॅनेज कसे करता येतील यावर हे सगळे डिसिजन अवलंबून आहेत. घर ही आपली इतकी मोठी प्रायोरिटी झालेली असते आणि त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या फिनान्शियल गोल्स कडे लक्ष देत नाही. सगळे फायनान्शिअल प्लांनिंग आपण पोस्टपोन करत जातो आणि हे फार डेंजरस असू शकते. तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग साठी. फायनान्सशिली विचार केला तर घर भाड्याने घेणे फार बरोबर वाटतं.

परंतु आपण अशा समाजात राहतो की जिथे आजूबाजूचे काय म्हणतील त्याच्याकडे आपलं जास्त लक्ष असत, असावा नसावा हे प्रत्येकाचा आपला आपला मत असू शकते. तुम्ही कम्फर्टेबल आहात का? दर दोन-तीन वर्षांनी तुम्हाला जर घर बदलायचे तर तुम्ही त्या गोष्टीसाठी तुम्ही कम्फर्टेबल असाल, तर घर भाड्याने घेणे फार मोठं लॉजिकल स्टेप वाटते. कारण पण सांगतो, 2005 ते 2015 हा जो फेज होता, तर रिअल इस्टेट मध्ये हा फेज फार ग्लोरिअस फेज होता.

रिअल इस्टेटच्या प्राईसेस मध्ये 30 ते 40 टक्के वार्षिक ॲप्रिसिएशन झालं होतं. पुण्याची गोष्ट, एक इंजिनियर ज्यावेळेस इंजिनिअरिंग करून आयटी कंपनीमध्ये काम करायचा तेव्हा त्याला पंधरा हजार रुपये पगार असायचा. स्वतःचा खर्च चार पाच हजार रुपये, सात आठ हजार रुपये सेविंग करण्याची कॅपॅसिटी त्या इंजिनियरची असायची. घरून एक – दोन लाख रुपये घेतले आणि सात-आठ लाख रुपयांमध्ये टोटल त्यांना घर घेता यायचं.

5 लाखाचा लोन घेतलं तरी पाच ते सात हजार रुपये इ एम आय बसायचा. तेव्हा हे सर्व खूप लॉजिकल वाटत होते. आज एक नवीन इंजिनिअर इन्फोसिस मध्ये आहे, आयबीएम मध्ये आहे, ते जेव्हा जॉबला लागतात तेव्हा आराउंड त्यांचे 30 ते 40 हजार पगार असतो. नवीन घर घ्यायचे 50 लाख पर्यन्त, दहा लाख डाऊन पेमेंट आणि 40 लाख रुपये लोन. पहिली गोष्ट तर लोन मिळणारच नाही.

मिळालं तरी इएमआय कुठून भरणार. आता मला सांगा हे सगळे कॅलक्युलेशन केल्यावर, आपल्या फायनान्शिअल प्लॅनिंग ची बट्ट्याबोळ करून टाकतो. इनिशियल फेजमध्ये ही गोष्ट कधीही करू नये. मला अस वाटत आपण 50,30, 20 चा रुल वापरावा. पन्नास रुपये हे तुमचे एक्सपनसेस हाऊस होल्ड तसेच हाऊस रेंट आणि इ एम आय मिळून असायला पाहिजे. तीस रुपये लॉंग टर्म फायनान्शिअल गोल चे असायला हवे.

वीस रुपये तुमच्या शॉर्ट टर्म फायनान्शिअल गोल चे असायला हवे. काही वेळेस तुम्ही हे 50 आणि 20 शॉर्ट टर्म गोल चे अटॅच करून 70₹ तुम्ही तुमचे होमेलोन एक्सपेंन्सेस, लोन इ एम आय मिळून तुम्ही करू शकता, पण तीस रुपयाची जी सेविंग आहे ती लॉंग टर्म फिनन्सिअल गोल साठी असायला पाहिजे असं मला वाटतंय.

आपल्या फिनान्शियल प्लॅनिंग ला खराब करू नका प्रॉपर कॅलक्युलेशन करून स्वतःची प्रॉपर बॅलन्स शीट बनवून इन्कम, आऊट फ्लोस, फायनान्शिअल गोल कसे लोकेशन करायचे ते सगळं डिसाईड करून तुम्ही इन्व्हेस्टमेंट कॉल करायला पाहिजे. घर, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ही फार मोठी असते कमिटमेंट असते. आता वरील मुद्दे वाचताना तुमच्या हे लक्षात आले असेल की एकमेकांशी संबंध नसलेले अनेक मुद्दे यात आहेत, ज्यामुळे एक पर्याय अगदी अनिवार्य, अव्यवहार्यच होऊन जातो.

त्यामुळे या निर्णयासाठी महत्त्वाचा एकच एक घटक शोधायचा झाल्यास आपल्याला काही गृहितकं वापरून दोन्ही पर्यायांमधील व्यवहार्यता समसमान असेल अशी परिस्थिती विचारात घेतली पाहिजे. त्यासाठी पुढील गृहितकं आपण विचारात घेऊ: १.’करवजावटी’ (टॅक्स बेनिफिट) चा फायदा घेणं हे काही घर खरेदी / भाड्याने घेण्यामागचं प्राथमिक कारण असू शकत नाही. तेव्हा कुठल्याही करवजावटीशिवाय हा निर्णय घेता आला पाहिजे.

अर्थातच, अशी वजावट हा एक जास्तीचा फायदा म्हणून पदरात पाडून घेता येऊ शकतो. घराच्या भाड्यावर देखील करवजावट (HRA) मिळू शकते. २.आपण असं गृहीत धरणार आहोत की एक घर असलेल्या व्यक्तीला दुसरं घर विकत घ्यावं की भाड्यानं याचा निर्णय करायचाय. एक घर आधीच असल्यानं स्थैर्य, आनंद किंवा तत्सम भावनिक गोष्टींचा विचार करायची गरज नाही.

३.आपण असं ही गृहीत धरणार आहोत की पहिल्या घरापासून दूरच्या गावी आणि किमान ३-४ वर्षांच्या वास्तव्यासाठी आपल्याला घराचा खरेदी/भाड्याचा विचार करायचा आहे. कारण अवघ्या १-२ वर्षांसाठी कुठे राहायची गरज असेल तर नवीन घर खरेदी करण्याचा विचार देखील कोणी करणार नाही. ४.स्वतःच्या वास्तव्यासाठी घराचा वापर होणार आहे. ५.त्यापुढचं गृहितक म्हणजे, घर अनफर्निश्ड स्वरूपातील असेल. कारण तेव्हाच खरेदीमूल्य आणि भाडे यांची तुलनात्मक बरोबरी होऊ शकेल.

६.भविष्यातील चलनवाढीचा परिणाम आपण विचारात घेणार नाही. ७.आपण हे देखील गृहीत धरू की घर खरेदी करण्यासाठी १००% रक्कम कर्जाऊ मिळू शकते आणि कर्जाची मुदत २० वर्षांची असेल. ८.त्याचप्रमाणे घर खरेदीचा निर्णय हा त्या व्यक्तीच्या मासिक उत्पन्नाच्या प्रमाणातच असेल. म्हणजेच, त्या व्यक्तीला दरमहा कर्जाचा हप्ता भरणे सहज शक्य आहे. वरील गोष्टींचा विचार करून आपण आपला निर्णय आपण घेऊ शकतो. कुठलाही लेख हा कधीच परिपूर्ण असा नसतो त्यामुळे तुम्हाला ह्यात अजून काही ऍड करावे वाटत असेल तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.

1 thought on “घर भाड्याने घ्यावे की विकत?।। फायना’न्शिअल प्लॅनिंगच्या दृष्टीने काय योग्य आहे? ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

Comments are closed.