जाणून घ्या धूर विरहित चूल्हा बनवणा-या शोधक वृत्तीच्या पर्यावरण प्रेमीविषयी….

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

अगदी लहानपणापासून आपल्या गांवातील स्त्रिया स्वयंपाक बनवत असतानां चुल्हा किंवा बायोमास स्टोव्हमधून निघणाऱ्या धुरामुळे किती त्रासलेल्या असतात हे ते पहात होते. केरळमधील सत्तेचाळीस वर्षीय व्ही जयप्रकाश यांनी संपूर्ण ज्वलन आणि गॅसिफिकेशनचे तंत्र वापरून पोर्टेबल स्टोव्हची सुधारित आव्रुत्ती तयार केली आहे.

व्ही जयप्रकाश यांना लहानपणी केरळमधील कोयलँडी जवळील गावांमध्ये घरोघरी मातीचे चुल्हे विकल्याचे आठवते. “मी लहान असताना आई अशा प्रकारचे स्टोव्ह कोईम्बतूरहून विकत घेई आणि मी ते स्टोव्ह घरोघरी जाऊन विकत असे. आम्ही सहा भावंडे होतो आणि आईने आणलेले स्टोव्ह विकून आमचा उदरनिर्वाह होत असे”. ते सांगतात.

चुल्हा किंवा बायोमास स्टोव्हमधून मोठ्या प्रमाणावर धूर निघतो हे पाहून जयप्रकाश यांच्या मनांत ही समस्या सोडवण्यासाठी काहीतरी करायला हवं असं आलं. स्वयंपाक करताना स्वयंपाकघरात जो धूर व्हायचा तो महिलांसाठी त्रासदायक तर होताच, शिवाय हानीकारक देखील.

 

त्यांनी या स्टोव्हच्या मागील बाजूस एक लहान पाईप, किंवा चिमणी म्हणु हवं तर, बसवण्याचा प्रयत्न केला. “माझी कल्पना अयशस्वी होऊ शकते याची मला भीती वाटत असल्याने मी आधी शेजारच्या गांवात प्रयत्न केला,” जयप्रकाश सांगतात. आणि काय सांगावं! ती कल्पना यशस्वी झाली. ही त्यांना सुचलेली पहिलीच कल्पना होती असं नव्हे. याआधी त्यांनी वजन उचलण्यासाठी पुली, आणि काही अंतर जाऊन परत येणारी मोटर बोट बनवली होती.

शाळेतील विज्ञान प्रदर्शनांमध्ये जयप्रकाश नियमितपणे सहभागी होत असले, तरी आर्थिक अडचणींमुळे त्यांना शाळा सोडावी लागली. पण त्यांनी स्वप्न पाहायचं मात्र थांबवलं नाही. जयप्रकाश निरनिराळे प्रयोग करत राहिले आणि एजन्सी फॉर नॉन-कन्व्हेन्शनल एनर्जी अँड रुरल टेक्नॉलॉजी (ANERT), केरळ यांनी आयोजित केलेल्या सौरऊर्जेसंबंधी दहा दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमातील सहभागामुळे त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना योग्य दिशा मिळाली.

एका स्थानिक वृत्तपत्रात हॉस्पिटलचा कचरा शेतात टाकला जात असल्याच्या उल्लेखाने ते व्यथित झाले आणि त्यांनी हॉस्पिटलच्या मॅनेजरशी संपर्क साधला. त्यांनी हॉस्पिटलचा सर्व कचरा जाळता येईल असा स्टोव्ह तयार करण्यासाठी २०,००० रुपयांची प्रारंभिक रक्कम देऊ केली. स्टोव्ह बनवण्यात ते यशस्वी झाले असले तरी स्टोव्हच्या चिमणीजवळ अचानक उंच ज्वाळा आल्याचे पाहून जयप्रकाश आणि त्यांचे मदतनीस आश्चर्यचकित झाले. अधिक चौकशी केल्यावर, त्यांनी ANERT चे तत्कालीन संचालक आर एन जी मेनन यांच्याकडून गॅसिफिकेशन आणि संपूर्ण ज्वलन यासारख्या प्रक्रिया कशा कार्य करतात याबद्दल अधिक तपशील जाणून घेतला.

V Jayaprakash's fuel-efficient stoves impress Cubans

या सामाजिकदृष्ट्या उपयुक्त कामामुळे १९९८ मध्ये जयप्रकाश यांना ऊर्जा व्यवस्थापन केंद्र, केरळ कडून ऊर्जा संवर्धन पुरस्कार आणि २०१२ मध्ये भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून राष्ट्रीय इनोव्हेशन पुरस्कार मिळाला आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट फंड (UNDP) च्या भागीदारीत राज्यातील विविध शाळांमध्ये माध्यान्ह भोजन तयार करण्यासाठी २०० हून अधिक सामुदायिक स्टोव्ह बसवल्याचे श्रेय या उद्योजकाला जाते. जयप्रकाश यांना तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमधील विविध शाळा, विवाह हॉल इत्यादींकडून स्टोव्हच्या ऑर्डर अव्याहतपणे येत असतात.

कोईम्बतूर येथील आपल्या छोट्याशा कारखान्यात काम करणाऱ्या ६ ते ७ कुटुंबांना नोकरी दिल्याने जयप्रकाश त्यांच्या उदरनिर्वाहाला हातभार लावत आहेत. तुमच्या शोधांमागील प्रेरक शक्ती काय आहे असं विचारल्यावर ते म्हणतात, “लोकांच्या विविध समस्या आणि गरजा जाणून घेणे आणि आपल्या सर्जनशील कौशल्यांद्वारे त्यांचे निराकरण करण्यात मदत करणे, हे माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे”.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा