आईचा त्रास कमी करण्यासाठी त्याने तयार केलं चक्क पोळ्या बनवण्याचं यंत्र

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

परिस्थितीवर मात करून क्रांतिकारी नवकल्पना प्रत्यक्षात आणणारे ग्रामीण संशोधक.

गरज ही सर्व शोधांची जननी आहे हे तुम्ही जाणताच. सर्वसाधारणपणे जी माणसं शोध लावतात ते वैज्ञानिक असतात असं आपण समजतो. परंतु भारताच्या तळागाळातील काही जणांनी त्यांच्या दैनंदिन परिस्थितीमधून प्रेरणा घेऊन काही उपकरणे शोधून काढली किंवा स्वतः विकसित केली हे खरंच कौतुकास्पद आहे.

आजपासून आम्ही सुरू करत आहोत ७ अशा नव कल्पनांच्या शोधांची मालिका, जी प्रेरणादायी तर आहेच, पण भारतीयांसाठी अभिमानास्पद देखील………………….

जर तुम्ही तुमच्या आईला पोळ्या बनवताना पाहिलं असेल, किंवा कधी तुम्ही स्वतः पोळ्या बनवल्या असतील तर तुम्हांला माहित असेल की पीठ मळणे आणि व्यवस्थित गोल पोळ्या बनवणे हे किती कठीण काम आहे. स्त्रियांना तर रोजच पोळ्या बनवाव्या लागतात आणि वर्षानुवर्षे तेच काम करून असेल, पण काही वर्षांनी त्यांना पोळ्या बनवण्याचा कंटाळा येऊ शकतो.

कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील ४१ वर्षीय बोम्मई वास्तू यांच्या बाबतीत असंच काहीसं झालं. लहानपणापासून ते आपल्या आईला पोळ्या करताना पहात होते आणि त्या बनवताना तिला किती कष्ट होतात ते देखील. त्यांना सतत असं वाटायचं की आपल्या आईचे कष्ट कमी करण्यासाठी आपण काही तरी करायला हवं, पण कसं, हे त्यांना समजत नव्हतं. खूप विचार केल्यानंतर त्यांना एक कल्पना सुचली.

बोम्मई वास्तू ह्यांनी आपल्या आईचं पोळ्या बनवण्याचं काम सोप्पं व्हावं यासाठी इंडक्शन स्टोव्ह तयार करण्याचं ठरवलं. एक असा इंडक्शन स्टोव्ह, जो अचूक गोल पोळ्या लाटू शकेल. बोम्मई नेहमीच नावीन्यपूर्णतेच्या शोधात असतात. आपल्या सायकल शॉपमध्ये नवीन मशीन शोधण्याचा प्रयत्न, किंवा स्वतःची परवानाकृत कार्यशाळा सुरू करणे; कर्नाटकातील बुक्कसांद्रा गावातील या माणसाने आयुष्यात खूप मोठा पल्ला गाठला आहे हे नक्की.

आर्थिक अडचणींमुळे त्यांना काॅलेजमध्ये जाता आलं नाही. पैशाअभावी त्यांना सेरीकल्चरमधील अभ्यासक्रम देखील सोडावा लागला. ग्रामीण भागातील घरांमधील श्रम कमी करणारी नाविन्यपूर्ण उत्पादनं बनवण्याचा त्यांना ध्यास आहे आणि त्यातूनच पोळ्या लाटण्याचं यंत्र बनवण्याचं त्यांनी ठरवलं.

बोम्मईंना स्वतःला पोळ्या खूप आवडतात. त्यांची आई वृद्ध आहे, आणि तिला दररोज पोळ्या करताना होणारा त्रास पाहून त्यांनी ठरवलं की आपण असं एखादं यंत्र बनवावं, ज्यामुळे पोळ्या आपोआप लाटल्या जातील आणि तिचा रोजचा त्रास कमी होईल.

पारंपारिक पद्धतीत कणकेचा गोळा सपाट करण्यासाठी गुळगुळीत लाकडी पृष्ठभागावर, अर्थात पोळपाटावर लाटणं फिरवतात. यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी एक असं यंत्र तयार केलं ज्यात लाटणं स्थिर राहतं आणि पोळपाट मात्र फिरतो, ज्यामुळे पोळी आपोआपच लाटली जाते. आहे की नाही कमालीची क्रांतिकारक कल्पना?

बोम्मई यांनी विकसित केलेलं पोळ्या बनवण्याचं यंत्र सौर उर्जा आणि अल्टरनेटिंग करंट, दोन्हींवर काम करते. १५ हजार रुपये किंमतीचे हे पोळ्या बनवण्याचे पोर्टेबल यंत्र वापरण्यास अत्यंत सोपे आहे. त्याचे वजन फक्त ६ किलो आहे आणि ते नेहमीच्या इंडक्शन स्टोव्हच्या आकाराचे आहे. हे यंत्र एका साध्या लीव्हर मेकॅनिझमवर काम करते आणि एका तासात १८० पोळ्या लाटू शकते.

पोळ्या बनवण्याचा त्रास कमी व्हावा म्हणून आपल्या मुलाने पोळ्या बनवण्याचं हे अनोखं यंत्र शोधून काढलं याचा बोम्मई यांच्या आईला आनंद आणि अभिमान आहे. “माझा मुलगा एखाद्या वैज्ञानिकाहून कमी नाही. विशेष म्हणजे शालेय शिक्षण नसून देखील त्याने हे यंत्र बनवलं हे खरंच कौतुकास्पद आहे”. ती म्हणते.

आतां तर बुक्कसांद्रा गावांमध्येच नव्हे, तर आजूबाजूच्या गावांमध्ये त्यांचा हा यांत्रिक पोळपाट लोकप्रिय झालेला आहे आणि अनेक घरांमधील महिला त्यावर पोळ्या लाटून आपलं पोळ्या बनवण्याचं काम सोप्पं करत आहेत.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा