आपल्या भूतकाळातील अनेक गोष्टींचा आपल्या वर्तमानकाळावर परिणाम होत असतो. त्यामुळेच बऱ्याचदा आपल्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात आणि म्हणूनच यापासून दूर राहणे जास्त महत्त्वाचे आहे. ज्यांच्या आयुष्यात काही नियमच नाही, कोणतेही काम करण्याची, जसे की झोपणे उठणे, खाण्या पिण्याच्या वेळा ठरलेल्या नसतात अशा लोकांचं आयुष्य खूप कंटाळवाणं असत, त्यांना आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे हे माहीत च नसत.
आपलं ध्येय माहीत नसतं, आणि म्हणूनच असे लोक आयुष्यात काही मिळवू शकता नाहीत, त्यासाठी जीवनात काही नियम पाळल्यास आपण आपले वर्तमान अधिक चांगले करु शकतो. हे नियम आपल्याला आपली योग्य दिशा दाखवून देतात, ते आपल्याला बांधून ठेवण्यासाठी नसतात तर आपण कोणत्याही अडचणीमध्ये पडू नये म्हणून असतात. आणि जर काही अडचण आलीच तर त्याला कास सामोरं जायचं हे या नियमांमुळे कळत. ते नियम कोणते ते जाणून घेऊ या:
१. भूतकाळात जगू नका: आपल्या भूतकाळात जे काही झालं असेल त्यात अडकून राहू नका कारण भूतकाळात जगणारा माणूस वर्तमान काळात काहीच करू शकत नाही, जेव्हा पण आपण आपल्या भूतकाळाचा विचार करतो तेव्हा आपण इथे राहत नाही, तर आपलं मन लगेच भूतकाळातील त्या गोष्टींमध्ये अडकून राहत ज्यामुळे आपल्याला त्रास झालेला असतो, आणि याच कारणामुळे आपण वर्तमान काळातील कामाकडे पूर्ण लक्ष देऊ शकत नाही, अर्थातच याचा परिमाण आपल्या दैनंदिन जीवनावर पडतो, त्यामुळे सगळ्यात आधी तर भूतकाळाचा विचार करणे बंद करा.
२.लोक काय म्हणतील याचा विचार करणे थांबवा: कारण तुम्ही काहीही केलं तरी लोक नाव ठेवतातच, तुम्ही काही काम केलं तर त्याला ही लोक म्हणतात आणि तुम्ही बसून राहिलात त्यालाही लोक म्हणतात. त्यामुळे कोणतही काम करताना लोक काय म्हणतील याचा विचार करु नका. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही जे करताय ते योग्य करताय तर लोक काय म्हणतील याचा विचारच करु नका, तुम्हाला वाटतंय तस जगा, आनंदी राहा. असे खूप लोक असतील ज्यांचे स्वप्न फक्त याच कारणाने अपुरे राहतात की हे लोक काय म्हणतील. म्हणून आजच स्वतःला सांगा की मी लोक काय म्हणतील याचा विचार करणार नाही आणि बिनधास्त हवं तसं जगा.
३.संकटांना हिंमतीने सामोरं जा: कधी कधी आपल्या जीवनात खूप मोठं संकट येत ज्याचा आपण कधी ही विचार ही केलेला नसतो ,आणि त्यामुळे आपण पूर्ण पणे तुटुन जातो ,अशावेळेस खचून जाऊ नका तर या संकटांना हिंमतीने सामोरं जा. संकट जशी येतात तशी निघूनही जातात. त्यामुळे त्या येणाऱ्या प्रत्येक वेळेला वेळ द्या. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या वाईट वेळेला आनंदाने सामोरे जाल तेव्हा पुढे येणार आनंदाचे दिवस ही जास्त लवकर येईल. फक्त विश्वास ठेवा आज वाईट वेळ आहे तर उद्या चांगली वेळ नक्कीच येईल.
४.स्वतः ला कधीच कमी लेखू नका: स्वतः ची तुलना दुसऱ्या सोबत कधीच करू नका, कारण या जगात प्रत्येक जण वेगळा आहे प्रत्येकामधले गुण वेगळे आहेत, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे.प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या जागी योग्य असते. आपण जेव्हा दुसऱ्याचा विचार करतो तेव्हा आपण खुश राहूच शकत नाही, त्याला जास्त पैसे मिळत असतील किंवा तो माझ्यापेक्षा जास्त आनंदी आहे असे विचार केल्याने आपल्याला फक्त दुःख च मिळत, त्याला काय मिळायचं ते मिळू द्या, तुमच्याजवळ जे आहे त्यात तुम्ही खुश रहा, जेव्हा तुम्ही स्वतः ची दुसऱ्यासोबत तुलना करणे थांबवाल तेव्हा तुम्हाला खुश राहण्यापासून कोणीच अडवू शकत नाही.
५.जास्त विचार करू नका: जास्त विचार करण चुकीचं नाही आहे पण एकाच गोष्टीचा तोच तोच विचार करणं देखील बरोबर नाही. त्यामुळे तुम्हालाच त्रास होतो आणि त्या एका गोष्टीमुळे आपल सगळं लक्ष त्या कडेच जात म्हणून इतर गोष्टींकडे आपण लक्षच देत नाही आणि जास्त विचारामुळे आपल्या इतर गोष्टीवर फरक पडतो, आपल्या जेवणावर, झोपेवर, मूड वर,आपल्या जास्त विचार करण्यामुळे या सगळया गोष्टी विस्कळीत होतात.
६.सुखाचं आणि दुःखच कारण ठरवा: एक नेहमी लक्षात ठेवा ,आपल्या सुखाचे आणि दुःखाचे कारणीभूत आपण च असतो,त्यामुळे जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला तुमच्या सुखाचं आणि दुःखच कारण समजाता तोपर्यंत तुम्ही कधी खुश राहू शकत नाही. कुणी काही बोललं तर दुःखी व्हायचं नाही कोणी काही केलं तर खुश व्हायचं, हे किती दिवस चालणार, जेव्हा तुम्ही आपण कधी आणि कोणामुळे खुश राहायचं आणि कधी दुःखी व्हायचं हे ठरवाल तेव्हा तुम्हाला कोणीच दुःखी करू शकत नाही.
७.कमवायला शिका, गुंतवायला शिका, बचत करायला शिका: जर तुम्हाला तुमच्या जीवनात काहीतरी करायचं असेल, तुमची खूप मोठी स्वप्न असतील, तर त्यासाठी आधी कमवायला शिका, गुंतवायला शिका, बचत करायला शिका. जर तुम्हाला पैसे कमावणे आणि जमवणे याचा ताळमेळ नाही लावता आला तर पैश्याच्या बाबतीत तुम्ही खुश नाही राहू शकणार.
८.जी नाती, जी लोक आपल्या आयुष्यात विष कालावतात अशांपासून दूर रहा: जी नाती तुम्हाला फक्त आणि फक्त दुःख देतात, असे लोक जे तुमच्या तोंडावर खूप चांगले वागतात व त्यांना कधीच वाटत नाही की तुमचं चांगलं व्हावं अश्या लोकांपासून दूर राहा. दूर राहा म्हणजे अस नाही की ते तिथे असतील तर तिथून निघून जा, दूर राहा म्हणजे ते काहीही करू देत, कसेही वागू देत त्याचा परिणाम तुमच्या मनावर होऊ देवू नका, त्यांच्यापासून मनाने दूर राहा. ते काय करत आहे याचा तुमच्यावर काहीच फरक पडू देऊ नका, तुम्ही तुमच काम करत राहा.
९.ध्येयाच्या दिशेने पहिले पाऊल उचला: तुम्हाला आयुष्यात जे काही करायचं आहे, जे काही मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी प्रयन्त करा, कारण फक्त ठरवून होत नाही, मी हे आज करेल, उद्या करेल अशी करत वेळ निघून जाते, त्यामुळे जे ठरवलं ते लगेच करा, काय माहित जेव्हा तुम्ही याची सुरुवात करणार होतात तोपर्यंत ते तुम्हाला मिळालं पण असेल. म्हणून फक्त ठरवू नका ठरवलेलं साध्य करण्यसाठी प्रयत्न पण सूरु करा.
१०.खाण्याच्या आणि झोपण्याच्या सवयी बदला: तुमच्या सवयी ठरवत असतात तुम्ही कसे आहात,आणि तुम्ही काय होणार आहात, आणि सगळ्यात महत्वाच्या दोन सवयी म्हणजे खाण्याची आणि झोपण्याची, जी व्यक्ती या दोन गोष्टी सांभाळू शकत नाही ती व्यक्ती आयुष्यात मोठे मोठे निर्णय कसे घेऊ शकेल.ज्या व्यक्तीचा खाण्याचा, झोपण्याचा, उठण्याचा काही ही नियम वेळ नाही ती व्यक्ती कशाचही नियोजन नीट करू शकत नाही. त्यामुळे आपल्या खाण्याच्या झोपण्याचा वेळा नीट ठरवून घ्या, जेव्हा तुम्ही नियमित पणे हे करू लागता तेव्हा आपोआप तुम्ही तेच करता जे तुम्हाला करायला हवं. या सगळया अगदी छोट्या गोष्टी आहेत पण याचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो त्यामुळे वर दिलेले नियम नीट समजून घ्या आणि त्याचा योग्य वापर करा.आत्ताच सुरुवात करा आणी शेवट पर्यंत करत राहा. नेहमी आनंदी राहा.