आता चक्क अ‍ॅप तुमची आवड-निवड सांभाळणार ।। पिन्टरेस्ट या ऍप बद्दल रंजक माहिती जाणून घ्या या लेखातून !

आंतरराष्ट्रीय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

सक्रिय वापरकर्त्यांची एकूण संख्या: ४७८ कोटींपेक्षा अधिक.
अमेरिकेच्या बाहेरील वापरकर्त्यांची टक्केवारी: ५० टक्के
वापरकर्त्यांनी सेव्ह केलेल्या पिनची एकूण संख्या: २४० अब्जापेक्षा अधिक.
मार्केट व्हॅल्यू: ४९.१३ अब्जापेक्षा अधिक.
वापरकर्ते: ७७ टक्के स्त्रिया.
२०२१-२०२२ या एकाच वर्षात ७८ टक्के इतकी प्रचंड वाढ.

ही सगळी माहिती एका ॲप बद्दलची आहे, पण कोणत्या ॲपबद्दल आहे ते तुम्ही ओळखलं कां? नसेल ओळखलं तर तुमची उत्सुकता आणखी न ताणता सांगतो. ॲप तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या ओळखीचं आहे आणि कदाचित तुम्ही ते वापरत देखील असाल. पिन्टरेस्ट.

पाककृती, घराचे किंवा समारंभाचे सुशोभीकरण, इतर प्रेरणादायी कल्पना आणि बरेच काही शोधण्यासाठी आणि संभाळून ठेवण्यासाठी पिन्टरेस्ट हे सर्च इंजिन आहे. पिन्टरेस्ट वर अब्जावधी पिनसह, तुम्हांला प्रेरणादायी ठरतील अशा अब्जावधी कल्पना सापडतील. जेव्हां तुम्हांला तुमच्या आवडीचे पिन सापडतात, तेव्हां तुमच्या कल्पना व्यवस्थित जपून ठेवण्यासाठी आणि त्या शोधण्यास सोप्या व्हाव्यात यासाठी त्या बोर्डवर किंवा फोल्डरमध्ये तुम्ही सेव्ह करू शकता.

आयोवामध्ये लहानपण घालवलेला बेन सिल्बरमन शाळेत असताना पुठ्ठ्यावर चिकटवलेल्या वाळलेल्या कीटकांचा संग्रह जमवत असे. खरं तर बालपणीचा हाच छंद मोठा झाल्यावर त्याच्या जीवनाचे ध्येय बनणार आहे हे मात्र त्याला माहित नव्हतं. ३३ वर्षाच्या इव्हान शार्प आणि बेन सिल्बरमन या सहसंस्थापकांनी पिन्टरेस्ट ही वेबसाइट सुरू केल्यानंतर सहा वर्षांनी फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

फोर्ब्सचा अंदाज आहे की पिन्टरेस्टचे सीईओ बेन सिल्बरमन यांची एकूण संपत्ती $१.६ अब्ज आहे, तर इव्हान शार्प, जो मुख्य क्रिएटिव्ह ऑफिसर आहे, $१ बिलियन. जगभरातील वेगवेगळ्या उद्योगातील ४० पेक्षा कमी वयाच्या ६६ अब्जाधीशांपैकी हे दोघं आहेत.

बेन सिल्बरमनने येल विद्यापीठामधून पदवी प्राप्त केली, आणि नंतर व्यवस्थापन सल्लागार म्हणून तीन वर्षे काम केले. २००६ मध्‍ये गुगलमध्‍ये उत्‍पादन तज्ञाची नोकरी केली. तंत्रज्ञानाने झपाटलेल्या इतर बऱ्याच जणांप्रमाणे आपली देखील एखादी ‘स्टार्टअप कंपनी’ असावी असं त्याला वाटू लागलं आणि आपला वर्गमित्र पॉल सियारासोबत ‘कोल्ड ब्रू लॅब’ ही कंपनी सुरू करण्यासाठी त्याने गूगलची नोकरी सोडली. टोट नावाचे शॉपिंग ॲप हे त्यांचे व्यावसायिक जगात सर्वात पहिले पाऊल होते. बेन सिल्बरमनने इव्हान शार्प या आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्याला भेटल्यानंतर, तिघांनी मार्च २०१० मध्ये पिन्टरेस्टची पहिली डेस्कटॉप आवृत्ती लॉन्च केली. पालो अल्टो अपार्टमेंटमधून पिन्टरेस्टची साइट चालवत असताना इव्हान शार्पने फेसबुकवर नोकरी केली. पॉल सियाराने एप्रिल २०१२ मध्ये कंपनी सोडली.

पिन्टरेस्टचे सप्टेंबर २०१५ मध्ये १०० दशलक्ष मासिक सक्रिय वापरकर्ते होते, आणि सात वर्षांनंतर देखील त्याची लोकप्रियता ओसरलेली नाही. आतां तर “प्रमोटेड पिन” च्या स्वरूपात तुम्ही खरेदी देखील करू शकता. ह्या प्रमोटेड पिन सर्वसाधारण पोस्ट सारख्याच दिसतात, परंतू त्यात बाय म्हणजे खरेदीचा टॅब असतो.

पिन्टरेस्टला हे यश एका रात्रीत मिळालेले नव्हते. त्याचा वापरकर्ता आधार हळूहळू वाढला आणि गुंतवणूकदारांना साईटवर खरेदी करण्यासाठी पटवून देण्यात बराच वेळ गेला. मात्र सिल्बरमन आणि शार्प यांनी शांतपणे आपली वाटचाल सुरू ठेवली.

आतां तर पिन्टरेस्टने ‘क्रिएटर हब’, म्हणजे काही मोजक्या लोकांचा सहभाग असलेला ग्रृप बनवला आहे ज्यावर प्रेरणादायी कल्पना सादर करणाऱ्या लोकांना ‘क्रिएटर रिवाॅर्डस’ मिळणार आहेत. अर्थात तुम्ही देखील त्यामध्ये भाग घेऊ शकता.

“मी बेनपेक्षा थोडा जास्त झपाटलेला आहे आणि थोडा जास्त कलात्मक नव्हे, परंतु थोडा अधिक सर्जनशील आहे” इव्हान शार्प गंमतीने म्हणतो.

काही गुंतवणूकदारांनी असा अंदाज वर्तवला आहे की पिन्टरेस्टचा महसूल ट्विटर आणि फेसबुक सारख्या दिग्गजांना मागे टाकेल. हा अंदाज खरा ठरेल किंवा नाही, हे पिन्टरेस्टच्या भविष्याबाबत सिल्बरमन आणि शार्प यांनी घेतलेल्या निर्णयांवर ठरेल.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा