📌 एल आय सी पॉलिसी सोबत पॅन कार्ड कसे लिंक करायचे? जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आपले NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज नक्की लाईक करा.

आपल्यापैकी बर्‍याच जणांनी एलआयसी पॉलिसी काढलेली असेलच. आता एलआयसी पॉलिसी सोबत पॅन कार्ड लिंक करणे हे गरजेचे आहे. मित्रांनो एल आय सी च्या ऑफिशिअल वेबसाईट वरती, एल आय सी पॉलिसी सोबत पॅन कार्ड लिंक करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. इथे आपण एल आय सी पॉलिसी सोबत पॅन कार्ड कशाप्रकारे लिंक करायचं? याबाबत माहिती पाहणार आहोत. तसेच एल आय सी चा “आय पी ओ” सुद्धा येणार आहे. आपल्या पैकी शेअर मार्केट मध्ये बरेच जण कार्यरत असतील तर त्यांना आयपीओ म्हणजे काय? हे या आधीच माहीत असेल. तुम्हाला जर आय पी ओ घ्यायचा असेल आणि तुमच्याकडे जर कधी एलआयसी ची पॉलिसी असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी आय पी ओ घेण्यासाठी दहा टक्के रिझर्वेशन असणार आहे. त्याकरिता एल आय सी पॉलिसी सोबत पॅन कार्ड लिंक असणं गरजेचं असणार आहे. तर एल आय सीच्या authorized वेबसाईट वरून आपल्याला एल आय सी सोबत पॅन कार्ड लिंक कसे करायचे? याबाबत इथे आपण सविस्तर माहिती पाहूया.

◼️तुम्ही काढलेल्या एल आय सी पॉलिसी सोबत तुमचा पॅन कार्ड लिंक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एलआयसीची ऑफिशिअल वेबसाईट आहे त्या वेबसाईटला ओपन करायचं आहे.

📍 LIC official website – https://licindia.in

ही एल आय सीची ऑफिशियल वेबसाइट आहे. ही वेबसाईट तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये तुम्ही ओपन करू शकता. मित्रांनो तुमच्या मोबाइलच्या क्रोम ब्राउजर मध्ये ही वेबसाईट तुम्ही ओपन करत असाल आणि ती वेबसाईट तुम्हाला दिसत नसेल, वेबसाइट ओपन होताना एरर येत असेल, तर अशा वेळेला तुमच्या मोबाइलच्या क्रोम ब्राऊझरच्या उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यामध्ये 3 डॉट दिसून येतील. त्या डॉट वरती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला डेक्सटॉप स्क्रीन असा पर्याय दिसेल आणि त्यावर क्लिक केल्यानंतर एल आय सी ची वेबसाईट तुमच्या मोबाईलचा क्रोम ब्राउजर मध्ये तुम्हाला ओपन झालेली दिसून येईल. ही वेबसाइट ओपन केल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे.
>  स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी “ऑनलाइन पॅन रजिस्ट्रेशन” म्हणून पर्याय त्या ठिकाणी दिसून येईल. तर या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.

>  त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला परत “क्लिक हिअर” म्हणून एक पर्याय दिसेल, तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी एल आय सी पॉलिसी सोबतच पॅन कार्ड लिंक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर हा तुमच्याजवळ ठेवायचा आहे. त्यानंतर तुमच्या एल आय सी पॉलिसी सोबत तुम्ही जो मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी लिंक केलेला आहे, तुम्ही दिलेला आहे तो मोबाईल क्रमांक सुद्धा तुमच्या जवळ असणे गरजेचे आहे. कारण या मोबाईल क्रमांकावर ती एक ओटीपी क्रमांक हा पॅन कार्ड एल आय सी सोबत सोबत लिंक करतानी पाठविला जाईल.

> त्यानंतर मित्रांनो खाली त्या ठिकाणी तुम्हाला “proceed” म्हणून बटन त्या ठिकाणी दिसून येईल तर त्या बटन वरती क्लिक करायचं आहे.

>  त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल आणि या ठिकाणी तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकण्यासाठी विचारला जाईल. तरी या ठिकाणी तुमच्या पॅन कार्ड वरती जी डेट ऑफ बर्थ मेंशन केलेली आहे. ती या ठिकाणी, प्रथम दिनांक ,नंतर महिना आणि नंतर संपूर्ण वर्ष या फॉरमॅटमध्ये त्या रखाण्यांमध्ये टाकायची आहे. त्यानंतर तुम्ही पुरुष असाल तर मेल वरती क्लिक करायचं आहे. तुम्ही स्त्री असाल फिमेल वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर ट्रांसजेंडर म्हणजे जर तृतीय पंथी असेल, तर आॅदर या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

>  त्यानंतर तुमच्या ईमेल आयडी आहे, तो ईमेल आयडी तुम्हाला या रखना मध्ये अचूक टाकायचा आहे.

>  त्यानंतर तुमचा पॅन कार्ड क्रमांक जो असेल, तो कॅपिटल मध्ये या र खाण्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या पॅन कार्ड वरती तुमचं नाव मेंशन केलेलं आहे, ते नाव जसेच्या तसे त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे.

>  त्यानंतर तुमच्या एल आय सी पॉलिसी सोबत तुम्ही जो मोबाईल क्रमांक दिला आहे किंवा एलआयसी पॉलिसी काढताना जो मोबाईल अर्जा वरती क्रमांक तुम्ही टाकलेला होता, तो मोबाईल क्रमांक तुम्हाला या रखान्यांमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जो पॉलिसी नंबर आहे तो, पॉलिसी नंबर रखान्यांमध्ये टाकायचा आहे.

📍 आता या ठिकाणी पॉलिसी नंबर हा कुठून मिळेल ते बघूया : तर मित्रांनो तुम्ही एल आय सीचा प्रीमियम म्हणजेच एलआयसीचा हप्ता याआधी भरलेला असेल आणि हप्ता भरण्याची पावती तुम्हाला मिळालेली असेल. तर त्या पावती वर ती तुम्हाला एका ठिकाणी पहिला रकाना दिसेल तो पॉलिसी नंबर आणि नेम असा त्या ठिकाणी दिसेल. त्या खाली तुमचा जो पॉलिसी क्रमांक आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. त्या क्रमांकाचे खाली तुमचं नाव असेल तर हा क्रमांक आहे हा तुमचा पॉलिसी क्रमांक आहे.

आता आपण शेवटी ज्या ठिकाणी होतो, त्याठिकाणची संपूर्ण माहिती भरून घेऊ. तर त्या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती भरलेली आहे.

>  त्यानंतर पॉलिसी नंबर टाकल्यानंतर त्या ठिकाणी “Add पॉलिसी” म्हणून पर्याय तुम्हाला दिसेल. तर या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची पॉलिसी तुम्हाला त्याठिकाणी ॲड झालेली दिसून येईल. त्यानंतर तुम्हाला खाली एका ठिकाणी छोटासा बॉक्स दिसेल त्या चेक बॉक्स वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कॅपच्या कोड दिसेल हा कॅपचा कोड तुम्हाला जसाच्या तसा टाकायचा आहे. कॅपचा कोड टाकल्यानंतर खाली “गेट ओटीपी ” म्हणून पर्याय दिसेल तर त्या पर्यायावर ती क्लिक करायचं आहे.

>  त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन प्रकारचा पेज त्या ठिकाणी ओपन होईल आणि तुमच्या मोबाईल मध्ये एस एमेस स्वरूपामध्ये तुम्हाला एक otp क्रमांक प्राप्त होईल, तो ओटीपी क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी रखान्यांमध्ये टाकायचा आहे. ओटीपी क्रमांक टाकल्यानंतर खाली “सबमिट” म्हणून बटन दिसेल. ता बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन दिसेल, त्यामध्ये असं लिहिलं असेल की “रिक्वेस्ट फॉर पॅन रजिस्ट्रेशन रिसीव्हड” अशा प्रकारचे मेसेज तुम्हाला स्क्रीन वर दिसेल. म्हणजेच याचा अर्थ असा की तुमची पॅन कार्ड एल आय सी ला लिंक करण्याची रिक्वेस्ट ही एलआयसी ला प्राप्त झालेली आहे असा याचा अर्थ होतो.

आता ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर पॅन कार्ड एलआयसी ला लिंक होण्यासाठी काही अवधी हा लावू शकतो.

📍त्यानंतर तुमच्या एल आय सी पॉलिसी सोबत तुमचं पॅन कार्ड क्रमांक लिंक झालेला आहे की नाही हे चेक कसं करायचं? ते आपण पाहूया.
हे चेक करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा आपण जी वेबसाईट आधी ओपन केलेली होती त्याच वेबसाईटला ओपन करायचा आहे. आणि “ऑनलाईन पॅन रजिस्ट्रेशन” या ऑप्शन वरती क्लिक करून त्याच पेज वरती खालच्या बाजूस “क्लिक हेअर” हा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्या पेजवर तुम्हाला “चेक पॉलिसी स्टेटस” असा ऑप्शन दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर जे पेज तुमच्या समोर ओपन होईल तिथे सर्वप्रथम तुम्ही तुमचा पॉलिसी नंबर टाकायचा आहे.

त्याखाली तुमची जन्मतारीख दिनांक , महिना आणि शेवटी वर्ष या फॉरमॅटमध्ये टाकायची आहे. त्यानंतर तुमचा पॅन कार्ड क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे. आणि त्यानंतर तिथे दिलेला कॅप्टचा कोड जसाच्या तसा त्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. आणि त्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करायचं आहे हि संपूर्ण माहिती भरून झाल्यावर “सबमिट बटन” वर क्लिक करा. सबमीट बटन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर “अवेलेबिलिटी स्टेटस” म्हणून एक पेज ओपन होईल आणि या ठिकाणी तुमचा एलआयसी पॉलिसी क्रमांक तुम्हाला दिसून येईल आणि या ठिकाणी “युवर पॅन डिटेल अवेलेबल इन अवर रेकॉर्ड as per इनपुट प्रोव्हाइडेड पॉलिसी नंबर” अशा प्रकारचा मेसेज तुमच्या पॅन कार्ड सोबत तुमची एलआयसी पॉलिसी ही लिंक झाल्यानंतर त्या ठिकाणी दिसून येईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या एलआयसी पॉलिसी सोबत पॅन कार्ड लिंक करू शकता.