एक शेतकऱ्याच्या मुलाचा ३ वेळा अनुत्तीर्ण ते IAS (कलेक्टर) पर्यंतचा प्रवास ।। तुकाराम मुंढे यांचा जीवनप्रवास !!

लोकप्रिय शैक्षणिक

एका शेतकऱ्याचा मुलगा IAS (कलेक्टर) झाला, खेड्यातून शहरात शिकायला आल्यावर कल्चरल शॉक मधून स्वतः ला सावरून, जिद्द आणि चिकाटी च्या भरवश्यावर महाराष्ट्र राज्य लोक सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. तुकाराम मुंढे, बीड जिल्ह्यातील एका खेड्यात राहत असत, दहावी पर्यंत च शिक्षण तिथेच झालं, दहावी नंतर ते औरंगाबाद ला पुढील शिक्षणासाठी आले. शहरात आल्यावर जेव्हा ते पहिल्यांदा चित्रपट पाहायला गेले तेव्हा त्या चित्रपटातील नायकाचा त्यात मृत्यू झाल्याच दाखवलं.

नंतर दोन तीन महिन्यांनी जेव्हा ते परत चित्रपट पाहायला गेले तेव्हा तोच नायक जिवंत असल्याचं त्यांना दिसलं, हे कसं काय शक्य आहे, सिनेमा मध्ये मेलेला माणून जिवंत कसा काय होऊ शकतो हे समजण्या इतपत देखील त्यांना माहिती नव्हती, यामुळे खेड्यातून शहरात आल्यावर अशा अनेक गोष्टींचा त्यांना सामना करावा लागला. अकरावी बारावी विज्ञान शाखेतून अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केलं. लहानपणापासून भावाने त्यांना तुला IAS (कलेक्टर) व्हायचंय अस सांगितलं होतं.

पण ते कसं व्हायचं, काय करायचं आणि काय नाही हे त्यांना माहीत नव्हतं. तुकाराम मुंढे यांचे वडील शेती करत, आठवडाभर शेतात कामं करायची आणि आठवडी बाजारात नेऊन भाजीपाला विकायचा त्यामधून मिळालेल्या पैशातून दोन वेळच जेवण मिळायचं. गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती पाहूनच त्यांना शिक्षण मिळालं. ऐंशी नव्वद च्या काळात जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक कमी आणि विद्यार्थी जास्त अशी परिस्थिती त्यात गणित आणि विज्ञान या विषयांना तर शिक्षक मिळणे देखील कठीण होते.

आणि अशातच घरची परिस्थिती हलाकीची होती, आई वडील कर्जबाजारी होते, शेतात उत्त्पन्न मिळत नव्हत कारण शेतीची मशागत करायला कुणी नव्हतं, पैसा नव्हता, त्यामुळे वयाच्या नवव्या वर्षापासूनच त्यांना शेतीची कामे करावी लागली. जेणेकरून घराला आर्थिक मदत होईल, मोठा भाऊ हा बीड ला शिक्षण घेत होता तेव्हा त्यांना महिन्याला दोनशे रुपये पाठवायला देखील यांना कसरत करावी लागत असे.

शेती मध्ये पाणी  देण्यासाठी मोटारपंप बसवले होते पण दिवसभर वीज बंद असायची अशा परिस्थितीत रात्री जाऊन शेतीला पाणी द्यावं लागायचं. मात्र तुकाराम मुंढे सांगतात की याच परिस्थिती मुळे त्यांना कष्ट करण्याची सवय लागली, आयुष्यात काहीतरी करण्यासाठी आपण पावलं उचलली पाहिजेत अस त्यांना वाटू लागलं आणि याच सवयी मुळेच त्यांना पूढे फायदा झाला.

दहावी पर्यंत च शिक्षण घेतल्यावर त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना औरंगाबाद ला नेलं, तिथे गेल्यावर शहरात राहायचं कस, वागायचं कसं, जेवायचं कस हे देखील त्यांना शिकावं लागलं. मोठ्या भावाची कलेक्टर व्हायची इच्छा होती परंतु आर्थिक परिस्थिती मुळे त्यांना ते करता आलं नाही आणि म्हणून ती इच्छा त्यांनी त्यांचा लहान भावाकडे व्यक्त केली, तेव्हा त्यांना कलेक्टर काय असत, ते कसं व्हायचं असत हे देखील माहीत नव्हतं.

पण जे ठरवलं ते करायचं अस मनाशी ठेऊन त्यांनी वाटचाल चालू केली. मोठे भाऊ शिकवणी घ्यायचे, त्यातून मिळणाऱ्या पैशातून स्वतःचा आणि लहान भावाचा शाळेचा व राहण्याचा खर्च भागवत असत, अनेकदा आपल्या लहान भावाला खायला मिळावं म्हणून ते स्वतः एक वेळ च जेवत असतं. गावामध्ये अनेक विषयात जसे की इंग्रजी, संस्कृत यांचा सहवास देखील नव्हता ते विषय शहरात आल्यावर ते शिकले, इंग्रजी बोलण्यासाठी स्पोकन इंग्लिश, व्याकरण याचा अभ्यास केला.

नंतर भावाची तहसीलदार म्हणून निवड झाल्यानंतर जे शिकवणी ते घ्यायचे ते तुकाराम मुंढे यांनी स्वतः दोन वर्षापर्यंत चालवले. कारण शिकवताना जो अभ्यास करावा लागायचा त्याचा फायदा त्यांना पुढे झाला. बारावी नंतर कला शाखेत प्रवेश केला, आपण आपल्या  ध्येयापासून दूर तर जात नाही आहोत ना याची काळजी घेतली आणि अस करतच त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. याच दरम्यान त्यांनी संघ लोक सेवा आयोगाची परीक्षा दिली पहिल्या प्रयत्नात ते  PRELIM पास झाले व MAINS ला नापास झाले.

नंतर परत PRELIM दिली यावेळी पुन्हा PRLIM पास झाले आणि MAINS नापास झाले पण आधी पेक्षा जवळपास शंभर गुण जास्त आले होते आणि म्हणून पुन्हा परीक्षा दिली आणि यात ते दोन्ही परीक्षा पास झाले, मुलाखत दिली पण आताही अंतिम निवड झाली नाही. याच दरम्यान त्यांनी Ph.D केली, आणि एक शेवटचा प्रयन्त म्हणून पुन्हा संघ लोक सेवा आयोगाची परीक्षा देण्याच ठरवलं.

परंतु याच दरम्यान राज्य लोक सेवा आयोगाच्या  परीक्षेसाठी जाहिरात आली, आणि त्यांनी  फॉर्म भरला, यात ते पहिल्याच प्रयत्नात पास झाले, पण इतक्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी एक शेवटचा प्रयत्न म्हणून पून्हा संघ लोक सेवा आयोगाची परीक्षा दिली आणि या  प्रयत्नात ते पास देखील झाले. आधी दोन्ही टप्पे पास झाले असल्यामुळे यावेळी आत्मविश्वासाने ते या मध्ये पास झाले.

नंतर एप्रिल मे २००५ च्या मुलाखत दिली आणि जेव्हा निकाल आला तेव्हा ते संपुर्ण भारतात विसावे आले होते तो दिवस होता 11 मे २००५. दुसऱ्याच दिवशी सर्व वृत्तपत्रांमध्ये शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर म्हणून बातमी छापून आली. तेव्हा एवढे दिवस केलेले कष्ट गावापासूनचा शहरापर्यंत आणि तिथून शिक्षणासाठी मुंबई ला केलेल्या प्रवासच  खऱ्या अर्थाने सार्थक झालं असं त्यांना वाटलं. 

तुकाराम मुंढे म्हणतात, पण हा प्रवास इथेच थांबत नाही तर इथून खरा प्रवास सुरु होतो, ज्या ध्येयासाठी हा प्रवास होता ते ध्येय म्हणजे समाजासाठी काहीतरी करणे हे साध्य करण्यासाठी मी नेहमीच काम करत राहील. तसेच ते सांगतात की अनेक तरुण तरुणी या आपल्या ध्येयापासून वंचित आहेत, यामुळे त्यांना त्यांचा उद्दिष्ट साध्य करता येत नाही. म्हणूनच नेहमी आपल्या ध्येयावर केंद्रित राहा,चिकाटीने प्रयन्त करा, हार मानू नका, विचलित होऊ नका. तुम्ही देखील एक दिवस तुमचे ध्येय साध्य करू शकता.