तुमच्या देखील आयुष्यात वेळेचे नियोजन न केल्यामूळे सतत अडचणी येतात का? ।। वेळेचे नियोजन कसे करावे? ।। जाणून घ्या १० टिप्स ज्याद्वारे तुम्ही देखील वेळेचे महत्व जाणून यशस्वी व्हाल !

प्रवास लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

वेळेचे नियोजन कसे करावे? : या जगात सर्वात मौल्यवान आणि महत्वाची गोष्ट जर काही असेल तर ती आहे टाइम् (Time). जगातील सर्व संपत्ती देऊनही गेलेला एक क्षण एक सेकंदही आपण परत मिळू शकत नाही. एकदा गेलेली वेळ परत येत नाही. त्यामुळे आपल्याकडे असलेला वेळ आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे असते, तर टाईम मॅनेजमेंट कसे करावेत आणि आपला वेळ आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी कसा वापरावा त्यासाठी दहा टाईम मॅनेजमेंट टिप्स देणार आहे.

टिप नंबर. 1: ध्येय निश्चित करा : ध्येय निश्चित करणे हे सर्वात मोठे कारण आहे की आपण आपल्या वेळेचा योग्य वापर नाही करू शकत आणि टाळाटाळ करतो. जोपर्यंत तुम्ही तुम्हाला काय करायचे आहे ह्या गोष्टीला घेऊन कन्फ्युज रहाल तोपर्यंत तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत राहाल. त्यामुळे तुम्हाला काय करायचे आहेत हे क्लिअर असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला समजणारच नाही तुमच्याकडे असलेल्या वेळेचा वापर कुठे करावा. तुम्हाला पण तुमच्या लाईफ मध्ये सक्सेस होण्यासाठी आणि तुमच्या वेळेचा वापर योग्य ठिकाणी करण्यासाठी तुमचे गोल आणि टारगेट बद्दल एकदम क्लिअर ठेवावे लागेल.

टिप नंबर 2 कामाची लिस्ट(List) बनवा : रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला उद्या काय काम करायचे आहे त्याची एक स्पष्ट आणि व्यवस्थित यादी बनवा. प्लॅनिंग साठी दिलेला प्रत्येक मिनिट हा काम करताना तुमचे कमीत कमी दहा मिनिटे वाचत असतो आणि प्रत्येक दिवशी कोणती काम पूर्ण करायची आहे याची लिस्ट बनवा तयार करून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर काहीच विचार न करता त्या कामाला हात घाला काम संपेपर्यंत थांबू नका.

एक काम झाल्यानंतर झालेल्या कामावर मार्क करा आणि लगेच दुसऱ्या कामाला सुरुवात करा. या लिस्ट नुसार काम कराल तर तुम्ही इतर गोष्टींमध्ये वेळ वाया घालवणार नाही. त्याच वेळेस तुम्हाला तुमची कामे योग्य रित्या पूर्ण होत आहेत की नाहीत हे देखील समजेल. तुम्ही काय काय केलं आणि काय काय करणे बाकी आहे हे देखील तुमच्या समोर असेल.

टिप नंबर.3 :सर्वात महत्वाचे काम सर्वात आधी करा : तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जी कामाची लिस्ट बनवाल कामाच्या महत्त्वानुसार आणि अर्जन्सी नुसार अरेंज करणे म्हणजे सर्वात आधी लिस्टमध्ये असे अशी कामे लिहा आणि सर्वात महत्वाचे आहेत आणि अर्जंट आहे त्यानंतर त्यापेक्षा कमी महत्त्वाची असणारी कामे लिहा. त्यामुळे तुम्ही इम्पॉर्टन्ट कामे पूर्ण कराल आणि त्यामुळे योग्य वेळी महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कमी महत्त्वाची कामे लिस्टमध्ये महत्त्वाच्या कामाच्या नंतर येतील त्यामुळे तुमचा वेळ कमी महत्त्वाच्या कामावर वेस्ट होणार नाही.

तुम्ही तुमचे काम च्या ग्रुपमध्ये करू शकतात : पहिल्या ग्रुप मध्ये :अशी कामे असतील ते अत्यंत आवश्यक आहेत आणि खूप अर्जंट आहेत, त्यांना लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक असते नाहीतर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. उदाहरण : दिलेले वेळेआधी प्रोजेक्ट पूर्ण करणे, ऑफिसचे काम करणे, सांगितलेली काम करणे, इत्यादी.

दुसर्‍या ग्रुपमध्ये :अशी कामे असतील महत्वाची तर आहे पण पहिल्या ग्रुप पेक्षा जास्त महत्वाची नाही. ती कामे करायची तर आहेत पण पहिल्या ग्रुप पेक्षा जास्त महत्वाची नाहीये. जोपर्यंत पहिल्या ग्रुपमधले कामे पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसऱ्या ग्रुप मधल्या कामांना हात लावायचा नाही. जेव्हा जास्त महत्वाचे काम पूर्ण होतील तेव्हाच या कामांना हात लावायचे. उदा. फोन रिचार्ज ज्याची शेवटची तारीख लांब आहे इ.

तिसरा ग्रुप मध्ये :अशी कामे लिहा जी तुम्हाला करायची आहेत, करायला आवडतात ,पण ती कामे केली नाही केली तरी जास्त फरक पडणार नाही. या कामाचा उपयोग ध्येय प्राप्तीच्या दृष्टीने शून्य असेल. उदाहरण :न्यूज पेपर रीड करणे, आवडता शो बघणे, सोशल मीडिया चेक करणे, व्हिडीओ बघणे इत्यादी. दुसरा ग्रुप मधील कामे झाल्याशिवाय ही कामे करायची नाहीत.

चौथा ग्रुपमध्ये : अशी असतील की तुम्ही इतरांवर सोपवू शकतात, हे काम तुम्ही इतरांकडून करून घेऊ शकता आणि स्वतःचा वेळ वाचवू शकता, जी जी कामे इतर कुणीही करू शकतं, ते कामे इतरांवर सोपवा. जेणेकरून तुम्हाला तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी वेळ मिळेल. उदाहरण बिल भरणे, मार्केट मधून सामान आणणे इत्यादी गोष्टी.

टिप नंबर 4 कामाची डेडलाईन निश्चित करा : कोणतेही काम वेळेच्या आधी किंवा योग्य वेळेत पूर्ण करण्यासाठी त्या कामाला एक डेडलाईन देणे आवश्यक असते. तर आपण ते काम पूर्ण करण्याला जास्त महत्त्व देणार नाही आणि टाळाटाळ करणारा. कारण ते काम पूर्ण करण्याची फिक्स वेळ नाही आहे.

बिल भरण्याची शेवटची तारीख असते, त्यामुळे आपण काळजीने त्या तारखेआधी आपले बिल भरून टाकतो. नंतर आपल्याला फाईन पे करावा लागतो, ही स्ट्रॅटेजी तुम्हाला तुमच्या कामांमध्ये युज करायची आहे. प्रत्येक काम तुम्हाला कधी आणि किती वेळ करायचे आहे हे आधी डिसाइड करा म्हणजे तुमचे काम लेट होणार नाही आणि सर्व काम योग्य वेळेत पूर्ण होतील.

टिप नंबर 5 फक्त प्लॅनिंग नाही तर कामही करा : या चारही टिप्स टाईम मॅनेजमेंट चा प्लान बनवण्याबद्दल होतात. पण तुम्ही फक्त प्लान बनवून ठेवणार आणि त्यावर कोणतेही ॲक्शन घेणार नाही तर त्याचा काहीच अर्थ राहणार नाही . तर प्लॅनिंग शिवाय केलेले काम आणि कामाशिवाय केलेली प्लॅनिंग तुम्हाला अपयश येईल.

कामाचे नियोजन केल्या नंतर त्यावर लगेच ॲक्शन घ्या. एकानंतर एक काम पुर्ण करत राहा नाहीतर तुम्ही केलेल्या प्लॅनिंग ला काही अर्थ राहणार नाही. शेवटी तुम्ही तुमच्या प्लॅन्स वर घेतलेली ॲक्शन तुम्हाला रिझल्ट्स देतील आणि यशस्वी बनवतील या सर्व टिप्स मधून ॲक्शन (action)हा पॉईंट सर्वात महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्या.

टिप नंबर 6 तुमचा वेळ कुठे वाया जात आहेत हे लक्षात घ्या: आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला डिस्ट्रॅक्ट (विचलित) करतात त्या गोष्टीवर आपण आपला अमुल्य वेळ वाया घालवतो, मोबाईल फोन हातात आल्यानंतर यामध्ये अशा अनेक गोष्टी तुम्हाला तुमचा वेळ खर्ची घालवण्यासाठी सापडतील, फेसबुक(facebook) आहे टिक टोक(tik tok), व्हाट्सअप(what’s app ), युट्युब (YouTube )वर आपण आपला वेळ खर्ची घालवतो आणि इम्पॉर्टंट कामे अपूर्ण सोडून देतो.

वेळेचा योग्य वापर करायचा असेल तर अशा गोष्टी पासून तुम्हाला दूरच राहावे लागेल, या गोष्टी महत्त्वाची सर्व कामे संपल्यानंतर करायला पाहिजे .परंतु एका मर्यादेत जो व्यक्ती सोशल मीडियाचा वापर इंटरटेनमेंट साठी कमी आणि एज्युकेशन साठी जास्त करतो, तोच आपला वेळ योग्य प्रकारे युटीलाईज करत आहे, बाकीचे टाईम वेस्ट करत आहे.

टिप नंबर 7 सकाळी लवकर उठा आण एक्स्ट्रा वेळ मिळवा : स्वतःची महत्त्वाचे काम लवकर संपवण्यासाठी सकाळी लवकर उठण्याची सवय लावा. सकाळी लवकर उठणे एक चांगली सवय आहे. तसेच त्याचे टाईम मॅनेजमेंट बाबतीतही अनेक फायदे आहेत. उदाहरण: जर तुम्ही रोज सकाळी सात वाजता उठत असाल, तर तुम्ही एक तास अगोदर म्हणजेच सहा वाजता उठण्याची सवय लावली, तर आधीपेक्षा तुमच्याकडे एक तास एक्स्ट्रा असेल,

तुम्हाला तुमची महत्त्वाची कामे करण्यासाठी तुमचे ध्येय प्राप्त करण्यासाठी एक एक्स्ट्रा तास मिळेल वर्षाचे 365 तास तुमच्याकडे असतील. सर्वात महत्वाचे काम सकाळी उठल्यानंतर लवकर करा. कारण सकाळी आपल्या ब्रेन ची पावर सर्वात हाय असते. त्यावेळेस तुम्ही तुमचे बेस्ट कराल त्यावेळेस तुमचे ब्रेन पूर्णपणे फोकस करत असेल यामुळे तुमच्या कामाची कॉलिटी देखील वाढेल.

टिप नंबर 8 यावेळी माझ्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट (महत्वाचे) काय आहे हा प्रश्न नेहमी स्वतःला विचार : तुम्ही तुमचा टाईम वेस्ट करत असाल तेव्हा हा प्रश्न तुम्हाला राइट ट्रॅक वर पण घेऊन येईल. तुम्ही टिक टोक वर व्हिडिओ बघत असाल तेव्हा हा प्रश्न स्वतःलाच विचारा कि या वेळेला माझ्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट काय आहे? लगेच तुम्हाला योग्य उत्तर मिळेल. तुमची एक्झाम जवळ असेल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही आता अभ्यास करायला पाहिजे

हे उत्तर मिळाल्यानंतर लगेच सर्व सोडून द्या आणि अभ्यासाला लागा. हा प्रश्न तुम्ही जर टाईमपास करत असाल तर तुम्हाला योग्य काम करायला जे काम तुमच्या साठी महत्वाचे आहेत ते काम करायला भाग पाडेल. शक्य असल्यास हा प्रश्न घरात भिंतीवर लावा म्हणजे तुम्हाला नेहमी बघून काम करण्याची आठवण राहील आणि तुम्ही वेळ वाया घालवणार नाही.

टिप नंबर 9 नाही म्हणायला शिका : अनेक वेळा काय होते की आपण असे काम करण्यामध्ये व्यस्त होतो ज्याचा आपल्याला काहीच फायदा नसतो म्हणजे दुसऱ्या ची कामे, काय असं आपल्याला काम करण्यासाठी सांगतात आणि तेच काम आपण आपला स्वतःचा वेळ देऊन करत असतो, यामुळे आपल्या वेळेचे व्यवस्थापन पूर्णपणे बिघडते. आपली कामे करण्याच्या वेळी आपण इतरांची कामे करतो आणि आपले काम अपूर्णच राहते, आपला वेळ जातो,

एक्स्ट्रा मेहनत करण्यात दुसर्‍याच्या फायद्यासाठी जाते,आपली महत्त्वाची कामे अपूर्ण राहतात आणि आपला फायदा काहीच होत नाही उलट नुकसानच होते, की इतरांना त्यांच्या कामात मदत करू नका असे म्हणत नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की, जर कोणी तुम्हाला नेहमी कामे सांगत असेल आणि तुम्ही ते काम तुमच्या महत्त्वाच्या कामांना बाजूला ठेवून करत असाल,

तर तुमच्यासाठी योग्य नाही त्यामुळे मित्रांचे मन ठेवण्यासाठी स्वतःचे काम बाजूला ठेवून ही त्यांची कामे करत बसू नका. तुमचे काम महत्त्वाचे आहेत त्यामुळे इतरांना योग्य वेळेवर नाही म्हणायला शिका, आधी तुमचे काम पूर्ण करा आणि मग तुमच्याकडे शिल्लक वेळ असेल तेव्हा इतरांचे काम करा परंतु जे काम तुमच्या महत्त्वाच्या कामात येऊन अडथळा आणून नुकसान करत असाल तर नाही म्हणा.

टिप नंबर.10: वेळेचे महत्व समजून घ्या : या ट्रीपमध्ये वेळेचे महत्व समजून सांगणारे थॉटस सांगणार आहे. ज्या व्यक्तीला वेळेच्या महत्त्वाची जाणीव असते, तो एकही क्षण वाया घालवत नाही, तोच टाईम मॅनेजमेंट करू शकतो . तुम्ही जर आता वेळ मारत असाल, तर भविष्यात वेळ तुम्हाला मारेल आणि असं मारेल की पुन्हा उठायला तुमच्याकडे वेळ सुद्धा नसेल. घड्याळ सतत धावत आहे त्याच्यासोबत धावत राहा नाहीतर मागे राहून जाल.

वेळ कोणासाठी थांबत नाही, तुम्ही थांबले तर तुम्ही संपाल. कारण जो थांबतो, तो संपतो. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. जे करायचं ते आज नाही, तर आत्ताच करा. हा क्षण परत मिळणार नाही. वेळ वाया गेला तर आयुष्य वाया जाईल. वेळेला सहजपणे घेऊ नका. जगातील सर्व पैसे देऊनही गेलेला एक क्षण परत मिळवता येत नाही. मित्रांनो या टिप्सचा वापर करून तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण योग्य प्रकारे वापरा.

तुम्हाला आजचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. वरील टिप्स मध्ये काही टीप राहून गेल्या असल्या तर त्या देखील आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.