पावसाळ्यात अंगावर वीज पडू नये म्हणून काय काळजी घ्यायची?।। आपल्या अंगावर वीज कधी पडू शकते हे कसं ओळखायचं? ।। वीज अंगावर पडल्यास त्या व्यक्तीला प्रथमोपचार काय आणि कसे द्यावे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

प्रवास बातम्या लोकप्रिय शेती शैक्षणिक

अनेकवेळा पावसाळ्यात वीज अंगावर पडल्या मुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या आपल्या कानावर येतात. इतकच काय तर आपल्यापैकी, आपल्या मित्रमैत्रिणी पैकी, आपल्या नातेवाईक पैकी एखाद्याचा वीज पडून मृत्यू झाल्याचे काहींचे अनुभव असतील. वीज पडून फक्त शेतकरी, जनावर घाबरतात असे नाही तर झाडं, इमारत यांचंही नुकसान होते.

त्यामुळे विजेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण वैयक्तिक स्तरावर काळजी घेणं गरजेचं असतं. या मध्ये आपण वीज अंगावर पडू नये म्हणून काय काळजी घ्यायची? हे आज बघनार आहोत. वीज अंगावर पडू नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? तुम्ही घरात असाल, किंवा घरा बाहेर असाल, तर तुम्ही नक्की काय काळजी घेतली पाहिजे? आणि जर एखाद्या व्यक्तीच्या अंगावर वीज पडली असेल, तर तुम्ही प्रथमोपचार कसा करू शकता? याची माहिती आपण पाहणार आहोत.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अर्थात एन‌ सी आर बी यांच्या आकडेवारी पहिल्यास, भारतात २०१७ मध्ये २८८५, २०१८ मध्ये २३५७, २०१९ मध्ये २८७६. इतक्या जणांचा वीज पडल्यामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे विजेमुळे होणारा मृत्यू ची संख्या लक्षात घेता, भारताच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

त्यामुळे वीज आपल्या अंगावर पडू नये, यासाठी काय खबरदारी घ्यायला पाहिजे याची सविस्तर माहिती दिली आहे. जर तुम्ही घराबाहेर असताना वीज पडण्याचा धोका असेल तर काय करायला हवे, ते बघूया: पहिले म्हणजे विजा चमकत असताना जर घराबाहेर असाल तर लगेच सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्या. बंदिस्त इमारत, गुहा, खड्डा हा सुरक्षित होऊ शकतो.

सुरक्षित आश्रय उपलब्ध झाला नाही. तर उंचीच्या जागी आश्रय घेणे टाळा. जसं की टेकडी, पर्वत, इ यांच्या खाली आश्रय घेऊ नका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वीज चमकत असताना, मोठ्या झाडाखाली आश्रय घेणे टाळावे. कारण उंच झाडे वीज स्वतः कडे आकर्षित करतात. पण जर तुम्ही शेतात काम करत असाल.

आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यायला तुमच्याकडे वेळ नसेल तर दोन्ही पाय गुडघ्या जवळ घेऊन खाली बसा आणि कानावर हात ठेवा. आणि तुमचा आणि जमिनीचा कमीत कमी संपर्क येईल, याची खात्री करून घ्या. कार्यालये, दुकानं यांची दारं खिडक्या बंद करा. जर तुम्ही गाडीत असाल, तर काचा बंद करा.

विज चमकत असताना तुम्हाला विद्युत प्रभार जाणवल्यास, अंगावरील केस उभे राहिल्यास, त्वचेला मुंग्या किंवा झिनझिन्या आल्यास तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता असते. अशा वेळी त्वरित जमीनीवर उनवे व्हा किंवा गुडघ्यावर मान धरून बसा. धातूंच्या वस्तू जसं छत्री, चाकू, भांडे, यापासून दूर राहा. धरणं, तलाव, अशा पाण्याचा ठिकाणापासून लांब रहा.

टेलिफोन किंवा विजेच्या खांबा खाली थांबू नका. ते विजेला आकर्षित करतात. वीजा चमकत असताना मोबाईल फोनचा वापर कधीच करू नका. लोखंडी रॉड असलेले छत्री वापरू नका. जर तुम्ही चार ते पाच जण एकाच ठिकाणी असाल तर एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर रहा. सायकल, मोटरसायकल, उघडं ट्रैक्टर यांच्यावरील प्रवास करू नका.

तुम्ही जर घरात असाल, तर तुम्ही काय करायचं? आणि नेमकं काय करायचं नाही, ते आपण बघूया :  हवामान खराब असल्यास शेतातल्या कामासाठी, म्हणजे जनावरे चरण्यासाठी किंवा मग मासेमारीसाठी तुम्ही जाऊ नका. घरात थांबा आणि प्रवास टाळा. घराच्या खिडक्या दारे यापासून लांब राहा. धातूच्या वस्तूंचा वापर करू नका.

वीज चमकत असताना विद्युत उपकरणे चालू करू नका. जसं हेअर ड्रायर, विद्धूत रेजर, कारण जर वीज तुमच्या घरावर कोसळली, तर तुम्हाला विजेचा धक्का बसू शकतो. टेलिफोन चा वापर टाळावा. कारण टेलिफोन च्या घरांवर वीज पडू शकते. मुलं आणि पाळीव प्राणी घरात असल्याची खात्री करून घ्या.

वाहत्या पाण्याची संबंधित अशी कोणतीही गोष्ट करू नका. यात जसं की आंघोळ असेल,धुनी- भांडी असेल, ते करू नका. कारण विजेचा प्रवाह हा इमारतीचा प्लंबिंग आणि धातूच्या पाईप मधून होऊ शकतो. या व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर टाळा.

वीज अंगावर पडल्यास त्या व्यक्तीला प्रथमोपचार काय आणि कसे द्यावे? : एखाद्या व्यक्तीच्या अंगावर वीज पडल्यास तुम्ही त्यावर प्रथम उपचार करू शकता. याद्वारे तुम्ही जिव जिव वाचवू शकता. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे एखाद्या व्यक्ती च्या अंगावर जर का वीज पडली. तर तुम्ही त्याला स्पर्श करू शकता असा स्पर्श करा सुरक्षित असतं.

आता प्रथम उपचार करताना सर्वांत पहिली बाधीत व्यक्तीचा श्‍वास सुरू आहे ना, हृदयाची ठोके सुरु आहेत का ते अगोदर तपासून पहा. जर व्यक्ती चा श्वास थांबला असेल, तर त्या व्यक्तीच्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वास द्या. हृदयाचे ठोके थांबले असल्यास कार्डियाक कम्प्रेशन चा वापर करा.

या सोबत इतर काही जखमा म्हणजे अंगावर जर काही भाजल्याच्या खुना असतील हाडांच्या इजा असतील तर त्या तुम्ही तपासून पहा. गरज पडल्यास संबंधित व्यक्तीला त्वरित दवाखान्यात घेऊन जा. आणि सर्वात शेवटी गरज पडल्यास १०७८ या नंबर वर संपर्क करा. त्या नंबर वर हा जो बाधीत व्यक्ती आहे हा कोणत्या ठिकाणी आहे? त्याला नेमकं काय त्रास झाला? ते तुम्ही सांगा. आणि शक्य असल्यास हॉस्पिटल मध्ये घेऊन जा.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.