आपण व्हाट्सअपवरून रोज अनेक मॅसेज पाठवत असतो. हे मेसेज सेंड करत असलेले मॅसेजसाठी व्हाट्सअप हे जगभरातील आपल्या सेंटरमध्ये शक्तिशाली कॉम्प्युटर वापरत असते. मात्र, आपल्याला हे सगळे फुकट मिळत असतं. आपण त्याच्यासाठी पैसे देत नाही. भारतामध्ये व्हाट्सअपचे दरमहा 50 कोटींपेक्षा ऍक्टिव्ह युजर आहेत. मग व्हाट्सअप पैसे कसे कमवता? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
2009 मध्ये जॅम कूम और ब्रायन एक्टन या दोघांनी व्हाट्सअप बनवलं. सुरुवातीच्या काळात आयफोनवरती हे अँप लॉन्च झालं. सुरवातीला काही देशांमध्ये हे ॲप डाऊनलोड करायला एक डॉलर लागायचा. पुढच्या वर्षांमध्ये मग पैसे भरून याच सभासद व्हावं लागतं होत, मात्र 2019 मध्ये आत्ताची meta आणि तेव्हा फेसबुक असणारे कंपनीने 19 अब्ज डॉलर्सला व्हॉट्सऍप कंपनी विकत घेतली आणि त्यानी ही सभासद फी बंद केली.
फेसबुक आणि इंस्टाग्राम हेदेखील याच meta च्या मालकीचे आहेत. आपण वापरत असलेले व्हाट्सअप अकाउंट फ्री असतात. व्हाट्सअप वरती चैनल सुरू करणे देखील फ्री आहे. ज्याद्वारे अनेक संस्था, इतर संघटना तुमच्यासारख्या शेकडो-हजारो सभासदांना एकावेळी मॅसेज पाठवू शकतात. व्हाट्सअप बिजनेस ॲप म्हणजे एप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसवरून या कंपनीला महसूल मिळतो.
म्हणजे लहान-मोठे उद्योग त्यांच्या कॉर्पोरेट कस्टमर सोबत म्हणजे ग्राहकांस सोबत संभाषण करण्यासाठी जे अकाउंट वापरतात त्यांच्याकडून व्हाट्सअपला पैसे मिळतात. प्रत्येक ग्राहकाला सोबत वैयक्तिकरित्या संभाषण करता यावं, पैशाचा व्यवहार करता यावा यासाठी या कंपनीला व्हाट्सअपला पैसे द्यावे लागतात. म्हणजे आता अनेक ठिकाणी देशांमध्ये तुम्ही व्हाट्सअप वापरून मेट्रो तिकीट काढू शकतात, बस तिकीट काढू शकता. Meta कंपनीच्या बिझनेस मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष निखिल श्रीवास्तव सांगतात की, आमचा प्रयत्न असा आहे की उद्योगाला आणि त्यांच्या ग्राहकांना त्यांचे चॅट ट्रेडमध्ये सगळ्या गोष्टी करायला हव्यात, म्हणजे जर तुम्हाला तिकीट बुक करायचं असेल किंवा रिफड मिळवायचा असेल, पैसे भरायचे असतील तर या सर्व गोष्टी तुम्हाला त्या चॅटमधून बाहेर न पडता याव्यात.
एकाच विंडोमध्ये सगळं काम संपवून तुम्हाला तुमच्या इतर कामाकडे जाता आलं पाहिजे. व्हाट्सअप दोघांना आता सोय उपलब्ध करून देण्यात आलेले ज्यामध्ये उद्योगांना पैसे भरून अशी लिंक मिळवता येत आहे ज्यामध्ये फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर ऑनलाईन जाहिराती वरती क्लिक केल्यानंतर एक नवीन व्हाट्सअप सुरू होतो. त्याला म्हणतात क्लिक टू व्हाट्सअप. यामुळे उद्योगांना संभाव्य ग्राहकपर्यंत थेट पोहोचणं शक्य होतं. या सेवेतुन सध्या व्हाट्सअपला मोठा महसूल मिळतो.
गेल्या चोवीस तासांमध्ये एकूण किती कॉन्व्हर्सेशन सेशन्स झाली त्यापैकी ग्राहकाकडून किती सुरुवात करण्यात आली, कंपनीकडून सुरुवात करण्यात आलेला संवाद या सगळ्या नुसार या उद्योगाला पैसे आकारले जातात. व्हाट्सअप पे ही सेवा सध्या फक्त भारतात आणि ब्राझीलमध्ये पूर्णपणे सुरु आहे तर सिंगापूरमध्ये मर्यादित रित्या सुरू करण्यात आले. भारतामध्ये यूपीआय वापरून काम करते. याद्वारे तुम्ही तुमचा बँक अकाउंट ॲड करून व्हेरिफाय केलं व्यक्तीला पैसे पाठवू शकता. यासाठी व्हाट्सअप तुमच्याकडून पैसे घेत नसलं तरी त्यांना प्रत्येक ट्रांजेक्शन मागे बँकेकडून कमिशन मिळते.
चीन, उत्तर कोरिया, सीरियामध्ये व्हाट्सअपवरती बंदी आहे.
◆मग मेसेजसाठी वापरली जाणारी इतर अँप म्हणजे सिग्नल आणि टेलिग्राम अँप काय करतात?
यामधील वापरली जाणारी सिग्नल अँप त्यांच्या मेसेज सिक्युरिटी प्रोटोकॉलसाठी प्रसिद्ध आहे आणि आपण कधीही गुंतवणूकदार कडून पैसे घेतले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. हे अँप या पैशांसाठी देणग्यावर अवलंबून आहे आणि व्हाट्सअपचे संस्थापक असलेल्या यांनी 2018 मध्ये सिग्नलला पाच कोटी डॉलरची देणगी दिली होती. टेलिग्राम अँप मात्र पैशांवर अवलंबून आहे, शिवाय त्यांच्याकडे प्रेमियम सबस्क्रीप्शन मॉडेल आहे आणि जाहिराती देखील आहेत.