तापलेली सकाळ आणि दुपार आणि असह्य उकाडा आणि संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस असा चित्र महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी गेले काही दिवस दिसत आहे. देशात मान्सून परतला असे हवामान विभागाने 15 ऑक्टोबरला जाहीर केलं होतं. पण मग त्यानंतर देखील असा पाउस का पडतो? चला तर मग समजून घेऊया..
भारतामध्ये जून ते सप्टेंबर या काळात नैऋत्य दिशेकडे म्हणजे अरबी समुद्राकडून हिमालयाकडे वारे वाहतात. या वाऱ्यांना म्हटलं जातं नैऋत्य मोसमी वारे किंवा नैऋत्य मान्सुम. 2024 या नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या मान्सूनच्या कालावधीत गेल्या पाच वर्षांत मधल्या सर्वाधिक हेवि रेंनफॉलच्या म्हणजे अतिवृष्टीच्या घटना नोंदवण्यात आल्या. 1 जून 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या काळात भारतात 934.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आणि हे प्रमाण हा 868.6 मिनिटांच्या सरासरीपेक्षा अधिक असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
ऑक्टोबर महिन्यात देखील सरासरीच्या 115 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने आधीच दिला होता आणि अतिवृष्टी देखील पाहायला मिळाली. साधारण सप्टेंबरपासून मान्सून माघार घ्यायला लागतो आणि ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत देशांना मान्सूनची माघार पूर्ण होते. तसं हवामान विभाग जाहीर देखील करतो. त्यानुसारच 15 ऑक्टोबरला याविषयीची घोषणा करण्यात आली. पण मान्सून गेला असला तरी हवेत बाष्प असत आणि त्यामुळे ढगांची निर्मिती होऊन पाऊस असतो.
नैऋत्य मौसमी मान्सून गेल्याचे जाहीर करत असतानाच आणखीन एक गोष्ट हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आली ती म्हणजे एकीकडे नैऋत्य मोसमी वारे देशातुन बाहेर पडत असताना दुसरीकडे ईशान्य मोसमी वारेयांनी प्रवास सुरू केला. ऑक्टोबर महिन्यात ईशान्येकडून वारे वाहतात. याला ईशान्य मोसमी वारे म्हणतात. या वाऱ्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात प्रामुख्याने दक्षिण भारतात पाऊस पडत असतो. भारतात पडणाऱ्या एकूण पावसापैकी 80 टक्के पाऊस हा नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे होतो तर साधारण 11 टक्के पाऊस ईशान्य मोसमी वार्यांमुळे पडत असतो. ज्या वेळी या दक्षिण वाऱ्याचा जोर जास्त असतो त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी पाऊस पडतो. सांगली, सोलापूर, कोल्हापूरमध्ये यामुळे पाऊस पडतोय.
मान्सूनच्या आधी आणि नंतर कमी दाबाचा पट्टा आणि चक्रीवादळ निर्माण होणारी परिस्थिती असते. काही दिवसांपूर्वी अरबी समुद्र देखील एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झालं आणि म्हणूनच कोकण किनारपट्टीत पाऊस पडला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि किनारपट्टीवरही तामिळनाडूमध्ये पाऊस पडला. चेन्नई, बंगळुरूमध्ये झालेला प्रचंड पाऊस यामुळे होता. पुन्हा आता बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले हे चक्रीवादळ पश्चिम बंगाल या दिशेने जाणार असल्याचा अंदाज असला तरी त्याचा परिणाम विदर्भ पर्यंत जाणार का? याकडे पाहायला हवं.
या दरम्यान याच काळात उत्तरेकडे महाराष्ट्र कोरडेवाहू वारे यायला लागते आणि महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागेल..ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्कीच सांगा…