गेली अनेक दशकं मानवाला हा प्रश्न पडलेला आहे आणि याच शोधात काही मोहिमा देखील गेलेले आहेत. गुरु ग्रहाच्या चंद्राच्या दिशेने युरोपा क्लिपर हे अंतराळ यान झेपावले आहे. ही मोहीम फक्त युरोपावरती आयुष्याच्या खुणा शोधणार नसून जीवसृष्टी निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे का? हे देखील शोधणार आहे. पण गुरूच्या चंद्राचा दृष्टीने अभ्यास का केला जातोय? आणि इतका दूरचा प्रवास हे यान कसे करणार आहे? चला जाणून घेऊया..
गुरु ग्रह मुळात अतिशय वेगळा आहे. सौरमालेमधील हा सर्वात जुना आणि आकाराने सगळ्यात मोठा ग्रह म्हणून ओळखला जातो. कारण तो जर पोकळ असतात तर त्यात हजार पृथ्वी मावल्या असत्या. या गुरू ग्रहाला इंटरनॅशनल अस्त्रोनोमिकल युनियनने अधिकृत मान्य तब्बल 95 चंद्र आहेत. 1610 मध्ये इटालियन खगोलतज्ज्ञ गॅलेलियो गॅलिली यांनी पहिल्यांदा गुरुचे चार मोठ्या चंद्राचा शोध लावला आणि म्हणून यांना गॅलिलीयन सॅटेलाईट म्हटलं जातं. पृथ्वीपासून तब्बल 1.8 अब्ज महिलांचा अंतर पार करून हे या गुरूच्या युरोपा या चंद्रापर्यंत 2030 झाली पोहोचेल. युरोपाच्या पृष्ठभागाखाली प्रचंड मोठा समुद्र असून हे प्रमाण पृथ्वीवरच्या एकूण पाण्याच्या दुप्पट असल्याचा शास्त्रज्ञांचा कयास आहे.
पृथ्वीपासून 62.8 कोटी किलोमीटरच्या अंतरावर असणारा हा युरोपा चंद्र आपल्या पृथ्वीचे चंद्र पेक्षा थोडासाच मोठा आहे. पण जर हा युरोपा आपल्या आकाशात असता तर आपल्या चंद्राच्या तुलनेत पाचपट मोठा दिसला असता, कारण त्यावर ती गोठलेल्या स्वरूपातील पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने अधिक सूर्यप्रकाश परावर्तित झाला असता. या युरोपा चंद्राचा बर्फाळ कवच सुमारे 25 किलो मीटर जाडीचे आहे आणि या कवचाखाली खाऱ्या पाण्याचा मोठा समुद्र असल्याचा अंदाज आहे. शिवाय इथे अशी काही रसायने असू शकतात जीवसृष्टी बघण्यासाठी गरजेची असतात. युरोपा हा कदाचित जीवसृष्टीसाठी कदाचित पोषक असू शकतो, हे संशोधकांच्या लक्षात आलं 1970 च्या दशकात.
सौरमाला ओलांडून पलीकडे गेलेल्या नासाच्या सर्व या मोहिमा त्यानंतर गॅलिलीओ यान, दुर्बीण या सगळ्यांनी या युरोपा चंद्राचे फोटो काढले होते. पण यापैकी कोणतेच मोहीम युरोपाच्या इतकी जवळ गेली नाही की, युरोपाचा सखोल अभ्यास करता येईल. त्यामुळे आता या क्लिपर यानाच्या उपकरणांच्या मदतीने संपूर्ण युरोपात केंद्राची पाहणी करता येईल अशी आशा संशोधकांना आहे.
नासाने कोणत्याही मिशनसाठी उभारलेल्या आजवरच्या यांच्या तुलनेत युरोपा क्लिपर हे सर्वात मोठा अंतराळयान आहे, त्याचं वजन आहे साडे सहा टन म्हणजे एखाद्या पूर्ण वाढ झालेल्या आफ्रिकन हत्ती एवढं. तसेच या यानाच्या सोलर पॅनलची एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतची लांबी 30 मीटर आहे, म्हणजे तुलना करायची झाल्यास मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया हे 26 मीटर उंच आहे की एखाद्या 10 मजली इमारती या सोलर पॅनलची उंची आहे.
लॉन्चपासून गुरुपर्यंत पोहोचायला याला साडेपाच वर्षे लागणार आहेत आणि इतकं इंधन सोबत घेऊन जाणा अर्थातच शक्य नाहीये. या प्रवासादरम्यान हे यान मंगळाच्या जवळ जाईल आणि पृथ्वीला प्रदक्षिणा घालीत असे सांगितले जाते.