येत्या १ तारखेपासून होणार हे नवीन बदल ।। सामान्यांच्या खिशाला कसा फरक पडेल हे जाणून घ्या !

अर्थकारण बातम्या लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो येणाऱ्या एक तारखेपासून घरगुती गॅस सिलेंडर असेल, ऑनलाइन पेमेंट असेल, तसेच आणखी काही बऱ्याच गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहे. कोणकोणते बदल होणार आहे कोणकोणत्या गोष्टींमध्ये बदल होणार आहे या लेखा मध्ये याबाबत सविस्तर माहिती पाहू.

येणाऱ्या 1 तारखेपासून घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडर, डिजिटल पेमेंट चे नियम बदलणार आहे हे नवीन नियम थेट सामान्य जनतेच्या खिशावर निश्चितच परिणाम करणार आहे, यामुळे सामान्य जनतेला या नवीन नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. एलपीजी सिलेंडर च्या होम डिलिव्हरी कार्यप्रणालीत तसेच महाराष्ट्र राज्यातल्या बँकांच्या उघडण्याच्या व बंद होण्याच्या वेळेमध्ये सुद्धा बदल होणार आहे.

घरगुती वापराचा गॅस सिलेंडर: घरगुती वापराचा गॅस सिलेंडरची बुकिंग केल्यानंतर काही दिवसानंतर गॅस एजन्सीचे कर्मचारी गॅस सिलिंडर ग्राहकांच्या घरापर्यंत घेऊन जाऊन ग्राहकांना सुपूर्त करतात मात्र आता एक तारखेपासून यामध्ये महत्त्वाचा बदल होणार असून आता सिलेंडरच्या डिलिव्हरीसाठी गॅस कनेक्शन घेताना रजिस्टर केलेल्या मोबाईल क्रमांक वरती एक ओटीपी क्रमांक पाठविण्यात येईल.

मोबाईल वरती प्राप्त झालेला तो ओटीपी क्रमांक डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्याला द्यावा लागेल त्याशिवाय होम डिलिव्हरी मिळणार नाही सिलेंडर ऑनलाईन अथवा ऑफलाइन बुक करताना ग्राहकांना पैसे भरल्यानंतर ग्राहकाने नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर तो ओटीपी पाठविण्यात येणार आहे.

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये बदल: 1 तारखेपासून घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये बदल होणार असून केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती गॅस सिलेंडरचे किमतीचा आढावा घेतात त्यानंतर गॅस सिलेंडरचे नवीन दर ठरवून पुढील महिन्याभरासाठी लागू करतात.

या वर्षासाठी गॅस सिलेंडरच्या दरात अधिक होण्याची शक्यता कमी आहे मात्र अधिकची सबसीडी खात्यात येणार की नाही याबाबत अजून काही निर्णय झालेला नाही आंतरराष्ट्रीय बाजारात गॅस च्या किमती भरपूर कमी झाल्या असल्या कारणाने सबसिडी देण्याची आवश्यकता सध्या उरलेली नाही.

डिजिटल पेमेंट वर आकारले जाणारे शुल्क: 1 तारखेपासून 50 कोटी किंवा त्याहून अधिक रकमेची उलाढाल करणार्‍या व्यावसायिकांना उद्योजकांना तसेच व्यापाऱ्यांना डिजिटल स्वरूपात पेमेंट करणे बंधनकारक असणार आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया चा हा नियम एक तारखेपासून लागू होणार आहे आता एक तारखेपासून डिजिटल पेमेंट वर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

महाराष्ट्र राज्यातील बँकांच्या वेळेत बदल: 1 तारखेपासून महाराष्ट्र राज्यातील सरकारी तसेच खासगी बँकांच्या वेळेत बदल होणार असून राज्यातील बँक उघडण्याची वेळ आणि बंद होण्याची वेळ ही एक सारखीच असणार आहे महाराष्ट्र राज्यात एक तारखेपासून ९ वाजता बँक उघडणार असून संध्याकाळी चार वाजता बँक बंद होणार आहे.

सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्व बँकांना हा नियम लागू असणार आहे. काही दिवस आधी केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने याबाबत सूचना दिलेल्या होत्या. 1 तारखेपासून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्याजदर कपात होणार आहे याबाबत सुद्धा माहिती पाहू यात भारतातील मोठ्या बँकेच्या यादीत गणना होणारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया होय.

या बॅंकेचे ठेवीदार ग्राहकांसाठी एक वाईट बातमी आहे, ती म्हणजे एसबीआय बँकेने बचत खात्यातील ठेवींवर व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, आता एसबीआय बँकेने व्याजदरात 0.25 टक्क्यांची कपात केलेली असून आता बचत खात्यातील ठेवींवर 3.25 टक्के इतकाच मिळणार आहे.

या आधी हा व्याजदर साडेतीन टक्के इतका मिळत होता. तर मित्रांनो अशा प्रकारे 1 तारखेपासून वर सांगितल्या प्रमाणे विविध बदल होणार आहेत, ग्राहकांना या बदलाबाबत निश्चितच माहिती असायला हवी. मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती उपयोगी वाटत असेल आणि आवडली असेल तर या पोस्ट ला नक्की लाईक आणि शेअर करा.