‘८ अ’ उतारा काय असतो ।। तो कसा समजून घ्यायचा? ।। सात बारा उतारा आणि ‘आठ अ’ उतारा या मध्ये काय फरक आहे?

शेती शैक्षणिक

सर्वप्रथम सात बारा उतारा आणि आठ अ उतारा यामध्ये काय फरक आहे हे बघुयात: सात बारामध्ये प्रत्येक जमीन मालकाच्या मालकी हक्काची जमीन सगळी एका गटात लिहलेली असते. पण एकाच मालकाची जमीन अनेक गट नंबर मध्ये असू शकते. जर समजा एका गावात वेग वेगळ्या गट नंबर मध्ये अशा ४ ठिकाणी जमिनी तुमच्या नावा वर असतील तर या चार ही जमिनी एकत्रित रित्या कशावर दिसतील.

तर त्या तुमच्या खाते क्रमांक मध्ये दिसतील. व त्याला च ८ अ चा नमुना असे आपण म्हणतो. ८ अ तुम्हाला असे दिसेल एकाच शेतकऱ्या चा मालकीच्या चार ही जमिनी एकत्रित रित्या ८ अ चा उताऱ्या मध्ये दिसतात. व त्याची एकूण बेरीज किती व जमिनी चा महसूल एकत्र होतो याचा मुख्य उपयोग तलाठ्याला होतो.

एका शेतकऱ्याच्या वेग वेगळ्या गटाचा वेग वेगळ्या जमिनीचा महसूल घेण्या आयवजी तो ८ अ चा उतारा बघून एकत्रित रित्या ४ गटाचे मिळून जमिनीचा महसूल गोळा करता येतो. दुसरा मुख्य उद्देश असा आहे आपल्या कडे सी लिंक कायदा आला. एका शेतकऱ्याचा नावा वर किती जमीन महाराष्ट्रात राहू शकते हे ठरवण्यात आले.

८ अ उताऱ्याच्या द्वारे तुमहाला समजू शकते कि त्या गावात त्याची एकूण जमीन किती आहे आणि अनेक वेग वेगळ्या गावं मध्ये जर त्याच्या जमिनी असतील तर ते सगळे ८ अ एकत्र केले तर ४/५ गावांचे ८ अ एकत्र करून सी लिंक पेक्षा जास्त जमीन होते कि नाही हे समजण्या साठी पण याचा उपयोग होतो.

अशा प्रकारे जमिनीचा महसूल गोळा करण्या साठी व एका गावात एका माणसाच्या नवे किती गटात व किती जमीन आहे हे एकाच उताऱ्या वरून समजते त्याला ८ अ चा उतारा असे म्हणतात. उताऱ्याचा सर्वात वरती वर्ष लिहलेले असते. त्या पुढे ज्या दिवशी तुम्ही आठ अ उतारा डाऊनलोड केला ती तारिख असते. या खाली गाव नमुना आठ अ धारण जमिनींची नोंद वही असे लिहलेले असते.

त्या खाली कंसामध्ये (असामीवार खतावणी – जमाबंदी पत्रक) मग उताऱ्याचा डाव्या बाजूला गावाचे नाव त्या नंतर मध्य भागी तालुक्याचे नाव मग उजव्या बाजूला जिल्ह्याचे नाव लिहलेले आपल्याला दिसेल. त्या खाली १, २, ३, ४, ५, ६अ, ६ब, ७ असे एकूण ७ वेग वेगळे कॉलम दिसतील.

१)त्या मधील पहिला जो कॉलम आहे त्या मध्ये गाव नमुना ६ मधील नोंद असा आहे. त्या मध्ये खातेदाराचा खाते क्रमांक लिहलेला असतो. त्या खाली व्यक्तिगत खातेदार किंवा सामाईक खातेदार अशी नोंद आपल्याला दिसेल. २)त्याच्या पुढच्या दुसऱ्या कॉलम मध्ये भूमापन क्रमांक व उप विभाग क्रमांक असे लिहलेले दिसेल. त्याचा खाली खातेदाराचे नाव लिहलेले दिसेल.

सामाईक खातेदार असेल तर एका पेक्षा जास्त नावे आपल्याला तिथे पहायला मिळतील. त्या खाली तुमचा सातबाऱ्या वरील गट क्रमांक व उप विभाग क्रमांक लिहलेला असतो. इथे खातेदाराची गावा मध्ये ज्या ज्या गटात जमीन आहे ते सर्व गट नंबर इथे लिहलेले आपल्याला दिसतात. ३)तिसरा जो कॉलम आहे त्या मध्ये वरती क्षेत्र असे लिहलेले दिसेल.

त्या खाली खातेदाराच्या नावा वर प्रत्येक गटात किती क्षेत्र आहे ते या कॉलम मध्ये लिहलेले असते. ४, ५ , ६ हे महसूल वसुलीचे कॉलम आहेत. ४)आकारणी किंवा जुडी या चवथ्या कॉलम मध्ये प्रत्येक गट नंबर वरील क्षेत्रा वर किती कर आकारला गेला आहे ते लिहलेले असते. या सदरात जमिनी वर लावण्यात येणार कर रुपये – पैसे यामध्ये दिलेला असतो.

हि कर आकारणी पद्धत १०० वर्ष पूर्वीची आहे याचा अजून कोणताही बदल झालेला नाही. ५)पाचव्या कॉलम मध्ये दुमाला जमिनी वरील नुकसान असे लिहलेले दिसेल. ६)त्याच्यापुढे ६व्या कॉलम मध्ये स्थानिक उप कर याच्या मध्ये ६अ व ६ब असे दोन गट असतात. ६अ हा जिल्हा परिषदेचा कर वसुलीचा तर ६ब हा ग्राम पंचायत कर वसुलीचा कॉलम असतो.

७)सर्वात शेवटचा व ७ वा कॉलम हा सगळ्या जमिनीचा मिळून एकूण किती कर वसुली करायची हे या कॉलम मधून दिसते. सर्वात खाली एकूण लिहलेले दिसेल. त्यापुढे ३ नंबर च्या कॉलम च्या खालच्या बाजूला सर्व गटा मध्ये एका खाते दाराच्या नवे एकूण क्षेत्र किती आहे याची बेरीज केलेली दिसेल.

त्यापुढे ४, ५ , ६अ, ६ब, या कॉलम ची एकूण बेरीज करून ७ नंबर च्या कॉलम खाली पूर्ण कर आकारणीची एकूण बेरीज केलेली असते. उताऱ्याचा सगळ्यात खाली एक सूचना लिहलेली दिसते ती अशी – या खाते उताऱ्यावर संबंधित तलाठी / नायब तहसीलदार यांची सही शिक्का असल्यास शासकीय कामा साठी वैध समजावा.

8 अ उतारा चे फायदे काय आहेत ते बघुयात: सात बारा मध्ये प्रत्येक जमीन मालकाच्या मालकी हक्काची जमीन सगळी एका गटात लिहिले असते. पण एकाच मालकाची जमीन अनेक गट नंबर मध्ये असू शकते. जर समजा एका गावात वेग वेगळ्या गट नंबर मध्ये अशा चार ठिकाणी जमीन तुमच्या नावा वर असतील तर या चार ही जमीन एकत्रित रित्या कशावर दिसतील.

तर त्या तुमच्या खाते क्रमांक मध्ये दिसते. त्यालाच 8अ नमुना असे आपण म्हणतो 8 अ उताऱ्यात तुम्हाला असे दिसेल, एका शेतकऱ्याच्या मालकीच्या चार ही जमीन एकत्रित रीत्या 8अ चा उतारा मध्ये दिसतात व त्याची एकूण बेरीज किती व जमिनीचा महसूल एकत्र किती होतो याचा मुख्य उपयोग तलाठ्याला होतो.

एका शेतकऱ्याच्या वेग वेगळ्या गटाचा वेग वेगळा जमिनीचा महसूल वेग वेगळ्या घेण्या ऐवजी तो 8 अ चा उतारा बघून एकत्रित विचार गटांचा मिळून जमिनीचा महसूल गोळा करता येतो. दुसरा मुख्य उद्देश असा आहे आपल्याकडे सी-लिंक कायदा आला एका शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन महाराष्ट्रात राहू शकते. हे ठरवण्यात आले.

8अ चा उतारा च्या द्वारे तुम्हाला समजू शकते की त्या गावात त्याची एकूण जमीन किती आहे आणि आणि एक वेगवेगळ्या गावांमध्ये जर त्याच्या जमिनी असतील तर ते सगळे 8अ उतारे एकत्र केले तर 4-5 गावांचे 8अ चे उतारे एकत्र करून सीलींक पेक्षा जास्त जमीन होते की नाही, हे समजण्यासाठी पण याचा उपयोग होतो. अशा प्रकारे जमिनीचा महसूल गोळा करण्या साठी व एका गावात एका माणसाच्या नावे किती गटात आणि किती जमीन आहे हे एकाच उताऱ्या वरून समजते त्याला 8अ चा उतारा असे म्हणतात.

8अ चा उतारा कसा मिळवायचा?: https://mahabhulekh.Maharashtra.gov.in या वेब साईटवर जाऊन तुम्ही आठ अ उतारा मिळू शकता. सर्व प्रथम विभाग सिलेक्ट करायचा. त्या नंतर 8अ सिलेक्ट करायचा त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आणि मग त्यानंतर गाव सिलेक्ट करायचं.

आणि त्यानंतर त्याच्या खाली खाते नंबर सिलेक्ट करून तुमचा खाते नंबर खाली लिहायचा मग शोध वरती क्लिक केल्या नंतर तुम्हाला तुमचा 8अ चा उतारा हा पी डी एफ स्वरूपा मध्ये मिळतो त्या उताऱ्याची पी डी एफ तुम्ही तुमच्या कम्प्युटर वरती सेव्ह करून त्याची प्रिंट सुद्धा घेऊ शकता.

1 thought on “‘८ अ’ उतारा काय असतो ।। तो कसा समजून घ्यायचा? ।। सात बारा उतारा आणि ‘आठ अ’ उतारा या मध्ये काय फरक आहे?

Comments are closed.