मंदीत संधी! घर बसल्या करू शकता हे 4 व्यवसाय, जे बनवू शकतात आपल्याला मालामाल.

अर्थकारण

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

नमस्कार मंडळी, आज आपण अशा 4 घरगुती व्यवसायांबद्दल माहिती घेणार आहोत ज्या द्वारे तुम्ही सध्याच्या बिकट परिस्थितीत सुद्धा इन्स्टंट इन्कम मिळवू शकता. या कोरोनाच्या संकटामुळे आपले आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे. खूप जणांच्या नोकऱ्या या काळात गेल्या आहेत. तर खूप जणांचे व्यवसाय या काळात बंद पडले किंवा तोट्यात गेले आहेत. तरीही अशा विषम परिस्थितीत ‘मंदीत संधी’ ठरणार्‍या काही व्यवसायांची आपण माहिती घेवू. हे असे व्यवसाय आहेत जे आपण घरी बसून देखील करू शकतो, आणि यातील काही व्यवसाय तर घरातल्या महिला देखील सहज करू शकतात.

1) घरगुती लोणचे, पापड, शेवया बनवणे :- लोणचे, पापड, शेवया इ. गोष्टी आपल्या सर्वांच्या कुटुंबात अगदी रोजच्या-रोज जेवणाच्या ताटात दिसून येतात. पण सध्याच्या काळात हे सर्व बनवताना काळजी घेणे खूप गरजेचे असते. खूप जणांना या काळात ते बाहेरून आणणे जमणार नाही किंवा रिस्की आहे. लोणचे, पापड, शेवया हे सर्व काही आपण घरगुती स्वरूपात सहजरित्या बनवू शकतो. लोणचे, पापड, शेवया व्यतिरिक्त आपण आपल्या भागातील लोकांच्या आवडीचा दूसरा एखादा पदार्थ देखील बनवू शकता.  हे पदार्थ आपण आपल्या सोसायटी, कॉलनी किंवा गावामध्ये सहजपणे विकू शकतो. या घरगुती व्यवसायाच्या मार्केटिंग करिता तुम्ही एक व्हाट्सअपचा ग्रुप बनवा अथवा तुमच्या ओळखीच्या लोकांना स्वतः टेलिफोन करून सांगू शकता. तसेच तुम्ही फेसबुक द्वारे देखील मार्केटिंग करू शकता. हा व्यवसाय खूप नफा देणारा तर आहेच सोबत आपल्या घरातील महिला हा व्यवसाय सहजपणे करू शकतात.

2) घरगुती बेकरी :- बाहेर दुकानांमद्धे विकले जाणारे खाद्य-पदार्थ कश्या प्रकारे बनवले जातात, तिथे स्वच्छता असेल का, त्यामध्ये काही हानिकारक गोष्टी मिसळल्या-जातात का असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कोणीही बाहेरचे पदार्थ मागवणे अथवा खाणे टाळताना दिसत आहे. तरीही अशा वातावरणात काही आनंदाचे क्षण देखील येतच असतात. जसे की वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, हे क्षण सेलिब्रेट करण्यासाठी लागणारा केक बेकरी मधून विकत घेणे सध्या कोणी पसंत करत नाही. ते आपल्यासाठी धोकादायक देखील ठरू शकते. अशा परिस्थितीत आपण योग्य ती काळजी घेऊन, लोकांच्या गरजे नुसार, आवडी नुसार बनवलेले केक, पेस्ट्री, चॉकलेट घरच्या घरी बनवून ते चांगल्या भावात विकू शकतो. हा घरगुती व्यवसाय खूपच प्रॉफिट मिळवून देणारा व्यवसाय आहे. आज-काल युट्युबवर खूप सारे व्हिडिओज आहेत जे पाहून तुम्ही घरीच केक, चॉकलेट किंवा इतर पदार्थ बनवू शकता. अथवा खूप सारे रेसिपीच्या वेबसाईट आहे, त्यांचे मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. मार्केटिंगसाठी तुम्ही व्हाट्सअप, फेसबुक, आणि पोस्ट टाकू शकतात.

3) योगा आणि मेडिटेशन क्लासेस/ वेबिनार घेणे :- कोरोना संक्रमण आणि लॉकडाऊनची परिस्थिती आता राहिलेली नाही, सर्वांनी कोरोनाची लस देखील घेतलेली आहे. तरी देखील काही लोक बाहेर जाने टाळत आहेत. लोकांना घरी राहूनच व्यायाम, योगा करण्याची सवय आता जडलेली आहे. यामुळे वेळेची बचत देखील होते. लोकांची ही बदललेली सवय पाहून आपण मंदीत संधी शोधू शकतो. आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून लोकांना घर बसल्या योगा आणि मेडिटेशन शिकवू शकतो. हा व्यवसाय फक्त आपल्या कॉलनी, शहरापूरता मर्यादित न ठेवता आपण इतर शहरातील, जिल्ह्यातील, राज्यातील, देशातील लोक जोडू शकता. अशा ऑनलाईन योगा क्लासेस साठी आपल्याला एखादी जागा भाड्याने किंवा विकत घेण्याची आवश्यकता नाही, इतर कोणताही खर्च करणे आवश्यक नाही. त्यामुळे या ऑनलाईन क्लासची फिस कमी ठेवून देखील आपण बक्कळ कमाई करू शकता. फिस कमी असल्याने लोक आपल्याशी जोडले जाण्याची संधीही वाढते. याच्या जाहिरातीसाठी फेसबुक ग्रुप, विविध शहरांमधील व्हाट्सअप्प ग्रुप चांगले पर्याय ठरू शकतात.

4) गॅजेट रेंटिंग :- गॅजेट रेंटिंग म्हणजेच लॅपटॉप, कॉम्प्युटर, कॅमेरा, यासारख्या गोष्टी भाड्याने देणे. खूप लोक सध्या घरून काम करत आहेत. अशा वेळी ऑफिसचे काम करण्यासाठी त्यांच्याकडे योग्य ते कॉन्फिगरेशन असलेले लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असणे गरजेचे आहे. घरगुती कॉम्प्युटर वर काम करणे खूप जणांना शक्य होत नाही. अशा वेळी जर तुमच्याकडे चांगले कॉन्फिगरेशन असलेले कॉम्प्युटर असेल तर तुम्ही भाड्याने देऊ शकता. तसेच बर्थडे सेलिब्रेशन, लग्न समारंभ व इतर कोणत्याही खास कार्यक्रमात फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरला बोलावणे सध्या तरी कोणासाठी योग्य नाही. अशा परिस्थितीत आपण लोकांना आपल्या घरात पडून असलेले कॅमेरे भाड्याने देऊ शकता. त्यासाठी तुम्ही मिनिमम भाडे आणि ॲडव्हान्स आकारू शकता. जाने तुमसे इनकम देखील चालू होईल. आणि दिलेले वस्तू परत भेटतील याची गॅरंटी पण असेल. हा व्यवसाय फक्त कोरोना कळताच नव्हे तर त्या नंतरही जोरात सुरू आहे. लोकांना नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या वस्तूंची आवश्यकता भासते, ती वस्तु विकत घेण्यापेक्षा थोड्याश्या रकमेत गरज असे पर्यंत वापरणे लोक निवडतणा दिसत आहेत.

तर हे होते 4 असे व्यवसाय जे तुम्ही घरी बसून करू शकता. हे सगळे व्यवसाय तुम्ही अत्यंत कमी भांडवलात चालू करू शकतात. मार्केटिंगसाठी तुम्हाला सोशल मिडियाची तसेच व्हाट्सअपची खूप मदत होईल. अजून माहितीसाठी तुम्ही युट्युब, किंवा इतर वेबसाईट जे गुगल वर उपलब्ध आहेत त्यांची मदत जरूर घ्या. यातील कोणताही व्यवसाय तुम्ही करायचा ठरवून तुम्ही झटपट पैसा मिळवू शकता. तसेच अनेक इतर काही वेबसाइट असतात, किंवा यूट्यूब चैनल असतात त्यामध्ये टेक्नॉलॉजी वगैरे सांगितलेले असतात ते तुम्ही पाहू शकता आणि इन्कम मिळवू शकता.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.