कसा पहावा तुमच्या शेत जमिनीचा, प्लॉटचा किंवा घराचा सरकारी भाव? आणि किती असेल त्यावर मुद्रांक शुल्क.

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

मित्रांनो तुमची प्रॉपर्टी कुठेही असू द्या शहरांमध्ये, गाव-खेड्या मध्ये, किंवा महानगरपालिका, नगरपालिकेच्या क्षेत्रात असू द्या. तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचा शासकीय भाव हा घरबसल्या पाहू शकता. तसेच तुमचा फ्लॅट असू द्या किंवा गावांमधील गुंठेवारी मधलं घर असू द्या त्यां प्रॉपर्टीचे व्हॅल्युएशन किती आहे हे आपल्याला माहिती असणे गरजेच असतं. 

तुम्ही म्हणाल सरकारी भाव कशासाठी जाणून घ्यावा? त्याचा नक्की फायदा? तर मित्रांनो तुम्ही तुमची शेत जमीन, घर जागा, किंवा  शहरी भागातील फ्लॅट विकत घेत असाल किंवा विकत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला त्या प्रॉपर्टीचा सरकारी भाव हा माहिती असणं हे गरजेचं असतं. कारण याच सरकारी भावावर ठरतो त्या प्रॉपर्टीवर भरावा लागणारा मुद्रांक शुल्क. तुम्हाला एखादी प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यावर मुद्रांक शुल्क हा भरावाच लागतो, तो हजारांमद्धे आहे की लाखांमद्धे आहे हे तुम्ही घर बसल्या पाहू शकता. मुद्रांक शुल्क किती आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला सरकारी ऑफिसच्या चकरा मारण्याची काहीही आवश्यकता नाही. आजच्या या लेखामद्धे आपण याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

प्रॉपर्टीचा सरकारी भाव पाहण्यासाठी : महाराष्ट्रातील कोणतीही प्रॉपर्टी, कोणत्याही शरातील किंवा खेड्यातील प्रॉपर्टीचा सरकारी भाव म्हणजेच व्हॅल्युएशन पाहण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या https://www.igrmaharashtra.gov.in/eASR/frmMap.aspx या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा दिसेल, त्यामध्ये तुम्हाला तुमची प्रॉपर्टी ज्या जिल्ह्यात आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर एक नवीन विंडो उघडेल.

नवीन विंडो उघडल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तुमचा तालुका आणि ज्या गावात/शहरात प्रॉपर्टी आहे ते गाव/शहर निवडायचे आहे. तिथे सध्याचे 2022-23 हे वर्ष अगोदरच निवडलेले असेल, जर तुम्हाला मागील वर्षांमधील शासकीय भाव पहायचा असेल तर ते वर्ष निवडू शकता. ही माहिती भरताना तुम्ही शहरी भाग निवडला असेल तर तुम्हाला अजून नवीन पर्याय समोर येतील. काही जिल्ह्यांमध्ये सर्वे नंबर टाकून तुम्हाला त्या प्रॉपर्टीचा सरकारी भाव दिसेल तर काही जिल्ह्यांमध्ये शहरी भागातील ठिकाणांची नावे दाखवून त्या भागातील खुली जमीन, निवासी सदनिका, ऑफिस, दुकाने यांचा प्रती चौरस मीटर क्षेत्राचा सरकारी भाव दाखवण्यात येतो. ज्या भागात, वरील पैकी ज्या प्रकारची आपली प्रॉपर्टी आहे त्या रखान्यात दाखवलेली संख्या म्हणजे आपल्या शहरी प्रॉपर्टीचा सरकारी भाव असेल. याच प्रकारे ग्रामीण भागातील शेत जमिनीचा भाव हा जमिनीच्या प्रकारावरून ( जिरायती , बागायती इत्यादि ) दाखवण्यात येतो. शेत जमिनीचा भाव हा प्रती हेक्टर दाखवण्यात येतो. तर मित्रांनो हा असेल आपल्या कोणत्याही प्रकारच्या प्रॉपर्टीचा सरकारी भाव. याच सरकारी भावावर कोणतीही बँक आपल्याला शेती कर्ज देखील देते.

मुद्रांक शुल्क कसा पहावा ? : आता आपणास आपल्या प्रॉपर्टीचा सरकारी भाव समजलेला आहे. आता त्या प्रॉपर्टीचा खरेदी-विक्रीचा व्यावहार करण्यासाठी, किंवा बक्षीस पत्र करण्यासाठी किती मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्यूटी भरावी लागणार आहे हे आपण जाणून घेऊया. याबद्दलची माहिती मिळवण्यासाठी आपणास महाराष्ट्र शासनाच्या Stamp Duty Calculator  या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. ( टीप : बहुतांश वेळेला ही वेबसाईट बंद असते. ) या वेबसाईटच्या मुखपृष्ठावर आपणास सेल डिड, गिफ्ट डिड असे विविध पर्याय दिसतील. आपल्याला आपल्या प्रॉपर्टीचा ज्या प्रकारचा व्यवहार करायचा असेल त्या पर्यायावर क्लिक करावे. उदा. जर खरेदी-विक्रीचा व्यवहार असेल तर सेल डिड निवडा, जर बक्षीस पत्र असेल तर गिफ्ट डिड निवडावा, जर भाडेपट्टा असेल तर लिव अँड लायसेन्स निवडावा.

योग्य तो पर्याय निवडल्या नंतर नवीन विंडो उघडेल. नवीन विंडो मध्ये आपणास महानगर पालिका, नगर पालिका, कॅंटॉन्मेंट आणि ग्रामपंचायत असे पर्याय दिसतील. आपली प्रॉपर्टी या पैकी ज्या क्षेत्रात येते तो पर्याय निवडावा. पुढील विंडो मध्ये तुम्हाला प्रॉपर्टीच्या क्षेत्रानुसार योग्य तो पर्याय निवडायचा आहे. ( काही अपवादात्मक प्रॉपर्टी सोडल्या तर बाकी सर्व Non influential zone मध्ये येतात ). त्यानंतर पुढील विंडो मध्ये आपण पाहिलेला आपल्या प्रॉपर्टीचा सरकारी भाव नमूद करायचा आहे ( दोन्ही रखान्यांमद्धे ) . सबमीट या बटन वर क्लिक केल्यानंतर आपणास आपल्या प्रॉपर्टीच्या व्यवहारासाठी भरावा लागणारा मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्यूटि किती याची रक्कम दिसेल.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.