अशी कोणती ५ वाक्ये आहेत जी तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या नजरेतून कायमची उतरवू शकता. जाणून घ्या कोणत्या ५ वाक्यांचा वापर आपण लगेच बंद केला पाहिजे !

लोकप्रिय शैक्षणिक

मित्रानो असं म्हणतात, की सुटलेला बाण अन तोंडातून निघालेला शब्द किंवा वाक्य परत घेता येत नाही. आपण बोललेले शब्द किंवा वाक्य हे ठरवतात की आपले चरित्र कसे आहे. आपण कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. हुशार आणि शक्तिशाली लोक फार कमी बोलतात आणि बोलताना ते नेहमी आपण कोणते शब्द वापरतो वाक्य वापरतो त्या गोष्टींवर लक्ष ठेवतात.

कारण अशी काही वाक्य असतात जे वास्तव मध्ये खरी जरी असली तरी ती बोलल्यामुळे लोकांचे मन दुखावते. लोकांना त्रास होतो. आणि असे शब्द वापरल्यामुळे आपली त्यांच्याबरोबर संबंध बिघडू शकतात. त्यामुळे अशी काही वाक्य आहे. शब्द आहे. ते आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरताना विचार केला पाहिजे. किंबहुना आपण बोलायचे टाळले पाहिजे. आज आपण अशी पाच वाक्य बघणार आहोत. जे बोलायचे तुम्ही बंद केली तर लोकांच्या नजरेत तुमचा आदर व सन्मान वाढेल.

१.मी आधीच तुला सांगितले होते ना: हे वाक्य बोलणे खूपच चुकीचे आहे. जेव्हा तुम्ही हे वाक्य बोलता तेव्हा तुम्ही हे सिद्ध करायचा प्रयत्न करता कि तुमच्यामध्ये एक प्रकारचा अहंकार आहे. तुम्ही स्वतःला दुसऱ्यापेक्षा मोठे दाखवायचा प्रयत्न करत आहेत.

भलेही एखाद्याला तुम्ही काही गोष्टी करायला सांगितले असतील पण त्याने तुम्ही सांगितलेल्या एकदम विरुद्ध गोष्टी केल्या असतील. आणि त्याचे नुकसान झाले असेल पण परत ते येऊन तुम्हाला ती गोष्ट सांगत असतील, तर याचा अर्थ कि ते तुमच्याकडून काहीतरी मदतीची अपेक्षा करत आहे.

जर तुम्ही समोरचाची काही मदत करू शकत असाल तर चांगली गोष्ट आहे, पण हे वाक्य त्या व्यक्तीला बोलू नका की मी तुला आधीच सांगितले होते ना मग तू कशाला त्या गोष्टी केल्या याचा अर्थ असा होतो कि तुम्ही समोरच्याला खाली दाखवून स्वतःचा मोठेपणा सिद्ध करायचा प्रयत्न करत आहात. त्यामुळे हे वाक्य आपण बोलणे टाळले पाहिजे.

२.तुम्ही नेहमी असेच करता किंवा तुम्ही हे कधीच करत नाही: जेव्हा तुम्ही हे वाक्य समोरच्याला बोलता तेव्हा आपण समोरच्याला एक प्रकारे बाजूला धक्का देत असतो. मित्रानो एक गोष्ट लक्षात घ्या. जगात प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारची असते.

पण जेव्हा हे वाक्य आपण समोरच्यासाठी बोलतो कि तुम्ही नेहमी असेच करता किंवा तुम्ही कधीच हे करत नाही. त्यामुळे समोरचा जर तुमच्याबरोबर काही महत्वाच्या गोष्टीवर चर्चा करणार असेल तर तो ते करत नाही. त्याचे मन दुखावते आणि तो बाजूला होतो.

तुम्हाला जर तुमचे म्हणणे समोरच्याला सांगायचे आहे तर त्या विशिष्ट मुद्यावर चर्चा करा. त्यांना ती परिस्थिती समजून सांगा. पण समोरचा परत परत त्या चुका करत असेल तर त्याला असे बोला कि मी बऱ्याच वेळा असे पहिले आहे कि तुम्ही हि गोष्ट करत आहेत. पण असे बोलणे कि नेहमी तुम्ही असेच करता किंवा नेहमी तुम्ही असे करत नाही. तेव्हा असे बोलून समोरच्याचे आपण मानसिक खच्चीकरण करत असतो. त्यामुळे आपण हि वाक्ये आपल्या दैनंदिन जीवनात बोलायचे टाळले पाहिजे.

३.या कामाला तुम्ही अशाच प्रकारे केलं पाहिजे: मित्रांनो जेव्हा आपण हे वाक्य वापरतो तेव्हा असे प्रतीत होते की समोरच्यावर आपण एक प्रकारचा हुकूम प्रयत्न करतो सत्ता गाजवता प्रयत्न करतो. आज जग इतके बदलले आहे कि एक काम करायचे अनेक प्रकार आहे आणि असे होऊ शकते.

कि समोरचा एखादी वेगळी पद्धत वापरून आपण सांगितलेले काम जलद गतीने आणि उत्कृष्ट पद्धतीने करू शकेल पण जेव्हा आपण म्हणतो नाही, तू हे काम अशाच प्रकारे केलं पाहिजे याचा अर्थ हा होतो कि आपण आपला निर्णय समोरचावर थोपवत असतो किंवा आपण नवीन बदल करायला तयार नसतो. त्यामुळे या कामाला तुम्ही अशाच प्रकारे केले पाहिजे हे वाक्य बोलायचे आपण टाळले पाहिजे.

४.दुसर्याबद्दल टीका करणे: जेव्हा आपण दुसऱ्यांवर टीका करतो कि हा असाच आहे. ती तशीच आहे. त्याने हेच केले पाहिजे. तिने तशेच केले पाहिजे. तुम्ही जे बोलत आहेत ते बरोबर जरी असले तरी ९०% शक्यता आहे कि ती गोष्ट सगळ्यांनाच माहित असेल. त्यामुळे अशी टीका करून तुम्ही अजिबात हुशारी दाखवत नाही.

आणि समजा तुम्ही ज्यांचा बद्दल बोलत आहात ते जर चुकीचे निघाले तर तुम्ही निष्कारण एखाद्याचा चारित्र्यावर शिंतोडे उडवत असता त्यामुळे कोनाबद्दलही टीका करणे हे अत्यंत चुकीची सवय आहे. असे केल्याने ज्याचा समोर तुम्ही अशी टीका करत आहात तो तुमच्या व्यक्तिमत्वाला पडताळात असतो. तुम्हाला जज करत असतो. आणि असे केल्यामुळे तुमचा आदर लोकांचा नजरेत कमी होऊ शकतो.

५.पक्षपाती म्हणजे पूर्वग्रहदूषित वाक्ये: आपण नेहमी पक्षपाती किंवा पूर्वग्रहदूषित वाक्य बोलायचे टाळले पाहिजे. म्हणजे कधी कोणाचे वय काढणे. कधी कोणाचे धर्म काढणे. किंवा कधी कोणाची जात काढणे. आपण टाळले पाहिजे. उदाहरण द्यायचे झाले तर, तो ३०वर्षाचा झाला तरी अजून त्याला हि गोष्ट समजत नाही.

तो या जातीचा आहे म्हणूनच तो असा वागतो. तो स्री आहे व पुरुष आहे म्हणूनच असं झालं वगैरे वगैरे त्यामुळे अशी वाक्य आपण आपल्या दैनंदिन जीवनात बोलायची टाळली पाहिजे. मित्रानो परत एकदा बघुयात कि आपण कोणते वाक्य बोलताना विचार केला पाहिजे.

किंवा कोणती वाक्ये टाळली पाहिजे. १.मी आधीच तुला सांगतील होत ना. २.तुम्ही नेहमी असेच करता किंवा तुम्ही हे कधीच करत नाही. ३.या कमला तुम्ही अशाच प्रकारे केले पाहिजे. ४.दुसर्याबद्दल टीका करणे. ५.पक्षपाती किंवा पूर्वग्रहदूषित वाक्ये.

1 thought on “अशी कोणती ५ वाक्ये आहेत जी तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या नजरेतून कायमची उतरवू शकता. जाणून घ्या कोणत्या ५ वाक्यांचा वापर आपण लगेच बंद केला पाहिजे !

Comments are closed.