आईच्या मिळकतीमध्ये सर्व मुलांना हक्क किंवा हिस्सा असतो का? ।। वाटप आणि खातेफोड ह्यामध्ये काय फरक आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

पहिला प्रश्न-: आईच्या मिळकतीमध्ये सर्व मुलांना हक्क किंवा हिस्सा असतो का? उत्तर-: हे लक्षात घेतलं पाहिजे की आईच्या मिळकतीमध्ये सगळ्या मुलांना हक्क किंवा हिस्सा मिळेल किंवा नाही मिळणार हे मुख्यतः दोन गोष्टींवर अवलंबून आहे पहिली गोष्ट म्हणजे ति ची मालमत्ता आहे, ही आईची स्वकष्टाची मालमत्ता आहे का ती आईला वरसाने मिळालेली आहे

म्हणजेच वडिलोपार्जित मालमत्ता आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आई निधनापूर्वी त्या मालमत्तेची मृत्युपत्र किंवा इतर काही दस्तावाद्वारे काही व्यवस्था लावते किंवा नाही लावते या दोन प्रश्नांवर किंबहुना या दोन प्रश्नांचं उत्तरावर आईच्या मालमत्तेमध्ये मुलांना आईच्या मालमत्तेमध्ये मुलांना हक्क मिळेल का? कसा आणि किती?

या प्रश्नांची उत्तरं आहे समजा एखाद्या आईची मालमत्ता ही स्वकष्टार्जित मालमत्ता असेल आणि आईने निधन होण्यापूर्वी मृत्युपत्र किंवा तत्सम काही जास्त केलेला नसेल तर त्या परिस्थितीत प्रत्येक मुलाला त्या मालमत्तेमध्ये समान हक्क किंवा हिस्सा प्राप्त होईल मात्र समजा आईची वडिलोपार्जित मालमत्ता आहे आणि आईने मृत्युपत्र वगैरे केलेला नाही

तर ह्या परिस्थितीत सुद्धा त्या आईचे जे काही मुलं आहे जे वारस आहेत त्यांना त्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये समान हक्क किंवा हिस्सा मिळेल आता दुसरी परिस्थिती बघून घ्या म्हणजे आईची मालमत्ता ही स्वकष्टार्जित केलेला आहे आणि तिने मृत्यूपत्र सुद्धा केलं आहे.

अशा परिस्थितीत आईच्या निधनानंतर त्या मृत्यू पत्रानुसार तिच्या वारसांना हक्क किंवा हिस्सा मिळेल म्हणजे केवळ वारस आहोत म्हणून प्रत्येकाला हक्क किंवा हिस्सा किंवा समप्रमाणात हक्क किंवा हिस्सा मिळेलच असं नाही तर त्या मृत्युपत्रा प्रमाणे प्रत्येकाला हक्क किंवा हिस्सा मिळेल.

समजा एखाद्या आईची वडिलोपार्जित मालमत्ता आहे आणि त्याबाबत जर तीने मृत्युपत्र केलेला आहे तर अशा परिस्थितीत मृत्युपत्र आहे ते या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये आईचा जेवढा हक्क किंवा हिस्सा आहे तेवढ्या पुरताच मर्यादित राहील आणि उर्वरित जो काही हक्क किंवा हिस्सा असेल तो तिच्या वारसांना म्हणजेच मुलांना समप्रमाणात मिळेल.

दुसरा प्रश्न-: वाटप आणि खातेफोड ह्यामध्ये काय फरक आहे? उत्तर-: आता बघायला गेलं तर खूप मोठा फरक आहे तो म्हणजे नक्की काय होतं तर एखादी संयुक्त मालमत्ता असते तीच त्या सगळ्या सहहिस्सेदार यांमध्ये वाटप केला जातो ते काही वेळेला समान असू शकतो किंवा असमानही असू शकतात ते वाटप पत्राद्वारे सुद्धा होऊ शकतं किंवा दाव्या द्वारे सुद्धा होऊ शकतं

खातेफोड म्हणजे काय? खातेफोड सुद्धा एक प्रकारचं वाटप जरी असल तर ते सुद्धा फक्त आणि फक्त महसुली अभिलेखमध्ये करता येत. म्हणजे मग 7/12 असेल किंवा प्रॉपर्टी कार्ड असेल त्यामध्ये जेव्हा बदल करण्यात येतो तेव्हा त्याला खातेफोड अस म्हणतात. जेव्हा वाटप होत त्या वाटपानुसार खातेफोड हे होऊ च शकत पण जेव्हा हे खातेफोड झालेलं आहे ते कायद्यानुसार योग्य असेलच अस ही नाही.

अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाटप जे आहे ते कोणत्याही मालमत्तेचे आहे म्हणजे चल अचल शेती बिनशेती घर गाडी बंगला कशाचाही येऊ शकतो जर खाते फोडायचा आपण विचार केला तर तो फक्त शेत जमिनीच्या संदर्भात किंवा बिगर शेती जमीन ज्याचा महसुली अभिलेख आहे त्या संदर्भातच होऊ शकतो बाकीच्या मालमत्ता आहेत म्हणजे चल अचल संपत्ती असेल, दागिने असतील, पैसे असतील, घर असेल, गाड्या असेल, या संदर्भात खातेफोड नावाची कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही.