Gift Deed (बक्षीस पत्र) म्हणजे काय? त्याद्वारे कोणती प्रॉपर्टी देता येते? त्याच्या रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया काय? स्टॅम्प ड्युटी लागते का? रद्द करण्याची प्रक्रिया काय असते? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

बक्षीसपत्रा बद्दल बोलण्यापूर्वी मुळात कायद्यानुसार गिफ्ट म्हणजे नेमके काय ते आपण समजून घेऊया. ट्रान्सफर प्रॉपर्टी ऍक्ट च्या सेक्शन 122 मध्ये गिफ्ट ची Definition आहे. त्यानुसार सापण आपली मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणजेच जंगम मालमत्ता जसे की आपली कार किंवा आपले दागिने ते गिफ्ट म्हणून देऊ शकतो

तसच आपण आपली इंमुव्हेबल प्रॉपर्टी म्हणजेच स्थावर मालमत्ता जसं की आपले राहतं घर किंवा आपली एखादी जमीन हे सुद्धा हस्तांतरी करू शकतो. पण यातली सर्वात महत्वाची घट म्हणजे ती प्रापर्टी एक्झिस्टिंग म्हणजेच आज अस्तित्वात असायला हवी. उद्या भविष्यात तुम्ही एखादी कार घेणार असाल तर आजच्या तारखेला तुम्ही ती दान करू शकत नाही.

याच प्रमाणे ती प्रॉपर्टी टँजिबल म्हणजेच मूर्तस्वरूपात असली पाहिजे. त्यामुळे कॉपीराईट, ट्रेडमार्क अशा काही गोष्टी दान करता येत नाही. इतकच महत्वाचं म्हणजे ती प्रॉपर्टी ट्रांसफरेबल असली पाहिजे अर्थात त्यांचं टायटल क्लिअर असले पाहिजे. त्यावर कोणताही कर्ज असता कामा नये. तसेच हे मालमत्तेचे हस्तांतरण पूर्णता सवच्छेने कोणत्याही मोबदल्या शिवाय करण्यात आला असेल तरच त्याला गिफ्ट म्हटले जाऊ शकतो.

संपत्ती दान करण्यासाठी त्या व्यक्तीला कोणताही दबाव किंवा जबरदस्ती करण्यात आली असेल तर ते गिफ्ट व्हॅलिड मानले जात नाही. या शिवाय गिफ्ट देणारी व्यक्ती म्हणजेच डोनर हा अठरा वर्ष पूर्ण झालेला व मानसिक दृष्ट्या बरोबर असण्यास असे देखिल काही अटी आहेत. ज्यांची पूर्तता केली तरच ती व्यक्ती बक्षीस देण्यास सक्षम मानली जाते.

पण गिफ्ट घेणारी व्यक्ती हा मायनर असेल तर त्याच्या वतीने त्याच्या नॅचरल गार्डियन म्हणजेच पालकांनी गिफ्ट स्विकारायची कायद्यात तरतूद आहे. पुढचा महत्वाचा मुद्धा म्हणजे डोनर जीवंत असताना आणि तो बक्षीस देण्यास सक्षम असे पर्यंतच डोनी ने ते बक्षीस स्विकारण आवश्यक आहे. त्याच प्रमाणे बक्षीस स्वीकारण्यापूर्वी जर डोनी चा मृत्यु झाला तर ते बक्षीस ग्राह्य ठरलं जात नाही.

आता आपण पाहुया ते बक्षीस म्हणजेच गिफ्ट देण्याची नेमकी प्रक्रिया काय असते. ट्रान्स्फर ऑफ ऍक्ट च्या सेक्शन 123 नुसार स्थावर मालमत्तेचे गिफ्ट हे हस्तांतरण करण्यासाठी दोनदा दस्तावेज करणं हे बंधनकारक असतं. या डॉक्युमेंट वर डोनर व डोनी तसेच दोन साक्षीदाराच्या सह्या असणं देखील आवश्यक आहे . पण मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणजेच जंगम मालमत्तेचे गिफ्ट ट्रान्स्फर करण्यासाठी दोन पर्याय असतात.

१.नोंदणी करून त्याचा दस्तावेज करता येतो. २.सरळ ती वस्तू डोनी च्या ताब्यात देता येते. तर आता तुम्हाला लक्षात आलच असेल की हा जो नींदणीकृत दस्ताएवज असतो त्यालाच आपण गिफ्ट डिड किंवा बक्षीसपत्र म्हणतो. असं हे बक्षीसपत्र तयार करत असताना त्यात काही गोष्टी आर्वजुन नमूद कराव्या लागतात.

उदा: डोनर व डोनी यांचे डिटेल्स, त्यांचा परसपरातील नातेसंबंध तसच प्रॉपर्टी ची तपशीलवार माहिती हे देखील नमूद करावं. याशिवाय डोनर हा स्वच्छेने कोणत्याही दबावाशिवाय हे बक्षीसपत्र करत आहे हे नमूद करणं देखील महत्वाचं ठरतं. एकदा का हे बक्षीसपत्र तयार केलं तर प्रश्न येतो तो रजिस्ट्रेशन चा. ईंडिया रजिस्ट्रेशन ऍक्ट 17 च्या प्रमाणे स्थावर मालमत्तेचं दान करता येत असेल तर बक्षीसपत्र नोंदणीकृत करणं बंधनकारक आहे.

याचा अर्थ असा की समजा मी माझं राहतं घर माझ्या भावाच्या नावे करण्यासाठी बक्षीसपत्र तयार केलं . तरी जोपर्यंत ते बक्षीसपत्र नोंदणीकृत होत नाही तोपर्यंत त्या घराचा मालकी हक्क माझ्या भावाला मिळणार नाही . तर असे हे बक्षीसपत्र रजिस्ट्रेशन करण्यासाठी जेव्हा तुम्ही सब रजिस्ट्रेशन च्या ऑफिस मध्ये जाता तेव्हा कोणते कागदपत्र लागतात ते आपण पाहु.

१.बक्षीस पत्राची मूळप्रत २.दोघांचा मालकी हक्क दाखवणारा सेल डिड अर्थात खरेदीखत आणि असे इतर दस्ताएवज ३.दोन्ही पार्टींचा आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अजून एखादा ओळख पत्र. त्याच बरोबर त्या प्रॉपर्टीवर कोणताही कर्ज नाही आहे आणि टायटल क्लिअर आहे हे दाखवणारं एक Encumbrance सर्टिफिकेट आणि रेडीरेकनर नुसार मूल्य दर्शविणारा सर्टिफिकेट.

तसच काहीवेळा मेंटेनन्स रिसिप्ट किंवा डोनर डोनी मधला नातं दर्शवणारा कागदपत्रे अशा गोष्टी तुम्हाला लागू शकतात. तर आता आपण वळूयात थोडासा संभ्रम निर्माण करणाऱ्या विषयाकडे आणि तो म्हणजे बक्षीसपत्रावर लागणारी स्टॅम्प ड्युटी: सर्वप्रथम एक लक्षात घ्या की प्रत्येक राज्यात स्टॅम्प ड्युटी चे रेट्स हे वेगळे असतात . आणि ते काळानुरूप बदलत असतात .

उदा : महाराष्ट्रात आजच्या तारखेला बक्षीसपत्राद्वारे ची राहती जागा किंवा शेत जमीन तुमच्या पती, पत्नी, मुलांना किंवा नातवंडांना किंवा मुळता मुलाच्या पत्नीला देत असाल तर त्यावर स्टॅम्प ड्युटी भरावी लागत नाही. फक्त ५०० रु . च्या स्टॅम्प पेपर वर्ती बक्षीसपत्र तयार करावं लागतं. तसच काही ठिकाणी मालमत्तेच्या मूल्यावर एक टक्का लोकल बॉडी टॅक्स आकारला जातो. पण नातेवाईकांन पलीकडे इतर कोणत्याही व्यक्तीच्या नावाने तुम्ही बक्षीसपत्र तयार केलं असेल तर बाजार मूल्यवरती ५ टक्के मुद्रांक शुल्क भरावा लागतो.

तसाच 9 टक्का लोकल बॉडी टॅक्स आकारला जातो. आता आपण वळूया पुढच्या मुद्द्याकडे तो म्हणजे पर्सनल लॉस चा गिफ्ट च्या तरतूदींवर कसा परिणाम होतो. उदा: – एखादी हिंदू स्त्री आपला स्त्रीधन दान करू शकते. पण काही प्रसंगात यासाठी तिच्या पतीची संमतीची आवश्यकता असते.

तर दुसरीकडे एक विधवा तिला नवऱ्याकडून वारसा हक्काने मिळालेली संपत्ती सुद्धा दान करू शकते. जर आपण मुस्लीम कायदा बघितला तर त्यात गिफ्ट च्या संकल्पनेला जीपा हे नाव आहे आणि ट्रान्स्फर ऑफ ऍक्ट च्या सेक्शन 129 नुसार या ऍक्ट मधील गिफ्ट्स विषयीच्या तरतूदी मुसलीमांना लागू पडत नाही.

त्यामूळे एखादे मुस्लीम व्यक्ती कोणताही लेखी दस्ताएवज किंवा बक्षीसपत्र न करता आपली संपत्ती दान करू शकते . या संकलपात २०११ सालीसुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार मुस्लीम व्यक्तीने आपली संपत्ती दान करताना लेखी दस्ताएवज बनवला तर त्याची नोंदणी करणं आवश्यक नसतं. आणि केवळ त्या दस्ताऐवज ची नोंदणी केली नाही म्हणून त्याने केलेल्या दान योग्य ठरत नाही.

बक्षीसपत्र रद्द करता येते का?: सामान्यतः एकदा गिफ्ट चा व्यवहार पूर्ण झाला की तो रिवोक किंवा रद्द करता येत नाही मात्र त्याला काही अपवाद कायदयातच नमूद करण्यात आले आहेत. जर दान करण्यासाठी डोनर वर दबाव टाकून जबरदस्ती करून किंवा त्याची दिशाभूल करून त्याची संमती मिळवली असेल तर असं दान रद्द करून घेण्याचा पर्याय डोनर कडे असतो

अजून एक शक्यता अशी की पार्टीस ने जर ठरवले असेल की भविष्यात एखादी ठराविक घटना घडली तर हे गिफ्ट रिमूव्ह म्हणजे रद्द करण्यात येईल पण ह्यासाठी सर्वांत महत्वाची अट म्हणजे भविष्यातील घटना डोनर च्या नियंत्रना बाहेर असायला हवी. पूढे अशी ही तरतूद आहे की केवळ डोनर च्या इचछेनुसार एक वैध गिफ्ट रद्द करता येत नाही.

याशिवाय द मेंटेनन्स अँड सिनिअर सिटीझन ऍक्ट 2007 या कायद्यानुसार जर एखाद्या वयस्कर व्यक्तीने किंवा पालकाने बक्षीसपत्र करून देत असताना आपल्या पाल्याने आपला व्यवस्थित सांभळ करावा अशी अट त्यात समाविष्ट केली असेल आणि नंतर त्या पाल्याने या अटीचा भंग केला तर त्या वयस्कर व्यक्तीला किंवा पालकाला न्यायालयात मागून अस बक्षीसपत्र रद्द करून घेता येतं. अशाच एका केस मध्ये २०१८ साली मुंबई ऊच्च न्यायालयाने सिनिअर सिटीझन Tribunal चा निर्णय योग्य ठरवत वडिलांनी त्याच्या मुलाच्या आणि सुनेच्या नावी केलेल्या एक बक्षीसपत्र रद्द ठरवले.

आता शेवटचा पण महत्वाचा प्रश्न तो म्हणजे बक्षीस पत्रावर इनकम टॅक्स लागतो का?: एका आर्थिक वर्षात मिळालेल्या गिफ्ट चं एकूण मूल्य ५००० रू . पेक्षा कमी असेल तर त्यावर इन्कम टॅक्स भरावा लागत नाही. पण हे मूल्य ५०००० हून अधिक असेल तर त्या गिफ्ट च्या एकूण स्टॅम्प ड्युटी मूल्यावर इनकम टॅक्स आकारला जातो. पण यालाही काही अपवाद आहे.

उदा: – पती, पत्नी, भाऊ, बहीण, आई वडील, काका, काकू, मुलगा, मुलगी अशा काही नातेवाईकांकडून मिळालेले गिफ्ट किंवा लग्नात मिळालेले गिफ्ट्स यांच्यावर इन्कम टॅक्स आकारला जात नाही. त्याच प्रमाणे डोनर ने मृत्यूशैली वर केलेले दान किंवा काही ठराविक संस्था, रुग्णालय, महाविद्यालय यांनी केलेले दान किंवा त्यांना मिळालेलं दान यांच्यावर आयकर आकारला जात नाही.

सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

2 thoughts on “Gift Deed (बक्षीस पत्र) म्हणजे काय? त्याद्वारे कोणती प्रॉपर्टी देता येते? त्याच्या रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया काय? स्टॅम्प ड्युटी लागते का? रद्द करण्याची प्रक्रिया काय असते? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *