बंजारा म्हणजे नेमका कुठला समाज? बंजारा समाजात पोहरादेवीचे महत्व काय आहे? बंजारा आणि वंजारी हे एकच आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !
बंजारा हे नाव आपल्या समोर काढले की खर तर लोकांची गफलत होते. बंजारा आणि वंजारी हे एकच आहेत का? असे बरेचदा वाटून जातात. पण खरंच ते एकच आहेत का? ते आपण शोधुया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बंजारा हा समाज महाराष्ट्रा मध्ये सर्व दूर पसरलेला आहे.
दोन मुख्यमंत्री या समाजाने महाराष्ट्राला दिलेले आहेत. १)वसंतराव नाईक आणि २)सुधाकरराव नाईक हे दोन मुख्यमंत्री या बंजारा समाजने महाराष्ट्राला दिलेत. पण तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा मोठ्या जनतेला नेमका बंजारा समाज कुठला आहे? तो नेमकं काय करतो? आणि या बंजारा समजा साठी सेवालाल महाराज आणि पोहरा देवी यांचे महत्त्व काय आहे? या विषयी कमी माहिती आहे. तीच माहिती शोधण्याचा व जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
खरं तर बंजारा ही एक भटकी जमात आहे. बरेचसे बंजारा सांगतात की त्यांचा ओरिजिन किंवा त्यांचा उगम हा राज्यस्थानातून आहे. तर नेमके कसे आहे. ते आपण पाहणार आहोत. की ही भटकी जमात ती स्थिरावली कशी? हे आधी पाहणे गरजेचं आहेत. इंग्रज येण्याच्या आधी पर्यन्त ही भटकी जमात भारत भर फिरून घोड्या वरून मिठाचा व्यापार करत होते. पण घोड्या वरून मिठाचा व्यापार करता करता ही जमात भारतभरा मध्ये स्थिरवरली.
महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त स्थिरावली आणि त्याचे कारण ठरले ते म्हणजे इंग्रजाचे राज्य. १८१८ मध्ये संपूर्ण भारतावरती प्रभुत्व मिळवल्या नंतर इंग्रजांना भारतातले जंगलांवरती प्रभुत्व मिळवायचे होते. पण या जंगलाच्या सगळ्या महत्वाच्या मार्गांवरती जे खानव दोष होते. किंवा जे भटकंती करून फिरणारे ज्या जमाती होत्या त्यांचे वर्चस्व होत. त्याच्या मध्येच बंजारा समाज हा सुद्धा येतो.
खरं तर या बंजारा समाजाला तिथून हुसकावून लावणं इंग्रजांना फार कठीण गेले. इंग्रजांनी केलेले प्रत्येक हल्ले बंजारा समाजाने परतवून लावले. मग आता या बंजारा समाजाला नेमकं जिरेला कसे आणायचे? म्हणून इंग्रज सरकारनं १८७१ मध्ये एक कायदा आणला. जो कायदा असा होता, की काही जमाती म्हणजेच बंजारा असतील किंवा महाराष्ट्रा मध्ये इतर काही भटक्या जमाती आहेत ज्यांच्या वरती कायम स्वरुपी गुन्हेगारीचा शिक्का लावणारा कायदा आणण्यात आला.
म्हणजेच हे ह्या जमाती ह्या जमाती मध्ये जन्माला आलेली माणसं ही जन्मतःच गुन्हेगार आहेत. आणि त्यांना तुम्ही डांबा किंवा त्यांच्यावर तुम्ही गुन्हेगार म्हणून तुम्ही त्याच्यावरती कारवाही करा. असा अधिकार देणारा हा कायदा होता. बंजारा सामजाच्या लोकांनी मात्र हा कायदा आपल्यावर नको किंवा आपल्याला हा कायद्या पासून मुक्तता हवी म्हणून त्यांनी काही ठिकाणी इंग्रजांशी तहा केला.
आणि इंग्रजांशी तहा केल्या नंतर मात्र बंजारा समाजातल्या लोकांना इंग्रजांनी स्वस्तातले लेबर म्हणून वापरायला सुरुवात केली. इंग्रजांच नवं राज्य होत. भारतामध्ये त्यामुळे त्यांना बरचसं निर्माण कार्य करायचं होत. आणि ही निर्माण कार्य करण्यासाठी, बांधकाम करण्यासाठी त्यांना मजुरांची गरज होती. त्यांनी बंजारा समजातल्या लोकांना मजूर म्हणून वापरायला सुरुवात केली. म्हणजे जो समाज सुरुवातीला घोड्या वरून मिठाचा व्यापार करत होता तो मात्र नंतर च्या काळा मध्ये बांधकाम साईट वरती मजूरी करायला लागला.
त्याचे खरं कारण हे इंग्रजांच्या या शासन काळा मध्ये आहेत. अर्थात आपला पारंपारिक रोजगार आणि पारंपारिक व्यापार हा हिरवल्या नंतर हा समाज स्थिरावला आणि त्याने इतर कामांमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. पण तरी सुद्धा बरचश्या बंजारा समाजातल्या लोकांचं म्हणणं आहे की त्यांचे ओरिजिन हे महाराष्ट्रातले नसून ते राजस्थानातले आहे.
तर त्याची गोष्ट अशी सांगितली जाते की महाराणा प्रताप हे एक मोठे राजे राजस्थाना मध्ये होऊन गेले आणि त्यांनी या खाणाव दोष किंवा भटकंती करणाऱ्या समाजातल्या बऱ्याचशा लोकांना राजश्रय दिला होता. जसे की महाराष्ट्र मध्ये घिसाडी नावाची एक जमात आढळते त्या जमातीला सुद्धा किंवा त्या जमातीच सुध्दा म्हणणं आहे की त्यांचे ओरिजीन हे राजस्थानातून आहे. कारण महाराणा प्रताप यांनी अशा बऱ्याचशा जमातींना राजाश्रय दिला होता.
त्यांचा वापर त्यांच्या मोहिमांमध्ये करून घेतला होता. म्हणजे घिसाडी समाज हे हत्यारे बनवण्यासाठी ओळखले जायचे तर त्यांचाकडन महाराणा प्रताप हे हत्यार बनवून घ्यायचेत. याच बंजारा समाजाला भारत भरातले सगळे महत्वाचे, सगळ्या जंगलामधले सगळे रस्ते माहिती होते. त्यामुळे एकतर मोहिमा साठी त्यांचा वापर व्हायचा, त्यांची मदत व्हायची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रसद पुरवण्यासाठी सुद्धा त्यांची मदत होत होती.
म्हणून महाराणा प्रताप यांनी त्यांना पदरी ठेवलं. त्यांना जागा दिली, त्यांना जमिनी दिल्या त्यांच्यावर वसाहती नेमल्या त्यामुळे बऱ्याचशा लोकांचा तिकडे म्हणजे जे भटकंती करून फिरत होते ते ती लोक बरच अंशी राजस्थाना मध्ये स्थिरावली आणि हेच कारण सांगितले जाते की ही मंडळी प्रत्येक वेळेला सांगतात की ओरीजिन हे राजस्थानातून आहे पण हे ही तितकेच खर आहे की महाराणा प्रताप यांच्या नंतर मात्र या ज्यांना कोणाला महाराणा प्रताप यांनी राजाश्रय दिला होता त्यांची काही प्रमाणात वाताहत झाली.
हा बंजारा समाज किंवा या बंजारा समाजातील महिला या त्यांचा विशिष्टपूर्ण अशा वेशभूषेसाठी सुद्धा ओळखले जातात. बऱ्याचदा या महिला त्यांच्या शरीरावरती जी वेशभूषा असते त्याचा मधे खूप साऱ्या काचा असतात, खूप सारे आरसे असतात तर अनिल अवचट यांनी माणसा नावाच पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकात त्यांनी वर्णन करतांना लिहिलं आहे की बऱ्याचदा या महिला ह्या अशा प्रकारचे आभूषण घालतात की त्याचे कारण म्हणजे नजर लागू नये ही त्या मागची भावना असते.
आणि आज ही त्यांचे हे कल्चर बऱ्याच अंशी ह्या समाजातील माणसं टिकवून आहेत. महाराष्ट्रातील विदर्भामध्ये हा समाज खूप मोठ्या प्रमाणात आढळतो. महाराष्ट्रातल्याच आपल्या विदर्भात वाशिम जिल्ह्यातल्या मनोरा तालुक्यामध्ये पोहरा देवी हे स्थान आहे. पोहरा देवी या स्थानाला बंजारा समाजामध्ये विशेष महत्त्व आहे. जसे वंजारी समाजामध्ये भगवान गडाला विशेष महत्त्व आहे आणि भगवान गडावरून दिल्या जाणाऱ्या संदेशाला एवढे महत्व आहे तेवढंच महत्त्व या पोहरा देवी या स्थानाला किंवा तिर्थक्षेत्राला बंजारा समाजामध्ये महत्त्व आहे.
त्याची दोन कारण आहेत. एक म्हणजे बंजारा समाज ज्या जगदंबा देवीला मानतो त्या जगदंबा देवीच तिथे मंदिर आहे. आणि बंजारा समाजातले सगळयात मोठे संत आता पर्यंत होऊन गेले आहेत ते सेवालाल महाराज त्या सेवालाल महाराजांची तिथे समाधी आहे. महाराजांची समाधी आणि देवी यांचे मंदिर हे अगदी समोरा समोर आहे. त्यामुळेच दर वर्षी वेग वेगळ्या हिंदू सणाना बंजारा समाज या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करतो. हजेरी लावतो.
इथली जी महंत मंडळी आहेत त्यांनी जो संदेश जारी केलेला असतो किंवा वेळोवेळी ते बंजारा समाजा साठी काही मार्गदर्शक गोष्टी सांगतात त्यांना बंजारा समाजा मध्ये अत्यंत महत्त्व आहे. पण त्याहून महत्त्व आहे ते म्हणजे बंजारा समाजामध्ये सेवलाला महाराजांना.
सेवालाल महाराज हे एक थोर तत्वज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी चांगले तत्वज्ञान सांगितलेले आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बंजारा समाजा मध्ये सेवालाल महाराज यांची सुद्धा पूजा केली जाते. कुठल्याही भाग मध्ये म्हणजे जर तुम्ही कुठेही पाहात असाल आणि जिकडे जर बंजारा समाजाची वस्ती आहे. तिकडे तुम्हाला सेवालाल महाराज यांचे मंदिर आणि जगदंबा देवीचे मंदिर नाही असे कधीच होणार नाही.
ते कायम तुम्हाला दिसेल जर तुम्ही विदर्भ आणि मराठवाड्यात फिरत असाल तर तुम्हाला बंजारा समाजाच्या लोकवस्ती सुद्धा तात्काळ ओळखता येऊ शकता.कारण त्या लोकवस्ती वरती बरेचदा तुम्हाला सेवालाल महाराजांचा सफेद झेंडा सुद्धा दिसेल आणि त्याच्यावरती जय सेवालाल लिहिलेले असेल. तात्काळ तुम्ही ओळखू शकता की ही बंजारा समाजाची वस्ती आहे. हे सेवालाल महाराज आणि या सेवालाल महाराजांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाला बंजारा समाजा मध्ये विशेष महत्व आहे.
१७ व्या शतकात होऊन गेलेल्या सेवालाल महाराज यांना एक समाज सुधारक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी समाज सुधारण्यासाठी 22 तत्व सांगितली आहे किंवा 22 वचनं सांगितली आहेत. जी तत्व किंवा जी वचनं ही निसर्गाशी निगडीत आहेत. म्हणजे निसर्गाचे जतन करा. पर्यावरणाचे रक्षण करा पाणी विकू नका, पाणी अडवा, पाण्याचं महत्व समजून घ्या. अशी वेगवगळी वचनं आहेत.
खोटं बोलू नका, दारू पिऊ नका, स्वयराचार करू नका अश्या बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. पण त्याच्या वचनांमधील सगळयात महत्वाचं वचनं आहे ते म्हणजे महिलांचे रक्षण करा, महिलांचा सन्मान करा आणि महिलांचा सन्मान करा याच वचनां साठी सुद्धा सेवालाल महाराज ओळखले जातात. सेवालाल महाराज याच्या पिढीतली जी पुढची मंडळी आहेत त्या पुढच्या मंडळींना सुद्धा बंजारा समाजामध्ये विशेष महत्व आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींना विशेष मान बंजारा समाजामध्ये कायम दिला जातो.
आता आपण वळूया एका महत्वाच्या मुद्द्या कडे ते म्हणजे बंजारा समाज आणि वंजारी समाज बरेचदा बंजारा समाज आणि वंजारी समाज हा एकच आहे असा समज शहरी माणसानं होऊन जातो. पण खरं तर हे दोन्ही समाज पूर्ण पणे वेगळे आहेत. नावा मध्ये थोडसं साधर्म्य आहेत. त्यामुळे असं वाटत की बंजारा म्हणजेच वंजारी आणि वंजारी म्हणजेच बंजारा पण तसे नाहीये हे दोन्ही समाज पूर्णतः वेगळे आहेत.
वंजारी हा सुध्दा थोड्या बहुत प्रमाणात भटकंती करणारा समाज आहे. पण त्याचे अस्थित्व हे बऱ्याच अंशी महाराष्ट्र मध्ये आहे. आणि हा समाज शेतीशी निगडीत आहे. मुख्य करून ऊस तोड कामगार हे ह्या समाजातून येतात. आणि ऊस तोडनी साठी ते महाराष्ट्र भर फिरत असतात. कधी कधी ते महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ऊस तोडीच्या कामा साठी जात असतात आणि टोळीच्या स्वरुपात ते काम करतात पण बंजारा हा समाज मात्र सुरुवाती पासूनच व्यापारी समाज राहिलेला आहे.
तो सुरुवाती पासूनच व्यापारी गोष्टीशी निगडीत राहिलेला आहे. व्यापार करत राहिलेला आहे व्यापार साठी भटकत राहिलेला आहे. आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे हा समाज भारत भरात सगळीकडे आढळतो. हा समाज भारत भरात सगळीकडे असला तरी सुद्धा त्यांची गोरमाटी हीच बोली भाषा तो बोलतो. म्हणजे भारत भरात इतर समाजही भारत भरात वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेला आहे.
पण त्यांनी त्या मातीतली त्या त्या भागातली बोली संस्कृती ही आत्मसात केलीये. पण बंजारा समाजानं मात्र त्यांची बोली त्यांची संस्कृती त्यांची वेशभूषा त्यांचा रहणसहन त्यांचा मानपान ह्या गोष्टी जतन केलेल्या आहेत. त्या कुठल्या ही काना कोपऱ्यात गेल्या नंतर ते एकसारखेच दिसतात. हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही बंजारा समाजाच्या बाबती आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रा मध्ये मात्र बंजारा समाज डी.टी.ए या प्रवर्गात येतो. तर वंजारी समाज हा एन.टी.डी या प्रवर्गात येतो.
दोन्ही समाजाना महाराष्ट्रामध्ये आरक्षण आहे. पण केंद्राच्या कॅटेगरी मध्ये मात्र हे दोन्ही समाज ओ.बी.सी. या कॅटेगरी अंतर्गात येतात. पण तरी ही हे दोन्ही समाज महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्ट्या प्रबळ आहेत. पण त्याच्या मध्ये एक छोटासा फरक असा आहे की वंजारी समाज हा त्याचा प्राबल्य हे मराठवाड्यामध्ये आहे.
आणि मराठवाड्यामध्ये त्या समाजाचं वर्चस्व दिसून येत. पण बंजारा हा समाज विदर्भ आणि मराठवाड्यात असला तरी सुद्धा महराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या इतर महत्वाच्या शहरांमध्ये हा समाज राहतो तो वस्त्यांमध्ये एकत्र स्वरूपात राहतो. त्यामुळेच त्यांची बार्गेनिंग पॉवर त्या त्या भागामध्ये भरपूर आहे.
म्हणून आपल्याला बरेचदा वेगवेळ्या पंचायत समित्या वेगवेळ्या महानगर पालिका वेगवेगळ्या नगर पालिका ग्रामपंचायती या ठिकाणी कुठेन कुठे तरी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बंजारा समाजाचा एक प्रतीनिधी किंवा एक नेता तुम्हाला दिसून येईल. नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य किंवा आमदार महाराष्ट्राच्या राजकरणामध्ये हा समाज बऱ्या पैकी पुढे आहे. अर्थात नेमकं कुठला समाज वरचढ आहे.
म्हणजे बंजारा की वंजारी हे सांगणं कठीण आहे. कारण आपल्या मध्ये किंवा आपल्या भारता मध्ये जातनीय जन गणना झालेली नाहीये आणि त्यामुळे नेमक्या आकडे सांगणं कठीण आहे. पण तूर्तास तरी असे दिसून येते. की बंजारा समाजानं महाराष्ट्राला दोन मुख्य मंत्री आता पर्यंत दिलेले आहेत.
वसंतराव नाईक आणि मनोहर राव नाईक हे दोन मुख्य मंत्री या समाजानं महाराष्ट्राला दिलेलेत. आणि हा समाज ज्या ज्या ठिकाणी राहतो त्या त्या ठिकाणी एकत्र राहत असतो आणि त्या एकीचाच बळ किंवा त्या एकिचाच फायदा त्यांना त्यांच्या राजकीय महत्त्वकांक्षी मध्ये किंवा राजकीय गरज पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी होत असतो.
खुप सूंदर माहीती दीलीत धन्यवाद।
आपल्या देशात बंजारा समाज याना सांस्कृतिक वारसा आहे,त्यांचा कल्चर वेशभूषा बोली भाषा रीतरीवाज खान-पान सदा आंनदी राहण मेहनत गायन अप्रतिम आहे।
हे कल्चर जपल पाहीजे।
जय सेवालाल
Khup sundar mahiti ahe banjara samaj ha itar kuthlyahi rajyatla nasun maharastratil connectivity ahe..
Jay sewalal