व्हीलचेअर वर पूर्ण केला IIT ते ISRO पासून IAS पर्यंतचा प्रवास : जाणून घ्या IAS टॉपर कार्तिक कंसल यांचा प्रवास

शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

”ध्येय एवढं मोठं असावं की समोर येणार्‍या अडचणी अगदी शुल्लक वाटाव्या.” हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण याचे जिवंत उदाहरण क्वचितच पाहायला मिळते. जेव्हापासून UPSC चा निकाल आला आहे. तेव्हापासून तुम्ही अनेक प्रेरणादायी कथा ऐकल्या असतील. पण आज आपण जी गोष्ट पाहणार आहोत ती वेगळी आहे. खूपच वेगळी. आजच्या आपल्या या प्रेरणादायी कथेचा हीरो आहे कार्तिक कंसल. 2021 मध्ये झालेल्या नागरी सेवा परीक्षेत कार्तिकने 271 वा रँक मिळवला. आज या लेखाच्या माध्यमातून कार्तिकने व्हीलचेअरला कमकुवतपणा न बनवता एवढे मोठे यश कसे मिळवले ते सांगणार आहोत!

ISRO मध्ये नौकरी करत असताना दिली IAS ची परीक्षा : 

कार्तिक कंसल हा रुरकीचा रहिवासी आहे. 2018 च्या जवळपास कार्तिकने त्याच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे. त्यांनी सांगितले की, जेंव्हापासून त्यांनी इस्रोमध्ये काम करायला सुरुवात केली तेंव्हापासून ते अभ्यास आणि नोकरी दोन्ही एकत्र सांभाळायचे. सोमवार ते शुक्रवार 9 तास काम केल्यानंतर ते सायंकाळी साडेसहा ते रात्री 11 वाजेपर्यंत अभ्यास करायचे. मात्र शनिवार-रविवार कार्तिक अभ्यासासाठी जास्तीत जास्त वेळ देत असे.

मस्कुलर डिस्ट्रॉफीने ग्रस्त : 

काही लोकांना यश सहजासहजी मिळत नाही. कार्तिकसोबतही असंच काहीसं घडलं. त्यांना वयाच्या ८ व्या वर्षी ‘मस्क्युलर डिस्ट्रॉफी’ या आजाराने ग्रासले होते. या आजारात शरीराचे अवयव हळूहळू काम करणे बंद करतात. त्यामुळे त्यांनी व्हीलचेअरचा वापर सुरू केला, पण कार्तिकने हा आजार त्याच्या ध्येयाच्या आड येऊ दिला नाही आणि योग आणि थेरपीने स्वतःला बरे करण्याचा प्रयत्न केला.

कार्तिकने IIT रुरकीमध्ये प्रवेश घेतला. 2018 मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अभियांत्रिकीमधील पदवीधर अभियोग्यता चाचणी (GATE) आणि केंद्रीय सार्वजनिक आयोग अभियांत्रिकी सेवा (IES) सारख्या अनेक परीक्षा दिल्या. पण, त्यांचा आजार आता त्यांच्या ध्येयाच्या आड येत होता. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, ” मी माझ्या प्रिलिम्स अभियांत्रिकी सेवा परीक्षेत चांगली कामगिरी केली. पण जेव्हा यादी आली तेव्हा मला समजले की माझ्या आजारपणामुळे मी या पदासाठी पात्र नाही. माझ्यासाठी हा सर्वात वाईट काळ होता. मानसिकदृष्ट्या मी प्रत्येक गोष्टीसाठी तयार होतो. पण माझ्या या आजाराचं काय करू? माझं स्वप्न मला तुटताना दिसत होते. ”

ही पॉलिसी बदलण्यासाठी बनले IAS : 

कार्तिकला ही सध्याची परिस्थिती बदलायची होती. त्यामुळेच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. त्यांची तळमळ आणि समाज बदलण्याची जिद्द त्यांना आज इथपर्यंत घेऊन आली आहे.

तीन वेळा केला प्रयत्न : 

कंसल नागरी सेवा परीक्षेला तीनदा बसला. 2019 मध्ये पहिल्याच प्रयत्नात तो 813 वा क्रमांक मिळवण्यात यशस्वी झाला. त्याला दर्जेदार पद मिळत असले तरी गुण सुधारून प्रशासकीय पद मिळवायचे होते. 2020 मध्ये, तो पुन्हा UPSC नागरी सेवा परीक्षांना बसला, आणि प्रिलिम्स क्रॅक करण्यात यशस्वी झाला परंतु मुख्य परीक्षेनंतर रँक मिळवण्यात तो अपयशी ठरला. परंतु या अपयशानेच त्याला कठोर परिश्रम करून इष्ट दर्जा मिळविण्यास प्रवृत्त केले. लेखनात अडचण असूनही त्यांनी लेखी परीक्षेसाठी दररोज सराव केला.

एका इंटरव्हूमध्ये बोलताना कंसलने खुलासा केला की, त्यांची आई ममता गुप्ता ही लहानपणापासूनच त्याचा सर्वात मोठा आधार आहे. तिच्या इच्छाशक्तीमुळेच कंसलला सर्व अडचणींवर मात करत आपली स्वप्ने पूर्ण करता आली.

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील इस्रोमध्ये सध्या कार्यरत असलेल्या कंसल यांना प्रशासकीय सेवा किंवा महसूल सेवांमध्ये प्रवेश मिळण्याची आशा आहे. अहवालानुसार, सेवा वाटप यादी अद्याप येणे बाकी आहे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.