तुम्ही बँकेतून कर्ज काढले आणि ते तुम्ही भरलेच नाही तर बँक काय करू शकते याबाबतची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
१. कर्जाचे प्रकार किती असतात. २. तुमचे खाते कधी NPA होतं. ३. सलग तीन महिने कर्जाचे हप्ते भरले नाही तर बँक काय करते. ४. तुमचा सिबिल रिपोर्ट म्हणजे काय. ५. सिबिल रिपोर्ट कसा काय खराब होतो. ६. तुमची प्रॉपर्टी बँक कधी विकू शकते. ७. बँकेचे कर्ज जर भरलेच नाही तर बँक करून करून काय करेल.
१. कर्जाचे प्रकार:
1) सुरक्षित कर्ज: यामध्ये होम लोन, कार लोन गोल्ड लोन, FD लोन हे बँकेच्या दृष्टीने सुरक्षित कर्ज प्रकारात मोडतात. कारण होम लोन मध्ये तुमचे घर बँकेकडे तारण असते त्यामुळे त्या घरावर बँकेच्या अधिकार असतो. तशाच प्रकारे कार लोन गोल्ड लोन एफ डी लोन या सर्वावर बँकेचे अधिकार असतात.
2) असुरक्षित कर्ज: यामध्ये प्रामुख्याने पर्सनल लोन येत. कारण यात कोणतेही सेक्युरिटी घेतले जात नाही. तसेच सरकारी स्कीम च्या लोन मध्ये सुद्धा सेक्युरिटी घेतली जात नाही. असे असले तरी या प्रकारचे कर्ज हे अत्यंत कमी रकमेचे कर्ज असतात. तर मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्याकडे कोणत्या प्रकारच्या कर्ज आहे ते.
२. कर्ज खात कधी NPA होत : बँकेतून लोन घेताना बँक आपल्याला हप्ते बांधून देते. ज्याप्रमाणे आपण दरमहा हप्ते भरत असतो. ज्या कालावधी साठी कर्ज दिलेले आहे त्या कालावधीत हप्ते देत राहिलो तर कर्ज फेडले जाते आणि तुमचे कर्जाचे खाते बंद होते. परंतु तुमचे इ एम आय म्हणजेच तुमचे हप्ते जर तुम्ही सलग तीन महिने जर भरले नाही तर मात्र या कर्जाचे खाते NPA होते.
अशावेळी कर्जचे खाते उघडण्यासाठी या कालावधीत बँकेकडून तगादा सुरू असतो व फोनही केले जातात. नोटीस सुद्धा पाठविली जाते. आता तुम्ही म्हणाल की सध्याच्या करोनाच्या परिस्थितीत सरकारनेच अनेकांना हप्ते न भरण्याची सवलत दिलेली आहे. तर NPA होईल का? होणार नाही कारण सरकारने ही सवलत देऊ केली आहे.
आपले फक्त लोनचे हप्ते पुढे ढकलण्याची आपल्याला सवलत दिली गेली आहे. पण आपल्याला त्या त्या महिन्याचं व्याज मात्र बँकेला देणे आवश्यक आहे. सरकारने ते व्याज माफ केलेले नाही. हे लक्षात घेणे गरजेचे आहे की जर तुम्ही कर्जाचे हप्ते सलग 3महिने भरू शकला नाहीत आणि बँकेच्या सततच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असाल तर अश्या वेळी तुमचे कर्ज खाते NPA समजले जाते आणि इथून पुढे बँक तुमच्या विरोधात कारवाई करायला लागते.
३. आता बँक काय करू शकते : सर्वप्रथम सुरक्षित प्रकारच्या कर्जामध्ये बँक सिबिल कंपनीला रिपोर्ट करेल की अमुक अमुक व्यक्तीने अमुक प्रकारचे कर्ज घेतलेले आहेत पण तो हप्ते भरत नाही, कर्ज खाते NPA झाले आहे, तत्पूर्वी आपण सिबील म्हणजे काय थोडक्यात जाणून घेऊया, सिबील म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड.
ही कंपनी भारतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आणि कंपनीच्या आर्थिक हालचालींची नोंद ठेवते. सिबील कडे आपला आर्थिक लेखाजोखा असतो. आपले क्रेडिट कार्ड, कर्ज, कर्जाची वारंवारता, त्याचे हप्ते, त्यांची झालेली परतफेड, परतफेड करण्याच्या वेळा, पद्धतीत थकबाकी इत्यादी सगळी माहिती या कंपनीकडे जपली जाते. ही सगळी माहिती नोंदणीकृत बँका आणि इतर आर्थिक संस्था सिविल कडे नियमितपणे पोहोचवत असतात.
सिबील च्या या सगळ्या माहितीवर आधारित प्रत्येक व्यक्तीच्या एक क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट सी आय आर म्हणजेच क्रेडिट स्कोर तयार करते. या क्रेडिट स्कोर लाच तुमची अधिकृत आर्थिक विश्वासाहर्ता म्हणून पाळले जातात आणि ज्यावेळी कधी तुम्ही कर्ज काढण्यासाठी बँकेकडे जाता त्यावेळी बँक सर्वप्रथम तुमचा हा रिपोर्ट काढून बघते.
पण हे तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्ही कर्ज फेडू शकला नाही तर बँक सिबील ला कळवेल आणि तुमचा रिपोर्ट खराब होईल. अशा परिस्थितीत तुमच्या संपूर्ण जीवनात तुम्हाला कुठलीही बँक किंवा कंपनी तुम्हाला कर्ज देणार नाही. तुमचा सिबिल स्कोर जर 740 च्या खाली येत असेल तर तुम्हाला कर्ज किंवा लोन मिळत नाही.
त्यानंतर मात्र झालेल्या कर्जखात्याची मालमत्ता कायदेशीर प्रक्रिया द्वारे विकण्यात येते आणि पैसे वसूल केले जातात. अशा प्रकारे बँक तुम्हाला दिलेला पै ना पै वसूल करते. या प्रक्रियेद्वारे बँकेचे पैसे वसूल होतात पण तुमचे नाव खराब होत. तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यात कुठूनही कर्ज मिळणे दुरापास्त होतं.
सुरक्षित लोन बद्दल ची प्रक्रिया : यामध्ये बँकेकडे तुमची कोणतीही प्रॉपर्टी गहाण असत नाही. या प्रकारामुळे बँकेला जास्त काही करता येत नाही. तुमची रक्कम सुद्धा थोडीच असते. त्यामुळे बँकेला काही फरक पडत नाही. पण तुमच्या खात्याची रिपोर्ट सिबील ला करते त्यामुळे तुम्हाला जीवनभर कोणत्याही प्रकारचे कर्ज घेता येत नाही.
आपण सामान्य माणसे आहोत आपण कर्ज बुडवून विजय मल्ल्या किंवा नेहरू मोदीसारखं देश सोडून जाऊ शकत नाही. त्यामुळे जीवनात कधीही तुम्ही बँकेचे कर्ज बुडवू नका आणि तुम्ही असा विचार करू नका की बँक करून करून काय करेल? बँकेला जे करायचे आहे ते तुम्हाला न कळवता बँक परस्पर करेल आणि तुमचे सारे प्रताप सिबील ला कळवेल. जेव्हा कधी तुम्हाला पुन्हा कर्जाची आवश्यकता भासेल त्यावेळी तुम्हाला तसेच तुमच्या कुटुंबाला कर्ज मिळणे दुरापास्त होईल त्यामुळे तुम्ही घेतलेल्या कर्जाचे हप्ते नियमित भरून तुम्ही सुरक्षित व्हा आणि देशाला सुरक्षित करा.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.