तुमच्याबद्दल वाईट बोलणारे लोक तुमचे तळवे चाटतील ।। तुमच्याबद्दल निगेटिव बोलणाऱ्या लोकांना त्यांची लायकी दाखवून द्यायची असेल तर ‘हे’ सात नियम फॉलो करा !

लोकप्रिय

आपल्यापैकी प्रत्येकाला भीती वाटते लोक काय म्हणतील? मी जे काम करतो आहे त्यामध्ये यशस्वी होईल की नाही? आणि जर नाही झालो तर लोकांची प्रतिक्रिया काय असेल? ही भिती मला सुद्धा वाटत होती. करिअरची सुरुवात करताना माझ्या मनात सुद्धा असेच विचार यायचे. पण हे विचार कसे दूर झाले ज्या लोकांना वाटत होते मी यशस्वी होऊ शकणार नाही तेच लोक आज माझ्याकडे आदराने पाहतात. याचं काय कारण?

जर तुम्हालाही तुमच्या आसपास असणाऱ्या नकारात्मक लोकांची मान खाली घालवायची असेल तुमच्याबद्दल निगेटिव बोलणाऱ्या लोकांना त्यांची लायकी दाखवून द्यायची असेल तर जे मी सात नियम फॉलो करतो ते तुम्हालाही फॉलो करावे लागतील. कारण प्रत्येक गोष्ट नियमाने चालते. जोपर्यंत तुम्ही स्वतःला नियमांमध्ये जखडून घेणार नाही तोपर्यंत यशस्वी होणं कठीण असतं. 7 नियम लक्षात ठेवायचे असतील तर एक वाक्य लक्षात ठेवा, ‘I AM KING’. ह्या वाक्य मध्ये खूप मोठा अर्थ दडलाय.

1)आय ॲम किंग या शब्दातील पहिले अक्षर आहे आणि ‘I’ या अक्षरा पासून तयार होतो पहिला नियम: I = Interest : तुमची इच्छा काय आहे? तुमच्या स्वतः कडून अपेक्षा काय आहेत? मित्रांनो आपल्या आजूबाजूच्या अपयशी लोकांची जर तुम्ही माहिती घेतली तर त्यांच्यामध्ये एक गुण कॉमन असतो तो म्हणजे त्यांचं ध्येय ठरलेलं नसत.

त्यांना कशा मध्ये इंटरेस्ट आहे? काय करण्याची इच्छा आहे? हे त्यांनी कधीच जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला नसतो. ते नेहमी अशी कामं करतात जी त्यांना जगण्यासाठी गरजेची वाटतात. ते काम फक्त त्यांना दोन वेळेचे अन्न देऊ शकते. ज्यामुळे ते फक्त जिवंत आहेत. पण मी अशा लोकांना जिवंत मृतदेह म्हणतो याचे एकमेव कारण अर्थहीन जगणं. सर्वात पहिला तुम्हाला तुमचा निश्चय समजून घ्यायला हवा.

असं कोणतं काम आहे जे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता? कोणाला खूप चांगली ॲक्टिंग येत असेल, डान्स येत असेल, स्पिकिंग स्किल चांगले असतील, बिझनेस करण्याची आवड असेल, एखादी अशी नोकरी असेल जी तुम्हाला मनापासून करण्याची इच्छा असेल. मग ते कोणतेही क्षेत्र असो ज्या क्षेत्रामध्ये तुमची आवड आहे त्या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात करा.

जोपर्यंत तुम्हाला तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे हे समजणार नाही तोपर्यंत समाज तुमची घेतच राहणार. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमच्या होणाऱ्या अपमानाला फक्त आणि फक्त तुम्हीच जबाबदार असतात त्यामुळे लवकरात लवकर स्वतःच्या स्वप्नांचा आदर करा आणि योग्य ती निवड करा.

2) A = Attitude : तुमचा इंटरेस्ट काय आहे हे तुम्हाला क्लियर होतं त्यानंतर खूप गरजेचा आणि महत्त्वाचा असतो एटीट्यूड. पण तुम्हाला एटीट्यूड या शब्दाचा अर्थ माहिती आहे का? 99 टक्के लोक या शब्दाचा वापर समोरच्या व्यक्तीची मस्ती दाखवण्यासाठी त्याचा गर्व दाखवण्यासाठी करतात. त्या मुलाला खूप एटीट्यूड आहेत त्या मुलीला खूप एटीट्यूड आहे. हा शब्द कोणाची घमेंडी दाखवण्यासाठी नाही.

हा शब्द तुमचा कॉन्फिडन्स दाखवतो, तुमची प्रेरणा जिद्द मेहनत करण्याची ताकद, ध्येयाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा एटीट्यूड दाखवतो. मोठे लोक नेहमी त्यांच्या लिखाणातून सांगत असतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एटीट्यूड. निगेटिव्ह एटीट्यूड म्हणजे घमेंड, मस्ती, माज अहंकार. पॉझिटिव्ह एटीट्यूड म्हणजे आत्मविश्वासाने ध्येयाकडे केलेली वाटचाल.

म्हणून नेहमी स्वतःला एक पॉझिटिव्ह एटीट्यूड असणारा व्यक्ती बनवा. ज्याकडे पाहता क्षणी वाटतं त्या व्यक्तीमध्ये काही तरी असा गुण आहे जो त्यांना इतरांपेक्षा वेगळे म्हणतो. त्याच्या चेहऱ्यावरून हालचालीवरून हावभावावरून त्याच्या प्रत्येक कृतीतून त्याचा ॲटीट्युड म्हणजे त्याचे ध्येय वारंवार दिसत असतं. सोप्या भाषेत तुमच्या प्रत्येक कृतीतून जेव्हा तुमचे ध्येय दिसते तेव्हा त्याला पॉझिटिव्ह एटीट्यूड म्हणतात. जेव्हा तुम्हाला या वाक्याची खोली कळेल तेव्हा खरच तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करत असाल.

3) M= Motivated : तुम्हाला अनुभव आला असेल परीक्षा जवळ येताच वाटायला लागतं बारा तास पंधरा तास अभ्यास करायचा, सर्वकाही तोडून फोडून ठेवायचं म्हणजेच इंटरेस्ट असतो पहिला नंबर मिळण्यामध्ये तसा एटीट्यूड लगेच निर्माण होतो. अंगामध्ये ऊर्जा निर्माण होते. पण एका तासात किंवा एका दिवसातच सगळी हवा निघून जाते.

दहा-बारा तास काय एक तास सुद्धा अभ्यास होत नाही. याचं कारण असतं तुमच्या मध्ये असलेल्या प्रेरणेची कमतरता. जोपर्यंत गाडीमध्ये योग्य प्रमाणात इंधन उपलब्ध नसेल तोपर्यंत गाडी पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून नेहमी स्वतःला मोटिवेट ठेवण्याचा प्रयत्न करा.

4) K = Knowledge : तुमचं ध्येय ठरलं, अटीट्युड बनला आणि यशस्वी होण्याची प्रेरणा सुद्धा मिळाली, तरी सुद्धा यशस्वी होता येणार नाही. कारण चौथी पायरी आहे नॉलेज. ज्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचा आहे त्या क्षेत्रामध्ये संपूर्ण नॉलेज असणे खूप महत्त्वाचे असते. दररोज प्रत्येकाने स्वतःला एक टक्क्याने बदलण्याचा प्रयत्न करा तुमच्या नॉलेजमध्ये भर घालण्याचा प्रयत्न करा तेवढे नॉलेज वाढेल,

तेवढी महत्वकांक्षा वाढायला लागेल, आत्मविश्वास वाढायला लागेल, तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होईल. भारत देशामध्ये सुरू असलेल्या बिझनेस पैकी 90 टक्के बिझनेस बंद पडतात. याचं एकमेव कारण अपूर्ण नॉलेज. अभ्यासाची कमतरता. ज्या क्षेत्रामध्ये उतरत आहात त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती, परिपूर्ण अभ्यास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणतेही धाडस करू नका.

5) I = Intention : कोणतेही ध्येय कोणत्या कारणासाठी पूर्णत्वाला न्यायचे आहे याचा विचार करायला हवा. म्हणजेच जेव्हा एखाद काम फक्त पैशासाठी करण्याच्या दृष्टीकोनातून केलं जातं तेव्हा त्यामध्ये अपयश येतं. तर एखाद्या डॉक्टरने फक्त पैसे कमवण्याच्या उद्देशाने ऑपरेशन केलं योग्य ती काळजी न घेता ऑपरेशन यशस्वी होऊ शकणार नाही आणि जर अशीच अपयशाची रांग लागत गेली तर पुन्हा एकही पेशंट त्या दवाखान्यामध्ये पाऊल ठेवणार नाही.

जर एखादा दुकानदार पैसा मिळवण्याच्या उद्देशाने वस्तू विकत असेल तीच वस्तू दुसऱ्या दुकानात तो आपुलकीने त्याची माहिती सांगून विकत असेल तर लोक या पैसा मिळविण्याचे उद्दिष्ट असणाऱ्या व्यक्तीकडे कधीच खरेदी करणार नाही. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही दानधर्म करावा पैसे मिळविण्याचे उद्दिष्ट न ठेवता काम करत रहावं असं मुळीच नाही. जगातल्या मोठ्या कंपनीचे उद्दीष्ट पहा. त्यांची टॅगलाईन पहा तेव्हा तुम्हाला समजेल यशस्वी का आहेत.

टाटा कंपनी प्रसिद्ध आहे त्यांच्या तत्त्वांसाठी. त्यांचे स्वप्न होते गरिबांसाठी मध्यमवर्गीय लोकांसाठी अशी कार बनवायची जी कमी दारा मध्ये त्यांना मिळू शकते. जिओ ने विचार केला आपल्या ग्राहकांना खूप कमी दरामध्ये टेलिकॉम सर्विस प्रोव्हाइड करायची. एप्पल कंपनी ने विचार केला सर्वात बेस्ट क्वालिटी आपण प्रोव्हाइड करायची. पारले कंपनी म्हणते जी माने जीनियस. यातूनच तुम्हाला समजल असेल जेव्हा तुमच्या कामातून तुमच्या माध्यमातून लोकांना व्हॅल्यूज मिळतात तेव्हा लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात.

पैसे तर चोरी करून सुद्धा मिळवता येतात. लोकांचा विश्वासघात करून सुद्धा पैसे कमवता येतात. असे अनेक वाईट काम आहेत जे करून खूप सारा पैसा कमावता येतो. पण ते केल्यामुळे समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा अब्रू खालवली जाते. तुम्ही स्वतःच्या नजरेतून पडलेले असता. त्यामुळे कोणतेही काम करण्याआधी पहिले इंटेन्शन असायला हवी व्हॅल्यूज प्रोवाईड करणे. इतरांना तुमच्या कृतीमधून काही तरी मिळवून देणे. तेव्हा तुम्ही यशस्वी बनाल.

6) N = Non stop work : वरच्या पाच तत्वांवर काम करून जरी तुम्ही स्वतःला परफेक्ट बनवलं तरी यशस्वी होण्यासाठी न थांबता अविरत कष्ट करणे खूप महत्त्वाचे असते. प्रत्येक यशस्वी व्यक्ती तहानभूक हरपून फक्त त्याच्या ध्येयाच्या दिशेने धावत असतो जसजशा यशाच्या पायऱ्या चढत जाईल तसतशी त्याची भूक पूर्ण होत जाईल. त्यामध्ये एक साधा फॉर्म्युला लक्षात ठेवा, जे काम करत असताना तुम्हाला कंटाळा येतो बोर होतं त्या क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. त्यामुळे असे एखादे क्षेत्र शोधून काढा ज्यामध्ये तुम्ही मनापासून काम करू शकतात न थकता न वैतागता 100% देऊ शकता.

7) G = Gratitude : जीवनात सर्वकाही मिळल आहे. प्रत्येक स्वप्न पूर्ण झाले आहे. जेव्हा काही लोक या स्टेजला पोहोचतात तेव्हा त्यांना घमेंडी येते इतर लोकांना ते उपहासाने पाहत असतात. त्यांच्यामध्ये मीपणा निर्माण झालेला असतो. ही खूप मोठी धोक्याची सूचना असते कारण माणूस जेवढा उंचीवर चढून शकतो त्याच्या कितीतरी पटीने फास्ट तो खाली पडू शकतो.

त्यामुळे नेहमी आदराने सन्मानाने कृतज्ञ पणाने राहण्याचा प्रयत्न करा. त्या प्रत्येक व्यक्तीचे आभार माना ज्यांनी तुम्हाला सपोर्ट केला. मग तो सपोर्ट करणारा छोटा असेल किंवा मोठा. करोडो रुपये देणाऱ्या व्यक्ती पासून एक कप चहा देणारे व्यक्तीपर्यंत प्रत्येकाचे आभार माना. कारण त्या प्रत्येकाचे तुमच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असते.

तो ड्रायव्हर गाडी चालवतो म्हणून तुम्ही सुरक्षित पणे हवं त्या ठिकाणी पोहोचू शकता. तुमची आई पत्नी प्रेमाने आपुलकीने जेवण बनवते त्यामुळे तुम्ही हेल्दी बनता. तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रेमाची वागणूक द्या. नेहमी तुमचे पाय जमिनीवर राहतील याची काळजी घ्या जर मनापासून खरच तुम्ही हे सात नियम फॉलो केले तर मला खात्री आहे तुमच्या सारख्या प्रतिष्ठित यशस्वी अर्थपूर्ण जीवन जगणारा व्यक्ती समाजात इतर कोणीही नसेल तुमचे स्वप्न पूर्ण होतील कोणीही तुम्हाला अपमानित करण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाही.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.