पालकत्वाचे ३ नियम ।। आई वडिलांनी आपल्या लहान व तरुण वयातील मुलांच्या भावनांना कसे समजून घ्यावे ? याबद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या या लेखातून !

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आज आपण पालकत्वातील सकारतमक्ता ह्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. प्रत्येकाला वाटतं की आपल मूल हे सगळ्यात चांगल असावं. प्रत्येक क्षेत्रात त्याने सर्वोत्तम कामगिरी करावी. संपूर्ण जगात त्याच नावलौकिक व्हावं. प्रत्येकाने त्याच कौतुक करावं. पण खरच अस होत का? तर नाही आपण हेही विसरून चालणार नाही की मुल भे आईवडिलांचं प्रतिबिंब आहे.

त्यामुळे मुलांनवर काम करण्यापूर्वी आपण स्वतः वर काम करन खूप गरजेचे आहे. आपल्यामध्ये जे अवगुण आहेत तेही ओळखन तितकंच महत्वाचं आहे. जसजसे आपण आपल्या वर्तनामध्ये परिवर्तन आणत चालू तसतसे आपल्या मुलांचे व्यक्तिमत्त्व हे आपोआपच विकसित व्हायला सुरुवात होते. एक गोष्ट पाहुयात आपण, एका लिलावात 1 गिटार ही विकायला ठेवलेली असते सुरवातीला त्याची किंमत 1डॉलर, ठेवण्यात आली होती.

एवढी कमी किंमत असून सुद्धा कोणीही तिला घेण्यासाठी तयार नव्हते. त्या कमिटी मध्ये एका मुलाला गिटार मधल थोडंसं नॉलेज होत त्याने ती गिटार थोडीशी ट्यून केली आणि थोडावेळ ती वाजवून देखील दाखवली. आजूबाजूच्या लोकांनी त्याला चांगली दाद दिली, त्याचं कौतुक केलं. पुन्हा ती गिटार जेव्हा विक्री साठी ठेवण्यात आली तेव्हा मात्र तिची किंमत 2डॉलर, नंतर 10डॉलर, 100 डॉलर, 200 डॉलर,

आणि शेवटी 500 डॉलर, मध्ये ती गिटार विकण्यात आली. खर म्हणजे गिटार तीच पण ह्या वेळेला ती ट्यून करून ठेवण्यात आलेली होती. असेच हे ट्यूनिंग टेकनिक आता आपल्याला शिकायचे आहे. यासाठी जर आपल्या पालकत्वा मध्ये जर आपण थोडी सकारात्मकता आणली तर आपल्या मुलाचं भवितव्य आपण नक्कीच उज्ज्वल करू शकतो.

आज आपण 3 सुत्रांवर माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपल्या मुलांसमोर एक आदर्श प्रस्थापित करा : मूल हे अंतरात्मक खूप काही गोष्टी शिकत असते. आपल्या आजूबाजूला ते ज्या काही गोष्टी बघतं त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत. आणि सर्वात जास्त ते आपल्या आईवडिलांना कॉपी करत.

कारण आईवडील त्याच्यासाठी एक प्रेरणास्रोत आहे. जास्तीतजास्त गोष्टी ते त्यांच्याकडून शिकत असतं. त्यामुळे आपणही आपल्या मुलांपुढे वावरताना, बोलताना एक सयंम ठेवला पाहिजे. आपल्या वर्तूनुकीवरती आपल्याला ह्या दृष्टीने काम करणे गरजेचे आहे. आपल्या मुलांपुढे आपली प्रतिमा एक आदर्श आणि आदरयुक्त अशी बनली पाहिजे यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू शकता.

दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे, आपल मुल जसं आहे तसं त्याचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करा : खरं म्हणजे प्रत्येक मुलात काहीना काही हे सुप्त गुण असतात, काही स्ट्रॉंग ताकद असते. पण आपल्याला तीच ओळखता आली पाहिजे. ज्या गोष्टीवर आपण फोकस करू तीच गोष्ट जर एक्सपानड होणार असेल तर आपल्याला आपल्या मुलांमधील सगुण शोधता आले पाहिजेत. आणि त्याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करून ते विकसित करता आले पाहिजेत.

आपल्या मुलामध्ये काही दोष ही असतील कारण ह्या जगात कोणीही परफेक्ट नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या मुलांना त्या गुण आणि दोष यांसकट स्वीकारता आले पाहिजे. ज्या गोष्टीला आपल्याला अधिक प्रभावित करायच आहे आपल्याला त्यावर काम करायचं आहे ती गोष्ट पहिले स्वीकारनं सगळ्यात महत्वाचं आहे.

आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मुलांची तुलना इतर कोणत्याही मुलासोबत करू नका. कारण ते स्वतः एक व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे होतं काय तर ते मूल स्वपरीचय आणि स्वतः मधील योग्यता जी आहे ते हळू हळू विसरायला लागत. आणि आपल्या आईवडिलांना खुश करण्यासाठी ते ढोंगी पणाने वागायला लागत. खर तर यामध्ये आपल्या मुलांचं जास्त नुकसान होत.

तीसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेम : आपल्या मुलांना भरभरून प्रेम द्या. खूप जणांमध्ये आपण अस पाहिलं आहे की आपल्या मुलांची प्रत्येक मागणी प्रत्येक डिमांड पूर्ण करन म्हणजे प्रेम. आपल्या मुलांनी मागताक्षणी एखादी वस्तू त्याच्यापुढे प्रकट करणं म्हणजे प्रेम. हि सामान्य व्याख्या आजकालच्या पालकांमध्ये दिसून येते. खर म्हणजे भौतिक गरजामधून, भौतिक वस्तूंमधून असा किती आनंद मिळतो? तर खूपच कमी. कारण हे खूप क्षणभंगुर असत.

काही लोकांचं मात्र अगदी ह्याच्या विरुद्ध विचार आहेत. ते म्हणजे प्रेमाने मुल बिघडतील. म्हणजे काय योग्य हेच कळत नाही. पण मनुष्य हा प्रेमाचा भुकेला असतो प्रत्येकाला प्रेम हवं आहे. मग हेच प्रेम जेव्हा आपण स्पर्शातून, मिठीतुन आणि चांगल्या बोलण्यातून व्यक्त करू तर हे प्रेम नक्कीच प्रत्येकाच्या हृदयात एक खोलवर जागा निर्माण करेल. एकदा एका मुलाला सहज विचारलं की तुला तुझ्या आईवडिलां कडून काय अपेक्षा आहे?

तर तो सांगू लागला की मी बऱ्याच महिन्यांपासून माझ्या वडिलांशी बोललो नाही आणि ते इतके कडक आहे अतिशय शिस्तबध्द आहे की ते जेव्हा आमच्या घरात येतात आमच्या घरातलं वातावरण खूप शांत होत. एकदम कर्फ्यु लागल्यासारखं. आणि कोणीच त्यांच्यासोबत मोकळ्या मनाने बोलू शकत नाही. तर त्याला एक उपाय सांगितला की तू तुझ्या भावना एका पत्राद्वारे का नाही त्यांना कळवत.

आणि एक दिवस हिंमत करून त्या मुलाने आपल्या वडिलांना पत्र लिहिलं आणि आपल्या सर्व भावना त्यामध्ये त्याने उतरवल्या. आणि एकदाच अस संध्याकाळी त्या मुलाने त्यांच्या वडिलांच्या हातात ते पत्र दिल आणि तिथून तो जिम साठी पळून गेला. जेव्हा तो परत आला त्यावेळी त्याच्या वडिलांनी ते पत्र वाचलेलं होत.

आणि तो मुलगा घरात आल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला घट्ट मिठी मारली. आणि शिस्तीच्या नावाखाली ते जे काही चुकीचं वर्तन करत होते ते त्यांनी कबूल केलं. आज त्या दोघांचे संबंध एकमेकांसोबत अतिशय उत्कृष्ट आहे. किती शुल्लक अपेक्षा होती त्या मुलाची पण तेच ओळखण्यासाठी ते आईवडील जे आहेत ते कमी पडत होते. आपण देखील आपल्या मुलांच्या काय अपेक्षा आहेत या नक्की ओळखा. आणि त्या दृष्टीने स्वतः मध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.