ऑनलाइन ॲप्लिकेशन करून घरगुती किंवा कमर्शियल मीटर कसा घ्यायचा? ।। त्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात? ।। महत्वाची माहिती जाणून घ्या या लेखातून !

Uncategorized

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

ऑनलाइन ॲप्लिकेशन करून घरगुती किंवा कमर्शियल मीटर कसा घ्यायचा? त्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात? कोणाच्या नावावर घ्यायचा, A-1 फॉर्म कसा भरायचा आहे? A-1फॉर्म म्हणजे नक्की काय हे सगळ्या गोष्टी या आपण पाहणार आहोत. समजा जर आपल्याला एक मीटर घ्यायचा असेल तर आपण एमएसईबी मध्ये जातो. मग आपल्याला वायरमन किंवा एखादा कॉन्ट्रॅक्टर भेटतो तो म्हणतो की इतके इतके पैसे द्या आणि तुम्हाला मीटर भेटून जाईल.

तर तुम्ही तसं न करता स्वतःहून एकदम कमीत कमी पैशात मीटर कसा घ्यायचा, तो कसा बसवायचा, त्याला काय काय माहिती लागते ही सगळी माहिती आपण घेवुयात. जेणेकरून तुम्ही या क्षेत्रातली पूर्ण माहिती समजून घेवू शकता. आणि तीन ते चार दिवसांतच मीटर बसू शकतात. तर सर्वात आधी (mahadiscom.in) या वेबसाईट वर लॉग इन करा. आणि इथे तुम्हाला “कंजूमर पोर्टल” यावरती क्लिक करायचं आहे. त्यांनतर एक स्लाईड स्क्रीन वर ओपन होईल.

त्यांनतर तुम्हाला “ॲपलाय फॉर न्यू कनेक्शन” ह्या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. आणि तुमच्या समोर A-1 ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला असेल. आता हा फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला तीन गोष्टी माहिती पाहिजेत. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या मीटरचा लोड किती घ्यायचा आहे, म्हणजे भार किती स्यानशन करून घ्यायचा आहे. आणि दुसर म्हणजे की समजा तुमचे घर हे नवीनच बांधण्यात आले आहे तर ठीक आहे.

किंवा त्या प्लॉट वर आधीपासून मीटर होता का आणि तो मीटर असेल तर त्याची काही थकबाकी राहिली आहे का? हे माहिती करण्यासाठी तुम्ही जवळच्या मसेब एमइएससिबी ऑफिसला जायचं आहे. तिथे असिस्टंट इंजिनिअर किंवा जुनियर इंजिनिअर यांना भेटून तुमचा ॲड्रेस द्यायचा आणि त्यांच्याकडून थकबाकी चेक करायची. आणि मगच आपल्याला पुढे ॲपलाय करायचे आहे.

EESL Tenders for Supply of 2.35 Million Smart Electricity Meters in India

नाही तर ते मग प्रोसेसमध्ये असताना जर का थकबाकी निघाली तर त्यामुळे आपला मीटर येण्यात उशीर(delay) होऊ शकतो. तिसरा मुद्दा म्हणजे ज्याच्या नावावर घर किंवा प्लॉट आहे, त्याच्याच नावावर मीटर आपल्याला घेता येतो. तर या तीन गोष्टी झाल्या, की मग आपल्याला मीटरची कॅटेगरी निवडायची आहे. की तो “नॉन इंडस्ट्रिअल” आहे का म्हणजे घराला घ्यायचा आहे की ऑफिसला घ्यायचा आहे तर तो नॉन इंडस्ट्रिअल आहे आणि “इंडस्ट्रिअल” म्हणजे फॅक्टरी किंवा एग्रीकल्चर आले तर इंडस्ट्रिअल मधे येईल. त्यांनतर “कंजूमर कॅटेगरी” ऑप्शन आहे त्यामध्ये “LT-Supply” हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे.

त्यांनतर “सप्लाय टॅक्ट” हा ऑप्शन आहे त्यामध्ये 2 ऑप्शन आहे, 1. सिंगल-सिंगल फेज. 2. थ्री-थ्री फेज. याचा अर्थ म्हणजे तुमच्या घरात लिफ्ट नसेल किंवा स्वतःचा बंगलो असेल किंवा स्वतः भाड्याने देण्यासाठी घेत असाल आणि लिफ्ट नसेल तर “सिंगल-सिंगल फेज” हा ऑप्शन निवडायचा. जर का लिफ्ट असेल तर “थ्री-थ्री फेज” हा ऑप्शन निवडायचा. त्यांनतर “सर्विस रिक्वेस्ट” ऑप्शन आहे त्यातील “परमनंट” या ऑप्शन वर क्लिक करायच. ॲप्लिकेशन दिनांक तर येईलच. त्यांनतर तुमचं जे काही असेल फर्स्ट नेम ते सिलेक्ट करायच. उदरणार्थं (Miss/smt/shri/mrs/etc.) आणि तुमचे नाव तिथे टाईप करायच आहे.

त्यांनतर तुमच मिडल नेम आणि आडनाव टाकायचे आहे. त्यांनतर तुमच “ऑक्कुपेशन” टाकायचे आहे, (तुम्ही काय काम करता ते टाकायचे आहे.) त्यांनतर तुम्ही तुमची “कास्ट” सिलेक्ट करायचे आहे. रिझर्वेशन साठी काही सवलती किंवा फायदे असतील. त्यांनतर तुम्ही तुमचे (gender) लिंग सिलेक्ट करायचे आहे. त्यांनतर “निअरेस्ट कंजूमर नंबर” असा एक ऑप्शन आहे. त्याचा अर्थ तुमच्या घराभोवती किंवा ऑफिस भोवती जे काही ऑफिस किंवा घरे असतील त्यांच्या मीटर बिलवरील ग्राहक क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि नंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे.

Single and Three Phase Energy Meter - HPL Power of Technology

त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. ज्याच्यावर तुम्हाला अपडेशन तुम्हाला पाहिजे असतील, की तुमचं बिल इतकं आलेलं आहे किंवा तुम्ही इतके बिल भरले आहेत. त्यानंतर ईमेल आयडी टाकायचा आहे. आणि आधार नंबर टाकायचं किंवा नाही हे ऑप्शनल आहे. त्यानंतर तुम्ही जो ॲड्रेस दिलेला आहे त्याच ॲड्रेसवर मीटर आहे, आणि त्याच ॲड्रेस वर बिल पाहिजे असतील तर, तिथे “क्लिक हिअर टु बिलिंग ॲड्रेस सेम ॲज गिविंग ॲड्रेस.” हा एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायच आहे.

तुम्ही जो ॲड्रेस दिलेला आहे तो तिथे कॉपी होतो. त्यांनतर “टाईप ऑफ प्रिमायसेस” या ऑप्शन मध्ये जर तुमची स्वतःची जागा असेल तर “owner” हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्याच बरोबर जर भाड्याने घेतले असेल तर “rented” ऑप्शन सिलेक्ट करा. त्यांनतर जर का तुम्ही जागा भाड्याने दिली असेल किंवा आणखी काही असेल तर “lease किंवा LIS-other” ह्या पैकी ऑप्शन निवडायचे आहेत. जर तुम्ही ती जागा स्वतः ची म्हणत असल तर त्या जागेच्या ७/१२ वर तुमचे नाव पाहिजे.

जागा जर भाड्याने घेतली असेल तर रेंट लागेल. त्यानुसार वरील सांगितल्या 4 ऑप्शन पैकी तुम्ही 1ऑप्शन निवडायचा आहे. त्यांनतर सुरुवातीला फॉर्म भरताना आपल्याला “कंझ्युमर कॅटेगरी” हा ऑप्शन आलेला होता. त्यांनतर इथे “कंझ्युमर सब कॅटेगरी” हा ऑप्शन आहे यामध्ये तुम्हाला खात्री पूर्वक सांगायचे आहे की नक्की कशासाठी तुम्हाला मीटर लागत आहे. जसं की ऑफिस साठी लागत आहे, किंवा रेसिडेंशियल आहे का, असे भरपूर ऑप्शन त्यामध्ये आहे तर त्यापैकी तुम्हाला एक ऑप्शन निवडायचा आहे. त्यांनतर “रिक्वेस्टेड लोड” यामध्ये तुम्हाला लोड किती मंजुर करून घ्यायचा आहे तो एक तर (kw किंवा HP) ह्या 2 ऑप्शन मध्ये आहे. ते तुम्हाला निवडायचा आहे.

फॉर्म भरते वेळी कन्फर्म करा की तुमचा लोडींग किती आहे कारण जर तुम्ही कमी लोड सांगितला आणि वापर जास्त होत असेल तर तुम्हाला बिल जास्त येत आणि पुढे पुन्हा प्रॉब्लेम येतात. आणि त्यांनतर “ॲग्ग्री टर्म अँड कंडिशन” यावर क्लिक करायच आहे. त्यांनतर तुमची “प्लेस” म्हणजे तुम्ही कुठून फॉर्म भरलाय ते सिलेक्ट करा. त्यांनतर कॅप्तचा(Captcha) कोड टाकायचा आहे. आणि सेव्ह ऑप्शन वर क्लिक करायच आहे. मग सेव्ह केल्यावर तुम्ही जर काही गोष्टी भरलेल्या नसतील तर ते स्क्रीन वर डिस्प्ले होईल. ते भरून घ्यायच व नंतर “ओके” बटण वर क्लिक करायच.

त्यांनतर तुम्हाला “प्रिंट” चा ऑप्शन येईल. तर आपला हा A-1 फॉर्म भरून झालेला आहे तर याची एक प्रिंट काढायची आहे. A-1 फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला “ट्रॅक स्टेटस अँड अपलोड डॉक्युमेंट.” यावर क्लिक करून “न्यू कनेक्शन” या ऑप्शन वर जायचं आहे. तिथे मग तुमचा ॲप्लिकेशन आयडी जनरेट होईल तो इथे टाकायचा आहे. आणि खाली तुम्हाला कॅप्तचा टाकून सबमिट करायचे आहे. तर हे झाल्यानंतर तुमचा A-1 फॉर्म. ओपन होईल न खाली तुम्हाला फि (शुल्क) किती भरायचे आहे ते येईल. यालाच एफक्यू किंवा सिक्युरिटी डिपॉजिट म्हणतात. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की सिक्युरिटी डिपॉजिट ऑनलाईन कधीही भरायचे नाही.

कारण जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन करता. हे ॲप्लिकेशन अजून कन्फर्म झालेलं नाहीये. याची फिजिबिलीटी चेक करायला साईट विजिट होत असते “जेईई” किंवा “एई” ची. त्यामुळे तिथे तुमच कदाचित ॲप्लिकेशन कॅन्सल देखील होवू शकत जर तुमच्या फॉर्म मध्ये काही चूक असेल तर. आणि सिक्युरिटी डिपॉजिट ऑनलाईन नेहमी जास्त दाखवलेलं असत. मात्र प्रत्यक्षात कमी असत कारण त्यातून सुपरव्हिजन चार्जेस वजा होतात. म्हणून तुम्ही ऑनलाईन कधीही सिक्युरिटी डिपॉजिट भरू नका.

तर आता तुम्हाला A-1 फॉर्म, तुमचे आयडेंटिटी कार्ड, तुमचा ७/१२, किंवा कर पावती, त्यांनतर जर का तुम्ही एका कॉन्ट्रॅक्टरला तुमच्या मीटरचे काम देत असाल तर लक्षात ठेवा नेहमी त्या कॉन्ट्रॅक्टर कडून स्टॅम्प पेपरवर अँडरटेकींग 1.3 च्या फॉरमॅटमध्ये भरून घ्यावी. म्हणजे त्यात असतं की काय तर तो कॉन्ट्रॅक्टर जेवढे काम आहे तुमच्या मीटरच ते एमएसइडीसील नुसारच करणार. म्हणजे तुमची फसवणुक होण्याची शक्यता तिथे खूप कमी होती.

तेव्हा कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं नसेल तर हे तीन डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला जवळच्या एमएससिबी ऑफिसला जायचे आहे. तिथे तुमचे डॉक्युमेंट इन्वर्ट करायचे आणि सांगायचे की तुम्हाला नवीन मीटर घ्यायचा आहे. त्यासाठी साईट विजिट कंडक्ट करा. आणि मग हे एक ते दोन दिवसात तुमची साईट विजिट आणि फिजिबिलिटी पूर्ण होईल. तुम्हाला कोटेशन् देखील भेटेल. आणि पुढच्या दोन दिवसात अवेलेबिलिटी वर तुम्हाला तुमच्या घरी येऊन वायरमेन तुम्हाला मीटर बसवून देईल. तर ही सर्व अशी प्रोसेस आहे नवीन मीटर कनेक्शन घेण्यासाठी.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.