मुलांना शिस्त लावायची आहे, वापरा या सोप्या टिप्स

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

मुलांना शिस्त लावणं किंवा वळण लावणं अनेक घरांमध्ये कळीचा मुद्दा असतो. मुलांची गरज पुर्ण करताना अनेकदा अवास्तव हट्टही पुर्ण केले जातात. अशावेळी मुलांना आपल्या सगळ्या मागण्या पुर्ण करण्याचा एकच मार्ग दिसतो तो म्हणजे हट्ट करणे. अशावेळी मुलं रडून, आरडा ओरडा करुन मागणी पुर्ण करतात.

पण या सगळ्यामध्ये पालकांना मात्र अनेकदा मनस्ताप सहन करावा लागतो. एकीकडे मुलांच्या गरजा तर दुसरीकडे मुलं हट्टी होण्याची भिती या दुहेरी कात्रीत पालक सापडलेले असतात. अशा वेळी मुलांना जास्त हायपर न करता त्यांना समजवावं कसं हे आम्ही तुम्हाला सांगतो आहे.

मुलांना सगळ्यात आधी नकार पचवण्याची सवय लागणं गरजेचं आहे. अनेकदा मुलं नाही हा शब्द ऐकून हिरमुसतात. प्रसंगी हट्ट करु लागतात. अशा वेळी मुलांना उत्तर देण्याऐवजी अत्यंत शांतपणे हट्ट करण्याचे तोटे समजावून सांगावे.

अनेकदा मुलं एखादी गोष्ट इच्छा नसतानाही केवळ मित्र-मैत्रिणी किंवा इतरांच्या अनुकरणाने करु लागतात. अशावेळी मुलांना नक्की त्यांची इच्छा काय आहे हे ओळखण्यास शिकवावं. अनेकदा केवळ अनुकरण करण्यासाठी हट्ट केला जातो. अशा वेळी सौम्य भाषेत मुलांना चुकिचं किंवा बरोबर हे समजावून सांगावं.

मुलांना अमुक एक गोष्ट करणं चुकिचं आहे हेच सांगा. अनेकदा एखादी कृती चुकिची आहे याची कल्पना नसते. एखादी कृती करताना त्यातून वाईट संदेश कशाप्रकारे दिला जातो याची कल्पना मुलांना देणं गरजेचं आहे.

अनेकदा मुलं चुका करतात. पण त्या चुकांची जाणीव झाल्यावर या चुकांचं खापर ते इतरांवर फोडतात. अशा वेळी मुलांना त्यांच्या चुकांची जबाबदारी त्यांनीच घेणं कसं योग्य आहे हे समजावून सांगावं. कारण अशावेळी जर स्वत:च्या चुकांची जबाबदारी घेण्याची सवय मुलांना लहानपणापासूनच लावणं गरजेचं आहे.

13 Ways to Raise a Caring and Compassionate Child | Scholastic | Parents

अनेकदा मुलांना परिस्थिती स्वत:च्या इच्छेनुसार हवी असते. असं झालं नाही तर ते नाराज होतात. निराश होतात. अशा वेळी अनेकदा परिस्थिती प्रतिकुल असतानाही शांत कसं राहावं हे मात्र मुलांना समजावून सांगावं.

दयाळू असणं, मदत करणं या मुल्यांची मुलांना ओळख करुन द्या. यामुळ मुलं संवेदनशील बनतील. कोणती कृती चुक आणि कोणती बरोबर याची ओळख करण्यास सहज सक्षम होती. अनेकदा मुलांना शेअरिंग शिकवणंही तितकंच गरजेच असतं. विशेषत: एकच मुल असलेल्या घरात मुलांना शेअरिंग करायला शिकवल्याने हट्टी होण्याचं प्रमाण बरंच कमी होतं.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.