शून्यातून विश्व निर्माण करणारा माणूस म्हणून ओळखले जाणारे शरद तांदळे यांचा जन्म बीड जिल्ह्यात झाला, तिथेच शिक्षण देखील झालं, त्यानंतर इतर मुलांप्रमाणे आपणही इंजिनीअर किंवा डॉक्टर व्हावं म्हणून त्यांनी CET ची परीक्षा दिली. मात्र त्यात जास्त काही चांगले गुण मिळाले नाहीत त्यामुळे मेडिकल ला प्रवेश मिळाला नाही, म्हणून मग इंजिनीअरिंग करायचं ठरवलं,मेकॅनिकल ला जास्त मागणी आहे असं सगळे सांगत होते.
त्यामुळे शरद यांनी मेकॅनिकल इंजिनीरिंग ला गव्हर्नमेंट कॉलेज ला प्रवेश घेतला. इंजिनीअरिंग ला प्रवेश होई पर्यंत इंजिनीअरिंग काय असत, कस असत, कोणत्या शाखा असतात याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. गव्हर्नमेंट कॉलेज ला प्रवेश मिळाला असल्यामुळे घरचे खूप खुश होते, कॉलेज मधला जास्तीत जास्त वेळ त्यांनी समाज कार्यात घालवला, मात्र शरद यांना इंजिनीअरिंग चे विषय अवघड जात होते, कसबस पास होईल एवढे गुण मिळवून त्यांनी इंजिनीअरिंग ची पदवी घेतली.
अर्थातच कोणत्याही कंपनी मध्ये निवड झाली नाही. त्यामुळे नोकरी ची शोधाशोध सुरू झाली. पुण्याला येऊन त्यांनी शोधाशोध चालू केली, बरेच महिने फिरल्यावर योगी इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीत ५००० रुपये पगाराची नोकरी मिळाली, पण हातात मात्र ३५०० रुपये च येत होते. त्यामुळे इंजिनीअरिंग करून आपण काय करत आहोत असा प्रश्न त्यांना पडला, व त्यांचंच मन त्यांना खाऊ लागलं, मित्रांना भेटून त्यांनी MBA करायचा विचार मांडला.
म्हणून MBA-CET चा फॉर्म भरला , व परीक्षा दिली, पण पुन्हा हवे तसे गुण काही मिळाले नाही, एका मित्राने त्यांना SAP चा कोर्स करायचा सल्ला दिला म्हणून शरद यांनी हैद्राबाद ला जाऊन SAP चा कोर्स केला. कोर्स पूर्ण करून ते पुण्यात आले व परत नोकरी च्या शोधात लागले, पण कंपनी वाले त्यांना 2-3 वर्षाचा अनुभव पाहिजे असं सांगत होते. अशातच एका कंपनी त त्यांना जॉब मिळाला पण आयुष्यभर हा कॉम्पुटर वर चा जॉब आपण करू शकणार नाही असं शरद यांना वाटत होतं.
म्हणून त्यांनी दोन तीन दिवसात च तोही जॉब सोडला. मधल्या काळात त्यांनी जे समाजकार्य केलं होतं त्यामुळे त्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं. शेवटी त्यांनी व्यवसाय करायचं ठरवलं, पण पुण्यात व्यवसाय सुरू करायचा म्हटलं म्हणजे बरेच पैसे लागणार होते, ते त्यांच्याकडे नव्हते. म्हणून त्यांनी वडिलांना फोन केला व पैशाची मागणी केली, परंतु वडीलांनी त्यांना नकार दिला व सांगितलं की जर तुला व्यवसाय करायचा असेल तर आधी नोकरी कर पैसे कमव आणि मग व्यवसाय कर. त्यामुळे हा ही मार्ग बंद झाला होता.
त्यांनी पुण्यातील बऱ्याचशा कंपनी मध्ये जाऊन जमिनीबदद्दल आणि इतर मशीन बद्दल चौकशी केली असता त्याला जवळपास दहा लाख रुपये खर्च येत होता. त्यासाठी बरेच कागदपत्रे लागणार होती. त्यांना पुन्हा एकदा मित्राला फोन केला त्या मित्राने त्यांना एका कामाबद्दल सांगितलं, दुसऱ्या दिवशी दोघेही साईट वर गेले, मित्राने शरद यांना काम दाखवलं, काम होत PICT कॉलेज आणी महानगरपालिका यांच्या मध्ये ठेवलेला ट्रान्सफॉर्मर हलवण्याचं हे की कोणीच करायला तयार नव्हत.
शरद यांनी दुसऱ्याच दिवशी क्रेन च्या साहायाने तो ट्रान्सफॉर्मर हलवला, त्यावेळी तिथे PWD, MSEB तसेच अनेक खात्यातील लोक आले होते, त्यामुळे शरद यांच्या कामाबद्दल बऱ्याच जणांना माहीत झालं,आणि त्यांना काम मिळू लागली, जी काम कोणीच करत नसत अशी काम शरद यांच्या कडे येऊ लागली, तेव्हा त्यांच्या अस लक्षात आलं की आपण स्वतः लायसन्स काढायला पाहिजे पण त्यासाठी बँकेत खात खोलावे लागणार होते, त्यांनी बँकेत खाते काढले, आवश्यक ती कागद बनवली.
लायसन्स काढण्यासाठी बँक सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र लागणार होते त्यासाठी बँकेत पैसे असणे गरजेचे होते, ते पैसे घरुन तर काही मिळणार नाही, शरद यांच्या कडे कोणतीही प्रॉपर्टी नव्हती. मग त्यांनी एका कॉन्ट्रॅक्टर कडून दहा लाख घेतले, आणि बँकेत FD केली आणि मग त्यांना पुढची प्रोसेस करता आली. लायसन्स मिळालं, नंतर FD मोडून त्या कॉन्ट्रॅक्टर चे पैसे परत केले. शरद सांगतात की हे अनुभव आयुष्यात खूप कामी येतात, कधीही स्वतः च ध्येय विसरू नका मग ते ठरवलेले असेल किंवा न ठरवलेल.
हळू हळू त्यांना बरीच काम मिळू लागली आणि त्यांचा व्यवसाय वाढला, नियमावली कळली. काही दिवसांनी त्यांना परत पैशाची गरज भासली, नवीन काम मिळालं होतं त्यासाठी त्यांना काही पैसे लागणार होते. शरद यांनी घरी फोन केला आणि वडिलांना पैसे मागितले वडिलांनी पुन्हा नकार दिला पण यावेळी दुसऱ्या दिवशी ते स्वतः आले आणि शरद यांना भेटले आणि एक प्रश्न विचारला, फुलपाखरू कस बनत? शरद यांनी सांगितलं एका कोषातून तयार होत ,मग त्यांनी विचारलं जर आपण कोष स्वतः तोडला तर काय होत, शरद म्हणाले त्यातून अळी बाहेर येते.
त्यावर त्यांचे वडील म्हणाले, बरोबर. जर आपण कोष तोडला तर त्यातून अळी बाहेर पडते पण जेव्हा ती अळी कोष फोडून बाहेर येते तेव्हा तीच फुलपाखरू झालेलं असत,आता तू ठरव तुला अळी व्हायचं आहे की फुलपाखरू. वडिलांच्या या वाक्याने शरद यांना नवीन शिकवण मिळाली. त्यांच्या मनातील ध्येय आणखीनच दृढ झाली. शरद यांनी पुन्हा प्रयत्न केले, बँकेत गेले त्यांना प्रोजेक्ट दाखवले, बँक ऑफ बडोदा मध्ये गेले, त्यावेळी BYST या संस्थेने त्यांना त्यांचे प्रपोसल बँकेत मांडण्यास मदत केली आणि त्यांना दहा लाख रुपये कर्ज मिळालं.
शरद सांगतात की त्यांनी एकही कर चुकवला नाही, जेव्हा त्यांना पुरस्कारासाठी मानकरी घोषित केले, तेव्हा त्यांची सगळी कंपनी चे कागद तपासले गेले त्यामध्ये सगळे कागद अगदी अचूक होते, तेव्हा कागद तपासणारे श्रीनिवासन सर देखील खुश झाले. या पुरस्काराचे वितरण लंडन ला होणार होते. ते शरद यांना म्हणाले तुझा गुरू कोण आहे? शरद यांनी सांगितलं मला भेटणारा प्रत्येक माणूस माझा गुरु आहे, माझे कामगार,ऑफिस मधील शिपाई, माझे मित्र, माझे वडील हे सगळे माझे गुरुच आहेत.
त्यांनी विचारलं तुझं सगळ्यात मोठं यश कोणतं? शरद यांनी सांगितलं माझे कर्मचारी माझे मित्र हेच माझे यश आहेत. मी त्यांच्या मनात माझ्याबद्दल विश्वास निर्माण करू शकलो हेच माझं सगळ्यात मोठं यश आहे. जेव्हा पुरस्कारासाठी त्यांच फोटो काढायचे होते, यांच्याकडे वेळ नव्हता, सगळे त्यांना म्हणत होते तुझ्याकडे फोटो साठी वेळ नाही, तेव्हा शरद यांनी त्यांना हेच सांगितले, या कामांमुळे मला आज पुरस्कार मिळाला आहे त्याच कामाकडे मी दुर्लक्ष करून कस चालेल, एकवेळ पुरस्कार नाही भेटला तर चालेल पण कामाकडे दुर्लक्ष होता कामा नये. त्यानंतर ते लंडन ला गेले तिथे सर्वप्रथम या Accenture च्या CEO नि त्यांना जेवायला बोलावलं.
दुसऱ्या दिवशी बीबीसी वर्ल्ड च्या मुख्य ऑफिस ला गेले तिथे जेव्हा एक एडिटर ला ते भेटले तेव्हा त्यांच्या अस लक्षात आलं की पैशाला काहीच महत्त्व नाहीये, तुम्ही केलेल्या कामाला किती लोक ओळखतात ते जास्त महत्वाचे आहे. लोकांसाठी तुम्ही काय करताय, त्याचा लोक कीती फायदा करून घेतात हे जास्त महत्वाचे आहे. नंतर कॉमन वेल्थ च्या ऑफिस ला जेवायला बोलावलं गेलं तिथे बरेच मोठे लोक भेटले. त्यामध्ये गव्हर्नर देखील होते.
संध्याकाळी ते बाहेर फिरायला गेले, त्यांच्यासोबत श्रीनिवासन सर होते, ते एके ठिकाणी थुकले, लगेच तेथील एका स्त्री त्यांना रागावल आणि जाब विचारला, शरद सांगतात त्या स्त्री कडून मला आपल्या देशावर कस प्रेम कराव ते कळलं. तुम्ही स्वतः किती स्वातंत्र्य उपभोगल पाहिजे आणि देशावर किती प्रेम केलं पाहिजे या दोन गोष्टींची त्यांना जाणीव झाली. शेवटच्या दिवशी ते सेंट जेम्स महालात गेले, तिथे भारतातील अनेक चित्र होती, महाल अतिशय सुंदर होता. काहीवेळातच प्रिन्स चार्ल्स तिथे आले, त्यांच्या भाषणात त्यांनी शरद यांचं नाव घेतलं, ते ऐकून शरद यांना खूप आनंद झाला.
एवढंच नाही तर प्रिन्स चार्ल्स जेव्हा स्टेज वरून खाली आले तेव्हा त्यांनी शरद यांची विचारपूस केली आणि खाली झुकून त्यांच्याशी हँडशेक केला. शरद सांगतात नम्रता कशी असवी हे या माणसाकडून मी शिकलो. पुढचा व्यक्ती किती लहान असाल किंवा मोठा असला, तो कितीही वाईट किंवा चांगला असला , आपण कसे वागतो यावर त्यांचं वागणं ठरत. तुम्ही जर नेहमी पॉसिटीव्ह राहिलात तर सगळं जग तुम्हाला तसच दिसेल. मोठं व्हायचं असेल, जगावर साम्राज्य करायचं असेल तर तुम्हाला नम्रतेने राहणं जास्त गरजेचे आहे. शेवटच्या दिवशी पुरस्कार वितरण होणार होत, शरद यांना खात्री नव्हती की त्यांना पुरस्कार मिळेल की नाही, पण त्यांना पुरस्कार मिळाला, कधी नव्हे इतके त्यांचे फोटो काढण्यात आले, बरेच मोठ्या लोकांनी अभिनंदन केल.
भारतात परत आल्यावर त्यांचं उद्दिष्ट च बदललं, आपल्याला खूप पैसे कमवायचे आहेत, मोठी गाडी घ्यायची आहे, मोठं घर घ्यायचं आहे हे सगळे स्वप्न बाजूला पडली, आणि समाजासाठी या देशासाठी आपल्याला काहीतरी करायच आहे हे त्यांनी ठरवलं. भारतातील तरुणांना ते सांगतात उद्योजक बना, या देशाला अशा अनेक उद्योजकांची गरज आहे जर आपल्याला अब्दुल कलाम यांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपल्याला हे करावं लागेल. आपल्या देशात उद्योजकांची खूप कमीआहे, आणि म्हणूनच आपल्याला चीन मधून येणाऱ्या वस्तू विकत घ्यावा लागतात.
जर आपण च स्वावलंबी झालो,आत्मनिर्भर झालो तर हे होणार नाही, आणि याचसाठी आपण सर्वांनी मिळून स्वतः यावर विचार करायला पाहिजे. तुमची जात,धर्म, परिस्थिती या सगळ्या गोष्टीचा न्यूनगंड मनात ठेवू नका. उद्योजक कुणीही होऊ शकत फक्त जिद्द पाहिजे,आत्मविश्वास पाहिजे. आपल्या देशात मदत करणारे खूप लोक आहेत, जर आपण एकत्र आलो तर नक्कीच या देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि जर देशाची प्रगती झाली तर पुढची पिढी देशाबाहेर जाणार नाही. आपलं ज्ञान आपल्या देशात राहील आणि आपण चीन ला पराभूत करून त्यांच्या पुढे जाऊ शकू.