मित्रांनो आपल्याला माहीत आहे आपल्याकडे नुकतेच तौक्ते चक्रीवादळ येऊन गेले आहे. आज आपण पाहणार आहोत कि सतत येणाऱ्या या वादळांना नावे कसे दिली जातात. तोक्ते सायक्लोनचा प्रवाह सर्वात आधी केरळला धडकलेला त्यानंतर गोवा आणि महाराष्ट्राचा जो पश्चिम भाग आहे म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि नंतर मुंबई, ठाणे नंतर पालघर या भागात चक्रीवादळ चा प्रवाह होता.
प्रश्न असा आहे कि चक्रिवादळ या पूर्वी हि येऊ गेले, निसर्ग नावाचं चक्रीवादळं त्याच्याही आधी येऊन गेले. मग हे चक्रीवादळ नेमकं निर्माण कशी होतात? आता आपण हे समजून घेणार आहे या येणाऱ्या चक्रिवादळांना नावे कशी दिली जातात? आणि सोबत या चक्रीवादळाला जगात वेगवेगळ्या ठिकाणी कोण कोणत्या नावाने संबोधले जाते. हे लक्षात असू द्या की भारतात दोन वेगवेगळ्या ठिकाणी चक्रीवादळांची निर्मिती होते.
एक तर बंगालचा उपसागर, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली चक्रीवादळं हे जनरली तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा, कोलकाता म्हणजे पश्चिम बंगाल या ठिकाणी धडकतात. आणि त्यामुळे या भागात बरेच नुकसान होते. अरबी समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळ आहे ते जनरली केरळ, नंतर कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या भागातील धडकतात आणि नंतर ती पाकिस्तान कडे जातात.
जगात वेगवेगळ्या ठिकाणी चक्रीवादळांची निर्मिती होते. आता हे चक्रीवादळची निर्मिती होते वेळी, आपल्याला हे समजलं पाहिजे, की नेमकं जगात वेगवेगळ्या ठिकाणी या चक्रीवादळ ला काय म्हणतात ?हिंदी महासागरामध्ये ज्या कुठल्या चक्रीवादळांची निर्मिती होते याला म्हणतात सायक्लोन. अटलांटिक महासागर किंवा पॅसिफिक पूर्व म्हणजे अमेरिका चा पुर्व भाग जो आहे, आणि खालचा जो भाग आहे.
अमेरिकेचा खालचा की जिथे मेक्सिको वगेरे आहे या भागात चक्रीवादळांची निर्मिती झाली तर त्याला म्हणतात हरिकेन (hurricanes). टायफून (Typhoon) म्हणजे साऊथ चायना सी किंवा मग पश्चिम पॅसिफिक म्हणजे जापान वगैरे किंवा फिलिप हा जो भाग आहे या भागात निर्माण होणार जे चक्रीवादळ आहे, त्याला टायफून (typhoon) असे म्हणतात. पश्चिम ऑस्ट्रेलिया, म्हणजेच हिंदी महासागर चा भाग.
फक्त हिंदी महासागराचा पूर्वेकडचा भाग जो आहे तिथे जर कुठली चक्रीवादळ निर्माण होणार असतील, तर त्यांना म्हणता विली-विल्स (willy-willies).आता येऊन गेलेल्या या चक्रीवादळाला तौक्ते हे नाव दिले गेले आहे, त्या अगोदर एक अंफा नाव दिले गेले त्या वेळी निसर्ग नावाचं जे चक्रीवादळ आलं होतं. तर हे चक्रीवादळ ला नाव दिले जातात.
हे नेमकं कोण देतं? २०२० साली, १६९ नावांची यादी भारतीय हवामानानं प्रदर्शित केली होती. या यादीतील नवे एक एक करून हिंदी महासागर, अरबी समुद्रात आणि बंगाल उपसागरात जे कुठले वादळ येतील, त्या वादळांना १६९ नावांपैकी एक एक करून हे नाव दिले जातील.
आता ही नावे ठरवले कोणी? तर सन २००० साली जागतिक मेट्रोलॉजी संस्था आणि आशिया आणि पॅसिफिकसाठी युनायटेड नेशन्सचे आर्थिक आणि सामाजिक आयोग (world metrology organization and United Nations economic and social commission for Asia and Pacific) या समुहा मध्ये, बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार,पाकिस्तान श्रीलंका आणि थायलंड. हे देश एकत्र आले.
आणि या समूहाने काय केले? तर स्वतः ची काही यादी तयार केली आणि सुरुवातीला या प्रत्येक देशाने आठ आठ नाव दिले होते. हे जवळपास आठ देश आहेत.तर आठी आठी चौसष्ट (८x८=६४). अशी चौसष्ट नाव होती. मात्र २०१८ साली काय झालं? की या समूहामध्ये इरान, कतर, सौदी अरेबिया नंतर युनायटेड अरब अभिराती आणि येमेन हे पाच एकत्र आले. म्हणजे आठ आणि पाच तेरा. या तेरा देश, यांनी प्रत्येकी तेरा.
म्हणजे तेरा गुनिला तेरा(१३x१३=१६९). १६९ नावांची यादी, सन २०२० मध्ये प्रदर्शित केली होती आपल्या भारतीय हवामान विभागात प्रत्येक देशाने तेरा नावांची यादी दिली होती. पुढं बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र मध्ये येणारे जे वादळ आहेत, या वादळांना या १६९ पैकी नाव दिले जातील. तसेच हि नावे एकदाच दिली जातील, म्हणजे पुन्हा पुन्हा तेच नाव दुसऱ्या वादळाला दिले जाणार नाही.
आता चक्रीवादळ ला नाव देणे का महत्वाचे आहे? ते तुम्हाला माहिती, लोकांच्या लक्षात राहिला पाहिजे. वैज्ञानिक किंवा समाज माध्यम किंवा आपत्ती व्यवस्थापन करणाऱ्या संस्था असतात त्यांना माहिती व्हावे, त्यांचा अभ्यास करून त्यांना जर काही नियमावली, रिसर्च तयार करायचं असेल तर मग कुठलं वादळ कधी आलं होतं?
त्याची निर्मिती कशी झाली? या सगळ्या गोष्टी लक्षात राहाव्यात म्हणून किंवा लोकांना जागरूकता पसरविण्यासाठी म्हणजे असं वादळ आलं होतं. त्याने काय काय झाले होते हे तुम्हाला माहिती होते. नंतर अंफा आलं होतं जे पश्चिम बंगाल मध्ये धडकले होते आणि वायू आलं होतं तर अशा पद्धतीने वेगवेगळे नावे दिली जातात.
या नावाने आपल्याला समजते की नेमकं कुठलं वादळ कधी आलं होतं? आणि त्या वादळात काय काय परिस्थिती किंवा त्याचं गांभीर्य लक्षात घेण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. हि जी चक्रीवादळ ची नावे हे तेरा देश यांनी प्रत्येकी तेरा तेरा नाव सुचविले त्याचा आकडा आहे १६९.
हि जी तेरा नाव सुचविले जातात या सुचवत्या वेळी कुठल्या बाबी लक्षात घेणे सक्त गरजेचे आहे? तर आपल्याला समजतं. एक तर त्याचे जे तेरा नाव असते, हे कुठल्याही राजकारण यांविषयी संबंधित असता कामा नये म्हणजे असं नको व्हायला, की या देशांनी हे नाव सुचविले, हे कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत किंवा मग कुठल्या राजकीय पक्षाचं नाव खराब होण्यासाठी हे नाव सुचविले गेले असे नको व्हायला.
त्यानंतर कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही असंही ते नाव असता कामा नये म्हणजे काही हिंदू लोकांच्या, मुस्लिम, शीख, ईसाई, पार्सी, अशा लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असं ते नाव असता कामा नये किंवा काही लोकांची जी संस्कृती असेल त्या संस्कृती वर दाग धबा म्हणा किंवा ती संस्कृती दुखावले असेल असं काही करता येणार नाही.
लिंग विशेष असं प्रकार चे नाव असता कामा नये म्हणजे असं म्हटलं जातं की सन २००० पुर्वी जनरली असेच नाव या वादळाला दिली जात होती. जी महिलांचा किंमत कमी करणारे होती किंवा लैंगिक नाव होते त्यामुळे मग समाजात किंवा लोकांमधे महिलांविषयीच्या दृष्टिकोन खराब होत होता, हि महत्वाची गोष्ट होती त्यामुळे काही महिला संघटनांनी आवाज उचलल्या मुळे अशी नावे देणे बंद झाले.
सन २००० पासून एक यादी तयार करण्यात आलेली आणि ती यादी लैंगिक असता कामा नये किंवा धार्मिक श्रद्धा दुखावतील, सांस्कृतिक श्रद्धा दुखावतील, किंवा राजकीय पक्षांची नावे त्याला देता कामा नये. नंतर दुसरं कारण काय? जगातील कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाही. हे लक्षात घेतले पाहिजे. कुठलं ही नाव आठ अक्षर, म्हणजे आठ अक्षर पेक्षा जास्त बनलेले असता कामा नये.
आता निसर्ग चक्रीवादळ, नंतर अंफा, नंतर वायू, नंतर आता सध्या काय आलं हे? तौक्ते. ते पण आठ अक्षर यांच्या वर ते नाव गेलं नाही. एकदा वापरलेलं नाव भविष्यात कधीच वापरले जाणार नाही. हे जी नावं दिली जातात ही यादी बनवली जाते. हे असे नाव असता कामा नये, की जी निसर्गाप्रती हिंसक नावे असतील.
मे २०२० साली भारतानं जी नावे सुचविली आहे तिचे नाव आपण बघू. एक आहे झोर, नंतर योम, नंतर आग, मुरासू, तेज, गती, प्रोबाहो, नीर, प्रभंजन, घुरनी, अम्बुड, जलधी, आणि वेगा. हे तेरा नाव भारत सरकारने सुचविले आहेत, त्या १६९ मधल्या यादी मध्ये आहे. उर्वरित जे प्रत्येक देशाने सुद्धा सुचविले असतील. तुम्हाला नाव कोण देतं? कुठली संस्था आहे? कधीपासून तयार झालं? भारत सरकारने काय नाव सुचविले? नाव सुचविण्यासाठी गाईड लाईन काय? हे सुद्धा आपण बघीतले.
आता आपण मागे ती जी चार पाच सायक्लोन आली होती. ते नेमके कुठल्या भागात आली होती आणि त्या भागांना नाव कुठल्या देशानं सुचविले हे पाहूया. निसर्ग हे वादळ हे नेमके कुठल्या समुद्रामध्ये आढळले किंवा निसर्ग म्हणून हे जे वादळ आलं होते याला नाव कोणी दिलं? आपल्याला माहिती असावे म्हणून आपण मागच्या पाच सहा चक्रीवादळा बाबत माहिती घेऊ.
निसर्ग वादळ, अरबी समुद्रात आलं होतं, कोकणात. तेव्हा नाव बांग्लादेश ने दिले होते. एक अंफा आलं होतं बंगालच्या सागरात आणि ते पश्चिम बंगाल मध्ये धडकले होते. अंफा नाव थायलंड ने दिले होते. एक आलं होतं क्यार चक्रीवादळ जे अरबी समुद्रात आलं होतं. तर क्यार हे नाव म्यानमार देशाने दिले होत. एक आलं होतं महा अरबी समुद्रात आलं होतं ते नाव ओमान ने दिलं होतं.
एक वायू चक्रीवादळ आलं होतं अरबी समुद्रात आलं होतं नाव दिलं होतं भारतानं. हे नाव भारत ने दिलं होतं. आणि हिक्का हे आलं होतं अरबी समुद्रात त्याचे नाव मालदीव ने दिले होते. एक फनी चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात आलं होतं याचे नाव बांगलादेश ने दिले होते. सध्या हे जे अरबी समुद्रात नाव तौक्ते चक्रीवादळ आहे त्याला म्यानमार ने नाव दिले आहे.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.