आज आपण सीएनजी चे फायदे आणि नुकसान जाणून घेणार आहोत तसेच शेवटी आपण पाहणार आहोत सीएनजी किट तुम्ही कुठून बसवून घेतले पाहिजे. आणि सीएनजी किट कशा पद्धतीचे असले पाहिजे. तर मग जाणून घेऊयात सीएनजी बद्दल. सुरुवात आपण CNG का बसवू नये यापासून करूयात. तर सीएनजी चे निगेटिव्हस खूप छोटे छोटे आहेत. पहिला पॉईंट म्हणजे सीएनजी किटची कॉस्ट: सीएनजी ही अशी एखादी गोष्ट नाहीये की जी दोन-तीन हजारांमध्ये पे करून बसवू शकता.
कमीत कमी तुम्हाला 40 ते 50 हजार रुपये खर्च करावे लागतात सीएनजी फिट करण्यासाठी. दुसरा निगेटिव्ह पॉईंट असा तुमचा गाडीचा बुट स्पेस पूर्ण सीएनजी किट मुळे भरून जातो. सीएनजी किट फिट केल्यामुळे तुमच्या गाडीचा बूट स्पेस राहतच नाही, अशा वेळी गाडीचा बुट चा काहीच उपयोग होत नाही. सीएनजी चा सिलेंडरच सगळी जागा व्यापून घेतो.ज्या गाड्या मोठ्या आहेत त्या गाड्यांचा थोडा बूट स्पेस राहतो.जसे की वॅगनार, अल्टो, स्विफ्ट, अशा गाड्यांचा बुट स्पेस राहतच नाही.
तीसरा निगेटिव्ह पॉईंट म्हणजे इंजिन चे वियर आणि टियर. सीएनजी पेट्रोल पेक्षा थोड जास्त प्रमाणात बर्न होतो. सीएनजी ला पेट घेण्यासाठी पेट्रोल पेक्षा थोडे ज्यास्त टेम्परेचर लागते. त्यामुळे इंजिन मध्ये वियर आणि टियर मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे तुम्हाला इंजिनचा मेंटेनन्स वारंवार करावा लागतो, तसेच इंजिन कडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावे लागते. तुम्ही सीएनजी गाडी घेतल्यानंतर आफ्टर मार्केट सीएनजी जर फिट करत असाल तर तुम्हाला इंजिन कडे फारच काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते.
जर तुम्ही ऑलरेडि कंपनी कडुन सीएनजी कार घेतली प्री फिटेड सीएनजी कार घेतली तर त्या केसमध्ये इंजिनचे वियर आणि टियर वर कंपनीने आधीच लक्षात घेऊन त्या पद्धतीचे इंजिन डेव्हलप केलेले असते. सीएनजी इंजिन मुळे इंजिन चे वियर आणि टियर ज्यात होत नाही त्यामुळे तुम्हाला इंजिन कडे जास्त लक्ष देण्याची गरज नसते. जर तुम्ही कार घेतल्या नंतर सीएनजी फिट करणार असाल तर तुम्हाला टाईम टू टाईम इंजिन चेक करावे लागते. इंजिन चे सिलिंग नीट आहेत का? इंजिन सिलिंग लिकेज तर होत नाही ना? अशा छोट्या-छोट्या गोष्टींकडे तुम्हाला वारंवार लक्ष द्यावे लागते.
जेव्हा केव्हा तुम्ही आफ्टर मार्केट सीएनजी फिट कराल त्यानंतर तुम्हाला ओईल फिल्टर आणि इंजिन ऑइल वारंवार चेक करावी लागते. कारण सीएनजी युनिट खराब हवेमध्ये खराब परफॉर्मन्स देते. गावाकडे शहरांपेक्षा धुळीचे प्रमाण जास्त असल्यामुळे येथे एअर फिल्टर वेळोवेळी बदलावा लागतो. सीएनजी चा चौथा निगेटिव्ह पॉईंट असा ऑइल जर जास्त टेम्परेचर वर चालले तर ऑइल ला नुकसान होते.
जर तुम्ही सीएनजी वर चालवत असाल तर असे रिकमेण्ड केले जाते की इंजिन ऑइल वेळेच्या आधीच बदलून टाकावे. त्यानंतर एक मेजर प्रॉब्लेम असा की जर तुम्ही गाडी घेतल्यानंतर आफ्टर मार्केट सीएनजी किट फिट केले, तर सीएनजी ची वॉरंटी लॉस होते. इंजिन वॉरंटी तुम्हाला भेटू शकत नाही. यूज्युअली लोक अशा गाडीमध्ये सीएनजी युज करतात की ज्या गाडीचे इंजिन स्मूथ आणि टेस्टेड आहे. जसे की मारुती वॅगनार, अल्टो, या गाड्यांचे इंजिन खूपच रिफाइन आहे.
आशा गाड्यांमध्ये वॉरंटीची जास्त अडचण येत नाही. त्यानंतर ऑइल आणि फिल्टर तुम्हाला इंजिन कूलर सारखे सारखे टॉप अप करावे लागतील. इंजिन कडे तुम्हाला वारंवार लक्ष द्यावे लागते. सिएनजी चा अजून एक निगेटिव्ह पॉईंट असा की सीएनजी छोट्या शहरांमध्ये अवेलेबल नाहीये सीएनजी स्टेशन मेट्रो सिटी मध्ये तर कॉमन झाले आहेत, पण बारीक सारीक खेडेगावात किंवा छोट्या छोट्या शहरात सीएनजी स्टेशन अवेलेबल नाही
येत तुम्हाला त्यासाठी ट्रॅव्हलिंग करावे लागते जास्तीत जास्त तुम्ही 14 किलो सीएनजी फिट करू शकता. सिएनजी फिट केल्यानंतर तुमची गाडी जेमतेम तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर पर्यंत जाऊ शकते. अलीकडे बऱ्यापैकी शहरांमध्ये हायवेवर सीएनजी अवेलेबल आहे, सिएनजी मुळे गाडीच्या पेरफॉर्मन्स वर बराचसा ड्रॉप होतो. बरेच लोक बोलतात सिएनजी मुले परफॉर्मन्स वर कोणताच परिणाम होत नाही पण असे नाही.
जर आपण रेग्युलर कार ड्राईव्ह करत नाही किंवा सीएनजी कार ड्राइव्ह करत नसाल तरी ही गोष्ट लगेच लक्षात येत नाही थोडा फार परफॉर्मन्स ड्रॉप होतो. आता पाहुयात पॉझिटिव पॉईंट्स बद्दल. सिएनजी चे पॉझिटिव्ह फारच मोठे आहे, सर्वात मोठा पोसिटीव्ह पॉईंट हा की सीएनजी मुळे खूप चांगले मायलेज भेटते. सीएनजी चे पेट्रोल सोबत तुलना केली तर सीएनजी चे मायलेज पेट्रोल पेक्षा जास्त आहे.
जर शहरात आपल्याला पेट्रोल ला 15 km एवढ्या एव्हरेज भेटत असेल तर सीएनजी चे मायलेज 21 ते 22 किलो मीटर पर किलोग्राम एवढे असते तसेच सीएनजी स्वस्थ आहे. हा खूप मोठा दुसरा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. तसेच तिसरा पॉझिटिव्ह पॉईंट असा की सीएनजी किट इन्व्हरमेंट फ्री आहे पेट्रोल आणि डिझेल पेक्षाही खूप कमी प्रमाणात प्रदूषण होते. सिएनजी मुळे प्रदूषण कमी होते.
चौथा पॉझिटिव्ह पॉईंट असा की जर तुमचे रोजचे गाडीचे रनिंग 30 ते 40 किलोमीटर असेल आणि तुम्ही सीएनजी चा वापर करत असाल तर तुम्ही सीएनजी द्वारे दरवर्षी तुमचे पेट्रोल व डिझेलवर होणारा अतिरिक्त खर्च मोठ्या प्रमाणात वाचवू शकतात. हा खर्च प्रति वर्षी जवळजवळ तीस ते चाळीस हजार एवढा आहे सीएनजी मुळे बरोबरच डिझेल पेक्षा जास्त मायलेज तुम्हाला सीएनजी मध्ये भेटते.
पाचवा पॉझिटिव्ह पॉईंट असा की गाड्यांच्या इंजिनवर सीएनजी बसवल्यामुळे इंजिन नॉइज कमी होतो. इंजिन मध्ये टेम्परेचर वाढल्यामुळे इंजिन मध्ये थोडा स्मूथ नेस येतो. प्रत्येक गाडीत या गोष्टी पाहायला मिळत नाहीत. पण बऱ्यापैकी गाड्यांमध्ये स्मूथनेस येतो. आता आपण पाहुयात सीएनजी किट आपण कोठून बसवून घेऊ शकता. जर तुम्ही नवीन गाडी घेत असाल तर तुम्ही असा प्रयत्न करा की ऑलरेडी सीएनजी कंपनी फिटेड कारच खरेदी कराल.
यामध्ये मारुतीचे आणि हुंडाइ चे खूप सारे गाड्यांमध्ये व्हेरियस आहेत, जे सीएनजी रेफेर करतात. तुमच्याकडे एखादी गाडी आहे आणि त्याला तुम्हाला त्याला सिएनजी बसून घ्यायचे असेल तर स्क्विन्शियल सीएनजी किट शक्यतो फिट केले पाहिजे. कारण स्क्विन्शियल सीएनजी किट हे बाकीचे किट पेक्षा म्हणजे ओपन लूप आणि क्लोज लूप पेक्षा सिएनजी किट हे खूपच उत्तम दर्जाचे असते.
बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की सिएनजी ॲटोमॅटीक कार मध्ये चालते का फक्त मॅन्युअल गाडीमध्ये चालते? त्याचे उत्तर आहे की सीएनजी दोन्ही ऑटोमॅटिक गेअर बॉक्स आणि मॅन्युअल गिअर बॉक्स यांमध्ये उत्तम प्रकारे चालते गिअर बॉक्स सिव्ही असेल ॲटोमॅटीक असेल किंवा ए एम टी असेल अशा सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये सीएनजी किट खूप उत्तम प्रकारे काम करते. फरक एवढाच असेल की मॅन्युअल गियर बॉक्स पेक्षा ऑटोमॅटिक गेअर बॉक्स मध्ये सीएनजी मुले पॉवर लॅग थोडा जाणवतो बाकी एवढा काही फार मोठा डिफ्रान्स जाणवत नाही. तर हे होतो सीएनजी चे फायदे आणि नुकसान.