तुम्हाला माहित आहे का, आयर्लंड देशाचे माजी पंतप्रधान हे भारतीय वंशाचे आणि तेही मराठी आहेत? ।। भारतीय वंशाचे लियो वराडकर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती !

लोकप्रिय शैक्षणिक

2017 मध्ये आयर्लंडच्या पंतप्रधान पदी विराजमान झाले ले लिओ वराडकर हे मराठी आहेत, हे तेव्हा खूप कमी लोकांना माहीत होतं. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वराड या गावचे रहिवासी आहेत. लिओ यांचा जन्म 18 जानेवारी 1979 मध्ये आयर्लंड ची राजधानी असलेल्या डब्लिन शहरात झाला. ट्रीनीटी कॉलेजमधून त्यांनी मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले त्यांचे वडील अशोक वराडकर हे पेशाने डॉक्टर होते.

1960 साली ते भारतातून इंग्लंडला गेले तिथेच त्यांनी आयरिश वंशाच्या आणि पेशानं नर्स असलेल्या मेरीयम यांच्याशी लग्न केल. त्यानंतर सत्तरच्या दशकात हे जोडपं आयर्लंड ला राहायला गेल. वराडकर यांनी आयर्लंडचे वाहतूक, पर्यटन, आणि क्रीडा मंत्री पद भूषवले. तसच ते आरोग्य मंत्री होते. 2017 मध्ये ते सीमोंन केव्हीने यांना पराभूत करून पंतप्रधानपदी विराजमान झाले. वैद्यकीय व्यवसायाकडून त्यांची वाटचाल राजकारणाकडे झाली. पण ते राजकारणात तरुण वयापासूनच रस घेत होते.

डॉक्टर फक्त मोजक्या प्रमाणात रुग्णांना मदत करू शकता, पण आरोग्यमंत्री मात्र मोठ्या प्रमाणावर लोकांचे आयुष्य बदलऊ शकतात, असं लिओ त्यांनी 1999 मध्ये म्हटलं होतं वयाच्या विसाव्या वर्षी लिओ त्यांनी स्थानिक निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतर लिओ त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.

त्यांनी 27 व्या वर्षीही ते संसदेत निवडून आले 2011 ते 2013 या कालावधीत त्यांनी वाहतूक पर्यटन आणि क्रीडामंत्री भूषवल. त्यानंतर 2014 ते 2016 या काळात या आयर्लंडचे आरोग्य मंत्री होते. त्यानंतर 2017 मध्ये फाईन गेल पक्षाच्या लिओ वराडकर यांनी सिमोन कोव्हिने यांचा पराभव केला आणि आयर्लंडच्या पंतप्रधानपदी त्यांची निवड झाली. याबरोबरच 39 वर्षीय लिओ आयर्लंडचे आतापर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले.

तसंच आयर्लंडचे पहिले स’म’लैं’गिक पंतप्रधान म्हणूनही त्यांना ओळखले गेलं. 2015 मध्ये आयर्लंडच्या सरकारी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपण स’म’लैं’गिक असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर काही महिन्यांनी आयर्लंडमध्ये स’म’लैं’गिक विवाहावर सार्वमत घेण्यात आल, या सार्वमताचा कौल स’म’लैं’गिक विवाह च्या बाजूने आला यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली त्यानंतर ग’र्भ’पात विरोधी कायद्यात बदल व्हावा म्हणून प्रयत्नशील होते

आणि आता या संदर्भातल्या सार्वमताचा निकाल ही त्यांच्या अजून लागला वराडकर कुटुंबीयांचे वराड गावात घर आणि बागायती शेती आहे. त्यांची शेती आणि घर हे त्यांचे चुलत बंधू वसंत वराडकर सांभाळतात. लिओ ची आई मारियाम आणि बाबा अशोक वराडकर वर्षातून एक-दोनदा मूळ गावी येतात. गावी आल्यावर ते मालवणी पाहुणचार स्वीकारतात त्यांना अजूनही मराठी भाषा काही कोकणी शब्द बोलता येतात.