लॉक डाऊन नंतर कपडे व्यवसायातून कमवा महिना २०-५० हजार महिना तेही घर बसल्या ।। व्यवसायाचे A – Z सर्वकाही !!

अर्थकारण लोकप्रिय

या लॉकडाउन च्या काळात अनेकांनी उपजीविकेची नवीन साधन शोधली आहेत, अशातच काहींनी कपड्याचे दुकान देखील सुरू केली असतील किंवा तसा विचार चालू असेल. पण मित्रांनो तुम्ही चालू केलेला व्यवसाय किंवा करणार असाल तो व्यवसाय याच तुम्ही काय नियोजन केले आहे ज्यामुळे तुम्हाला नफा होईल. हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे, या पद्धतीने तुम्हाला माल विकता आला तर पुढे जाऊन तुम्ही  मोठया प्रमाणात गुंतवणूक करायला हरकत नाही.

म्हणजे  आपण दुकान टाकण्यापूर्वी किंवा मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी ही आपल्या स्वतःला ही एक परीक्षा द्यायला अवघड नाही. कपडे म्हटलं की आपल्या समोर खूप प्रकारचे कपडे येतील पण उदाहरण म्हणून आपण जेन्ट्स वेअर मधले शर्ट आणि जीन्स घेऊ. आपल्याला कपड्याचा व्यवसाय करायचा म्हणल तर आपण सोप्प काम करतो पण ते सुद्धा आपल्याला अवघड वाटत ते म्हणजे दुकान टाकणे, निवांत बसणे आणि येणाऱ्या कस्टमर ची वाट पाहणे.

आणि कस्टमर नाही म्हणून काही दिवसांनी तेच दुकान बंद करणे. अशा पद्धतीने दुकान कधीच चालणार नाही, त्यासाठी तुम्हाला वेगळा दृष्टकोन ठेऊन विचार करावा लागेल. एक म्हणजे सुरुवातीला तुम्ही जर तुमचे कस्टमर ओळखू शकला तर पुढे चालून तुम्ही तुमचा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे पूढे नेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील जेवढे काही लोक असतील त्यांची यादी करायची आहे, ही यादी कमीतकमी 500 लोकांची असावी.

जर तुम्ही प्रयत्न केला तर यापेक्षा ही जास्त लोकांची यादी तयार होऊ शकते. पण तुम्ही म्हणाल आमच्याकडे जास्तीत जास्त 100 ते 150 लोकांच्यावर यादी आहे,काही हरकत नाही हे ही चाले. पण जेवढे जास्त लोक तेवढं चांगल आहे. ही झाली तुमची कस्टमर ची यादी तयार. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जो शर्ट किंवा जीन्स चा माल भरणार आहात तो इतका चांगला हवा की एखादा शर्ट जर तुम्ही 10 कस्टमर पुढे ठेवला तर 10 पैकी 9 जणांना तो आवडायला हवा.

हे सांगायचं कारण अस की अनेकदा कस्टमर ला काय हवंय  याचा विचार न करताच माल भरला जातो त्यात कोणीही चालू वेळेनुसार विकल्या जाणाऱ्या मालाचा विचार करत नाही, किंवा सध्या मार्केट मध्ये कस्टमर ला काय हवं आहे याचा विचार न करताच माल भरतात आणि मग यामुळे माल विकला जात नाही आणि तसाच राहतो. आणि व्यवसायात नुकसान होते. तुम्ही मार्केट चा अभ्यास केला तर कितीतरि नवीन प्रकारचे डीझाईन तुम्हाला पाहायला मिळतील.

आजचा जमाना टीकण्याचा नाही दिसण्याचा आहे. म्हणजेच तुमच्याकडील विक्रीचे कपडे कस्टमर ला किती भारी वाटतात ते महत्वाचे आहे. या नंतर विषय येतो तो माल खरेदी करण्याचा. माल खरेदी कुठून करणार, माल पसंत कसा करायचा, तुम्ही घेत असलेला माल म्हणजेच शर्ट जीन्स की किमतीपर्यंत असावेत असे प्रश्न पडले असतील. मोठया प्रमाणात तुम्हाला मुंबई मध्ये होलसेल मार्केट मिळेल. मुंबई मध्ये दादर ला मनीष मार्केट आहे, वडाळा मध्ये देखील मार्केट आहे.

खारला सुद्धा एक चांगल मार्केट आहे. यानंतर तुमच्या जवळील कोणी होलसेल मार्केट विक्रेता असेल तर तुम्ही त्यांचा कडून पण माल विकत घेऊ शकता. असे बरेच अँप आहेत जे फक्त मोठ्या प्रमाणात  होलसेल च काम पाहतात. तुम्हाला फक्त एवढच लक्षात ठेवायचं आहे की माल चांगला आणि न्यू स्टायलिश असावा. कपड्याची पसंदी कशी करायची यासाठी तुम्हाला थोडा अभ्यास करावा लागेल. आता यानंतर आपण किमतीबद्दल बोलू जी शर्ट आणि जीन्स तुम्हाला घ्यायचे आहेत त्यातील शर्ट ची किंमत कमीत कमी 300 ते जास्तीत जास्त  320 रुपये.

जीन्स ची किमंत कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 550 रुपये पर्यंत असायला हवी. यापेक्षा जास्त किमतीचे शर्ट आणि जीन्स तुम्हाला प्रत्येक होलसेल मार्केट मध्ये मिळतील पण सुरुवातीला यापेक्षा जास्त खरेदी न केलेले बरे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुंतवणूक, आपली गुंतवणूक कमी आहे आणि जास्त नफा मिळवून देणार आहे. समजा तुम्ही निवडक असे 100 शर्ट खरेदी केले आणि होलसेल अशी प्रत्येकी 320 अशी त्याची किंमत ठरवली आहे तर त्याचे 100 गुणिले 320 म्हणजे 32000 आपली गुंतवणूक होते.

ही झाली तुमची खरेदी आता विक्री. यासाठी तुम्हाला दुकानांची गरज लागणार नाही, ह्या मालाचा स्टॉक घरातच करायला काही हरकत नाही म्हणजे इतर खर्च ही लागणार नाही. यानंतर आपल्याला 500 लोकांना माल विकायचा आहे ज्यांची आपण यादी काढली आहे. आता तुम्ही काढलेल्या लोकांना माल कसा विकायचा ते पाहू. सर्वात आधी एखादी छान डीझाइन असलेले पोस्टर किंवा कार्ड बनवा पण ते तुम्ही स्वतः बनाव त्यासाठी  इतर कुणाला पैसे द्यायची गरज नाही.

यानंतर हे जे कार्ड आहे ते त्या प्रत्येक व्यक्ती पर्यंत गेलं पाहिजे ज्याची तुम्ही यादी बनवली आहे. अजून एक म्हणजे यादीतील प्रत्येक व्यक्तीला तुम्ही स्वतः हुन फोन करायचा आहे आणि तुमच्या व्यवसायाबद्दल सांगायचं आहे, व त्यांना एकदा येऊन माल बघून जायला सांगा जेणेकरून तुम्हाला तुमचा माल लवकर विकता येईल. तुम्हाला हे शर्ट 30 दिवसात विकायचे आहेत, कमीत कमी दिवसाला 3 ते 4 शर्ट विकले गेले पाहिजे. आता आपला नफा किती आहे ते पाहू.

एक शर्ट 550 ला विकला तर 230 रुपये राहतात म्हणजे 230 गुणिले 100, असे 23000 रुपये राहतात. म्हणजेच तुम्हाला इतर खर्च सोडला तर 20 ते 21 हजार निव्वळ नफा राहतो आपण 20 हजारच पकडू. खूप कमी गुंतवणुकीमध्ये खूप चांगल्या प्रकारचा नफा तुम्हाला मिळतो. मित्रांनो शेवटी एवढंच सांगेन याच पद्धतीने तुम्ही शर्ट जीन्स किंवा इतर कोणतेही कपडे विका पण सुरुवातीला आपल्या व्यवसायाचे नियोजन नक्की करा.

ते लक्षात घेऊनच मग पूढे मोठ्या गुंतवणुकीला हाथ घाला. पुढे जाऊन  फेस बुक, व्हाट्स अप वर फ्री मध्ये तुमच्या व्यवसायाची जाहिरात करा. तुम्हाला 20 हजार रुपये नफा मिळवता आला तर तुम्ही या परीक्षेत पास झाला असे समजा. कस्टमर कसे वाढतील याकडे लक्ष द्या. सुरुवातीला तुम्हाला 20 हजार कमी वाटत असतील पण काही दिवसांनी येणाऱ्या वेळात तुमच्या प्रयत्नांची 20 हजार चे 20 लाख देखील होऊ शकतात. प्रयत्न करत रहा.