अंध, अपंग सर्टिफिकेट/दिव्यांग प्रमाणपत्र काढायचे असेल तर त्यासाठी कसा अर्ज करावा?।। घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा करावा जाणून घ्या !

लोकप्रिय शैक्षणिक

दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजेच अपंग असलेले सर्टिफिकेट, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट किंवा हॅंडीकॅप सर्टिफिकेट असेही म्हणतात. तर हे अपंग असलेले सर्टिफिकेट तुमच्या कडे जर असेल. तर तुम्ही शासकीय नोकरी , शासकीय पेन्शन योजना त्याच्यानंतर एस.टी बस सेवांचा प्रवास, रेल्वे सेवांचा प्रवास , विमान सेवा जी आहे त्याचा प्रवास छोटयाश्या किंमती मध्ये करू शकता.

तर यासाठी तुम्हाला अपंग असलेले सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे, आणि हे सर्टिफिकेट मिळावण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्यासाठी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट म्हणजेच अपंग असलेले सर्टिफिकेट आहे , आणि युडीआयडी कार्ड ह्या दोहनी गोष्टी लागतात.

तर आपण अपंगाच्या सर्टिफिकेटसाठी अर्ज कसा करायचा, आणि युडीआयडी कार्ड ह्या दोन्ही गोष्टींसाठी आपण तुम्ही अर्ज करू शकतो. ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज कसा करायचा ते बघणार आहोत. दिव्यांग सर्टिफिकेट साठी कसा अर्ज करायचा?

i)सर्वात प्रथम आपल्याला मोबाईल मधील/किंवा लॅपटॉप मधील गूगल ओपन करायच आहे व ii)त्यावर टाईप करायचंय डिसॅबिलिटी सर्टिफिकेट हा शब्द तुम्हाला टाईप करायचंय. डिसॅबिलिटी सर्टिफिकेट टाईप केल्या नंतर सअर्च करायचंय.
आणि सअर्च केल्या नंतर जी पहिली वेबसाइट आहे.

iii)Unique disability ID म्हणजेच ( UDID) swavlamban card.gov.in या वेबसाईट वर यायचंय. swavlamban card.gov.in म्हणजेच युडीआयडी. या वेबसाइट वर आल्या नंतर तुम्हाला आत्ता अर्ज करायचाय. तर अर्ज करण्यासाठी उजव्या साईटला तुम्ही पाहू शकता.

iv)”Apply for disability certificate and udid card” या पर्याया वरती तुम्हला क्लिक करायचय. अप्लाय फॉर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट अँड युडीआयडी कार्ड हाच पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. हा पर्याय सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला  जो संपूर्ण फॉर्म  येइल तो भरायचा आहे.

ह्याच्या मध्ये कोण कोणत्या गोष्टी भरायच्या आहेत, कश्या कश्या मध्ये भरताना काळजी घेयाची आहे, कोण कोणते डोकमेंट्स तुम्हाला लागणार आहे ते जाणून घेऊ. तुम्हाला याच्या मध्ये तुम्हाला चार गोष्टी भरायच्या आहेत : 1.Personal details 2.Disability details 3.Imployment details 4.Identity details.

आपण एक एक पद्धतीने बघूया, पुढची इन्फॉर्मशन.तर हिथे सर्वात प्रथम. I)पर्सन्ल डिटेल्स : 1)पर्सन्ल डिटेल्स मध्ये आल्यानंतर अप्लिकन्ट फर्स्ट नेम (applicant name) जो अपंग आहे त्याच पाहिलं नाव, मधल नाव , आणि आडनाव तुम्हाला टाकून घ्यायच.

2)हे टाकल्या नंतर तुम्हाला मराठी मधून सुद्धा टाईप करायच आहे. पाहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव तुम्हाला टाकून घ्यायच आहे. 3)या गोष्टी टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचय आणि खाली आल्यानंतर तुम्हाला अप्लिकन्ट फादर नेम (applicant father name ), वडीलाचे नाव जो अपंग असेल त्याच्या वडीलाचे नाव इथे येणार आहे.

त्यानंतर आईच नाव येणार आहे पूर्ण नाव टाकायच आहे. 4)त्याच्या नंतर Date of birth टाकायची आहे. जो अपंग आहे त्याची जन्मतारीख टाकायची आहे. 5)डेट ऑफ बर्थ टाकल्या नंतर तुम्हाला आवेदन का पिता का नाम जे आहे ते तुम्हांला मराठी मधून टाकून घ्यायचे आहे.

6)हे टाकल्या नंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचंय तुम्ही मेल आहात का फिमेल. 7)त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचाय, त्या नंतर ईमेल आयड़ी टाकायचा आहे. ईमेल आयड़ी नसेल तरी चालेल. 8)त्यानंतर मार्क्स ऑफ आयडेंटीफिकेशन ( mark of identification) तुमच्या शरीरावर जे मार्क आहे ते तुम्ही टाकू शकता म्हणजेच शरीरावरील एखादी खूण.

9)नंतर कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. sc ,st,obc कश्यात मोडता. 10)त्याच्या नंतर ब्लड ग्रुप सिलेक्ट करायचा आहे. 11)त्याच्या नंतर मॅरीड आहे कि अनमॅरिड किंवा विधवा आहे ते सिलेक्ट करायच आहे.(तुमचे लग्नाची माहिती) 12)सिलेक्ट केल्या नंतर तुम्हाला ” रेलेशन विथ पी डब्लू डी” म्हणजेच हिथे तुम्ही आईच किंवा वडीलाचे नाव टाकू शकता.

तर आपण हिथे फादर ,मदर, सिस्टर, यन्कल, आंटी सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट केल्या नंतर तिथे तुम्ही सिलेक्ट केलेल्या व्यक्तिचा मोबाईल नंबर टाकायचा असतो. 13)त्यानंतर जो अपंग आहे त्याचा फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायची आहे. तर हिथे लक्ष्यात ठेवा.

हाताने अपंग असेल तर सिग्नेचर अपलोड करायची गरज नाही. फक्त फोटो अपलोड करू शकता. फोटो कॉम्पल्सरी आहे. फोटो अपलोड करताना 15 केबी ते 30 केबी पर्यंत अपलोड करायचा आहे. आणि जर सिग्नेचर जर तुमच्या कडे असेल तर सिग्नेचर पण  3 केबी ते 30 केबी पर्यंत अपलोड करायची आहे.

14)ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला ऍड्रेस टाकायचा आहे, लक्ष्यात ठेवा तुम्हाला आधार कार्ड वर जो संपूर्ण ऍड्रेस आहे तो टाकायचा आहे. हिथे इंग्लिश आणि मराठी दोहनी मध्ये टाकायचा आहे. स्टेट सिलेक्ट करायच आहे. जिल्हा सिलेक्ट करायचा आहे.

तुम्हाचा तालुका सिलेक्ट करायचा आहे.गाव  सिलेक्ट करायच आहे. पिनकोड टाकायचा आहे. त्याच्या नंतर तुम्हच ऍड्रेस प्रूफ सिलेक्ट करायचय तुम्ही कोण कोणतं ऍड्रेस प्रूफ देणार आहे त्यामध्ये  लाईट बिल, ड्रायविंग लायसन्स ,आधार कार्ड, पासपोर्ट या मधील तुमच्याकडे कोणतही असेल तर तुम्ही देऊ शकता.

इलेक्ट्रिसिटी बिल सुद्धा आहे. कोणताही ऍड्रेस प्रूफ तुम्ही हिथे सिलेक्ट करू शकता. एक लक्ष्यात ठेवा हिथे हे तुम्हाला सिलेक्ट करायचच आहे. जे डोकमेण्टस सिलेक्ट केलय ते अपलोड करायच आहे ते 100 केबी पर्यंत असावं. तर पर्मनंट ऍड्रेस जो वरती दिलाय तो असेल तर सेम ऍज अबाव ( same as above)यावर क्लिक करायच.

या वरती क्लिक केल्या नंतर जो वरती दिला आहे ऍड्रेस तो खाली येईल. 15)त्या नंतर एजुकेशन डिटेल टाकायची आहे. हायेस्ट एजुकेशन तुम्ही कितवी शिकला आहेत. ग्राजुयेशन, 12 वी,  10वी झाली का हे सिलेक्ट करायच आहे. हे झाल्या नंतर उजव्या कोपऱ्या मध्ये नेक्स्ट पर्याय असेल त्यावर  क्लिक करायच आहे.

II) डिसॅबिलिटी डिटेल्स : 1)तर या डिटेल्समध्ये सर्वात प्रथम अपंग असलेले सर्टिफिकेट जर असेल तर एस करायच नसेल तर नो करायच. 2)त्या नंतर डिसॅबिलिटी टाईप , डिसॅबिलिटी टाईप मध्ये तुम्ही अपंग कसे आहात, तुम्ही दिव्यांग कश्या प्रकारचे दिव्यांग आहात.

समजा तुम्हाला कमी दिसत असेल तर लो व्हिजन (low vision)म्हणजेच कमी दिसतंय. जर तुमच पाय वैगरे तुमचा काही अक्सिडेन्ट झाला असेल किंवा मेंटल वैगरे असाल तर त्यामध्ये   लोकोमोटर(locomotor ) म्हणजे तुम्ही पायाने अपंग आहात. तर ह्या मधील जो तो प्रकार तुम्ही निवडायचा आहे.

तर या डिसॅबिलिटी टाईप मध्ये तुम्ही दिव्यांग कश्या प्रकारचे आहेत तो प्रकार तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे.  3)तर तुम्हाला आत्ता ह्याच्या मध्ये डिसॅबिलिटी सीन्स् (disability since) आणि डिसॅबिलिटी बाय बर्थ ( disability by birth) असे ऑपशन आहेत.

डिसॅबिलिटी सीन्स या मध्ये तुम्ही दिव्यांग अपंग किती वर्ष्या पासून हा अपंगाचा आजार आहे म्हणजे जर जन्मा पासून आहात तर डिसॅबिलिटी बाय बर्थ हा पर्याय सिलेक्ट करा. जर जन्मा पासून नसेल तर 1996, 1997 किंवा 2000 पासून कधी अपंग झालात ते वर्ष तुम्हाला सिलेक्ट कराव लागेल.

4)हे झाल्या नंतर डिसॅबिलिटी एरिया ( disability area) नक्की कश्याने अपंग आहात डोळ्याने अपंग आहात का ?डाव्या डोळ्याने अपंग आहात का ?पायाने अपंग आहात का ? का हाताने अपंग आहात, का छातिने अपंग आहात? , चेहऱ्याने अपंग आहात का? डोक्याने अपंग आहात का? मणका गेलाय का ? ज्याने अपंग आहात ते सिलेक्ट करायचय.

5)त्याच्या नंतर तुम्हाला जर पेन्शन असेल तर तिथे हॉस्पिटल आणि पेन्शनच टाकायचय. पेन्शन कार्ड नंबर असेल तर टाकायचं नसेल तर ते सोडून द्यायच आणि पुढे प्लीज सिलेक्ट डिसॅबिलिटी डीऊ टू ( please select disability due to) म्हणजे काय तर अक्सिडेन्ट झाला होता का तुमचा?

कोणता आजार होता का ? का तुम्हाला कोणतं इन्फेकशन झालं होत ? का मेडिसिनने काही झालं होत, तर या मध्ये consisiation म्हणजे तुमच अपंगतत्त्व आहे.तर तुम्ही जन्मापासून आहात तर डिसॅबिलिटी आहे तर जन्म झाल्यापासून डिसॅबिलिटी आहे, आणि 6)त्याच्या नंतर तुम्हाला हॉस्पिटल सिलेक्ट करायचं आहे.

हॉस्पिटल सिलेक्ट करताना लक्ष्यात घ्यायचय निअर बाय जे शेजारच हॉस्पिटल असेल जे जवळ  हॉस्पिटल असेल तेच सिलेक्ट करायच आहे. कारण तुम्हाचा महत्वाचा पॉईंट इथे आहे. हा फॉर्म झाल्या नंतर हा फॉर्म तुम्हाला ह्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचं आहे.

त्यांचा तुम्हाला मेसेज येईल त्याच वेळी हा फॉर्म तुम्हाला तिथे जमा करायचाय. आणि तुमचं तिथे चेक अप होणार म्हणून हॉस्पिटल तुम्ही व्यवस्थित निवडा. ते निवडल्या नंतर तुम्हांला पुढे नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्या नंतर तिसरा पॉईंट येतो.

III)एम्प्लॉयमेंट डिटेल्स : 1)तुम्ही नोकरीला आहात का ? तुम्ही काम करताय का ? जर काम करत असाल तर एम्प्लोय जर करत नसाल तर अनएम्प्लोय हे सिलेक्ट केल्यानंतर  2)जर तुम्ही काम करत नसाल तर किती वर्ष झालं काम करत नाहीत ते वर्ष टाकायचय.

3)त्या नंतर बीपीएल (BPL) आणि एपीएल (APL) बीपीएल म्हणजे पिवळं आणि एपीएल म्हणजे केसरी रेशन कार्ड , रेशन कार्ड कोणतं आहे हे सिलेक्ट करायच आहे. 4)त्या नंतर इन्कम सोर्स (income source ) तुमचा इन्कम जो आहे. तो किती आहे एक लाखाच्या आतमध्ये आहे का एक लाख आहे कि दहा लाखाच्या आत आहे. हे तुम्हाला सिलेक्ट करून नेक्स्ट पर्याया वरती क्लिक करायचय. नेक्स्ट पर्याया वरती क्लिक केल्यानंतर जो चौथा पर्याय आहे जो शेवटचा आहे.

IV)आयडेंटीफिकेशन डिटेल्स : 1)आयडेंटीफाय डिटेल्समध्ये आयडेंटी प्रूफ तुम्हाला द्यायचं आहे. जर आधार कार्ड हा प्रूफ दिला तर हिथे तुम्हाला आधार कार्ड अपलोड करावे लागेल आणि त्याचा नंबर टाकावा लागेल. म्हणजेच तुम्ही जे आयडेंटी प्रूफ द्याल ते तुम्हाला अपलोड कराव लागेल.

डॉक्युमेंट्स अपलोड केल्यावर 2) I agree या वर टिक करायची ब्लू टिक करून तुम्हाला सिक्युरिटी कॉर्ड जो आहे. म्हणजेच कॅप्चा जो आहे समोर चित्रा मध्ये दिला जातो तो टाकायचा आणि I agree to read I agree terms and condition त्या संपूर्ण एक्ससेप्ट करायच आणि त्या पुढे प्रोसिड बटणावर क्लिक करायचं.

3)प्रोसिड बटणावर क्लिक केल्या नंतर जेवढी माहिती तुम्ही भरलेली आहे ती जी संपूर्ण माहिती तुमच्या समोर येईल. तुम्ही संपूर्ण माहिती चेक करायची आहे. कोण कोणती माहिती तुम्ही भरलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थित चेक करा. खाली आल्या नंतर जेवढ्या जेवढ्या चार स्टेप्स तुम्ही फोल्लो केल्या होत्या त्या स्टेप्स मध्ये तुम्हची माहिती बरोबर आहे का ते चेक करायचय.

जर तुम्हाला एडिट करायच असेल तर एडिट ऑपशन आहे एडिट करू शकता. 4)त्यानंतर कन्फर्म अँप्लिकेशन वर क्लिक करायचं आहे. कन्फर्म अँप्लिकेशन क्लिक केल्या नंतर जर त्यांच्याकडे 5)सीएससी (CSC)असेल तर त्यांच्याकडे  तिसरा ऑपशन आहे डिजिटल सेवांचा ते त्यांनी लॉगिन (लॉगिन) करू शकता.

तर कन्फर्म पर्यायावर क्लिक केल्या नंतर तुम्ही जे जे पॉईंट तुम्ही भरलेले आहेत ते बरोबर आहेत का ते संपूर्ण वाचून तुम्ही तिथे एस (yes) यावर क्लिक करायच आहे. ह्याच्या मध्ये तुम्ही जे जे माहिती भरलेली आहे ते बरोबर भरली आहे का ? ती माहिती तिथे तुम्हाला विचारली जाईल व त्या संपूर्ण माहिती वर yes करून जायचं आहे.

एस केल्या नंतर पुढे 6)सीएससी through लॉगिन करतोय,आणि कन्फर्म जर तुम्हाच्याकडे सीएससी नसेल तर म्हणजेच डिजिटल सेवांचा आयडी पासवर्ड नसेल तर तुम्ही कन्फर्म करू शकता. त्यानंतर आपण सीएससी ने लॉगिन केल्यानंतर सीएससी च्या वेबसाइट वर जावं लागेल. आणि जर तुम्ही सीएससी ने लॉगिन केलं नसेल तर नॉर्मल तुमचं अप्लिकेशन सबमिट होणार आहे.

7)तर सीएससी मधून केल्यावर अप्लिकेशन ओपन झाल्यावर दहा रुपयाचं पेमेन्ट जे आहे ते करायच आहे. 8)तर कॉन्टीनुए (continue) या पर्यायवर क्लिक करून दहा रुपयाचं पेमेन्ट जे आहे ते सीएससी through होणार आहे. तर जे सीएससी विएली आहेत म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्रावाले आहेत ते हिथे पेमेन्ट करू शकतात,

आणि अपंग जे आहेत त्यांना ते देऊ शकतात. तर अश्या प्रकारे हे पेमेन्ट करायच आहे ,आणि जर नॉर्मल फॉर्म भराला असेल तर तो सबमिट करायचा आहे. तर सीएससी मध्ये आल्यावर आयडी पासवर्ड टाकून याच्या मध्ये फक्त 3 रुपये कट होणार आहे , आणि दहा रुपये जे आहे त्याचे पेमेन्ट स्लिप निघणार आहे. तर इथे तुमचा संपूर्ण फॉर्म सबमिट होणार आहे.

9)आणि तुमच्या स्क्रीन वर थँक यु मेसेज येईल, तुम्हाला टेक्स्ट मेसेज हि आलेला असेल मोबाईल वरती तुमचा एनरोलमेंट नंबर आलेला असेल, आणि तुम्हाला हे फॉर्म डाउनलोड करायचे आहेत. खुप महत्वाचे आहेत हे फॉर्म आहेत आणि हे फॉर्म घेऊन तुम्हाला हॉस्पिटल मध्ये जायचंय हॉस्पिटल मध्ये केव्हा जायचं जेव्हा तुम्हाला मेसेज येईल.

मेसेज येईल तुम्हाला त्यामध्ये टाईमिंग, तारीख हि येईल. तेव्हा तुम्हांला हे फॉर्म घेऊन जायचं आहे. जे हॉस्पिटल तुम्ही सिलेक्ट केलं आहे त्या हॉस्पिटल मध्ये तुम्हाला फॉर्म घेऊन जायच आहे पण मेसेज आल्यावर जायचं आहे. तर असा हा ऑनलाईन फॉर्म आहे. अपंग किंवा दिव्यांग सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे असेल तर या प्रकारे आपण ते अप्लाय करू शकतो.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

7 thoughts on “अंध, अपंग सर्टिफिकेट/दिव्यांग प्रमाणपत्र काढायचे असेल तर त्यासाठी कसा अर्ज करावा?।। घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा करावा जाणून घ्या !

  1. आतापर्यंत तरी कोणत्याही सवलतीचा काही लाभ झाला नाही फुकट परेशानी मात्र जरुर होते.वर मानसिक त्रास.बंद करा यार ही छळवनूक

  2. सन्माननीय महोदय ,
    माझ्या कडील असलेले संपूर्ण अपंगत्वचा विचार न करता मला फक्त एका डोळ्यांचे low vision म्हणून 30% प्रमाणपत्र दिलेलं आहे त्याबाबत सुधारित प्रमाणपत्र मिळविण्यासाठी काय करावे लागेल याची सविस्तर माहिती उपलब्ध करून सहकार्य करावे.

Comments are closed.