भारतात ड्रोन उडवण्यासंबंधी आहेत हे नियम. कोणाकडून घ्यावी लागते परवानगी? परवानगी शिवाय ड्रोन उडवल्यास काय आहे शिक्षा?

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

Unmanned Aircraft Sytems (UAS) म्हणजेच ड्रोन भारतासाठी नवीन नाही. लग्नसमारंभातील व्हिडिओ शूट करण्यापासून ते इन्स्टाग्राम रील्स बनवण्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे. सरकारने ड्रोन उडवण्यासाठी अनेक नियम केले आहेत. यासाठी स्वतंत्र वेबसाइटही बनवण्यात आली आहे. यावर तुम्हाला ड्रोन उडवण्याच्या लायसन्सपासून त्याच्या मार्गापर्यंतची सर्व माहिती मिळेल. या नियमांचे उल्लंघन केल्यास 1 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

आता तुमच्या डोक्यात देखील प्रश्न निर्माण झाला असेल, ‘लग्नात, लग्नाच्या प्री वेडिंग शूट मध्ये, किंवा रिल्स बनवण्यासाठी प्रत्येक वेळी हे लोक परवानगी घेतात का?’ आणि जर परवानगी घेत नसतील तर त्यांना हा दंड होतो का? हे आणि अश्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या ‘ड्रोन’ विषयीच्या लेखातून मिळणार आहेत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या फोटोग्राफर, रिल्स बनवणार्‍या मित्रांसोबत शेअर करा. कदाचित हा लेख भविष्यात त्यांना दंड होण्यापासून वाचवू शकेल.

कुठे होतो वापर? :

लग्नसमारंभ ते अत्यावश्यक औषधांच्या पुरवठ्यापर्यंत आजकाल ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. रिल्स द्वारे मनोरंजनासाठी, सीमावर्ती भागात ड्रोनद्वारे शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी, तर डोंगराळ भागात ज्या ठिकाणी वाहने पोहोचू शकत नाहीत, तेथे ड्रोनद्वारे औषधांचा पुरवठा करण्यासाठी ड्रोनचा वापर होताना दिसून येत आहे. कोविड काळातच, आसाम आणि ईशान्येकडील काही भागात ड्रोनद्वारे लस पुरवण्यात आली होती. येत्या काळात ड्रोन संस्कृती झपाट्याने वाढणार आहे.

5 प्रकारांमद्धे विभाजन :

भारतात Unmanned Aircraft Sytems (UAS) म्हणजेच ड्रोनचे 5 प्रकारांमद्धे विभाजन करण्यात आले आहे. पहिला प्रकार म्हणजे 250 ग्रॅम पेक्षा कमी वजनाचे ड्रोन, ज्यांना नॅनो ड्रोन असे म्हंटले जाते. दूसरा प्रकार म्हणजे 250 ग्रॅम ते 2 किलो वजनाचे ड्रोन, ज्यांना मायक्रो ड्रोन असे म्हंटले जाते. तिसरा प्रकार म्हणजे स्मॉल ड्रोन, जे 2 किलो ते 25 किलो वजनाचे असतात. चौथा प्रकार म्हणजे मिडियम ड्रोन, जे 25 किलो ते 150 किलोग्राम वजनाचे असतात. पाचवा प्रकार म्हणजे लार्ज ड्रोन जे 150 किलोग्रॅम पेक्षा अधिक वजनाचे असतात.

अश्या प्रकारे ड्रोनच्या वजणानुसार त्यांचे 5 भागांमध्ये विभाजन करण्यात आले आहे.

ड्रोन साठी केंव्हा आवश्यक असते परवानगी :

नॅनो ड्रोन उडवण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही. मायक्रो ड्रोनपेक्षा मोठे ड्रोन उडवण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (UIN) आवश्यक आहे. याकडे सरकारचे लक्ष असते. असे ड्रोन उडवण्यासाठी परवाना आवश्यक आहे. लग्नामद्धे, रिल्स बनवण्यासाठी वापरले जाणारे ड्रोन हे नॅनो ड्रोन या प्रकारात मोडतात, त्यामुळे असे ड्रोन उडवण्यासाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसते.

UIN नंबर बद्दल माहिती : 

UIN क्रमांक ही ड्रोनची खास ओळख असते. जसे वाहनांचे नंबर वेगवेगळे असतात, त्याचप्रमाणे मोठ्या ड्रोनचेही नंबर असतात. प्रत्येक ड्रोनचा विशेष क्रमांक असतो. या UIN नंबरच्या आधारे कोणत्याही ड्रोनची ओळख पटवण्यास, त्या ड्रोन बद्दल माहिती मिळवण्यास सोयिस्कर जाते. UIN नंबर मिळवण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘डिजिटल स्काय’ या वेबसाईटला भेट देऊन आपला ड्रोन तिथे रजिस्टर करावा लागतो. मायक्रो ड्रोन आणि त्यापुढील प्रकारातील ड्रोनसाठी हे रजिस्ट्रेशन बंधनकारक आहे. या रजिस्ट्रेशन साठी 100 रुपये इतका खर्च येतो.

ड्रोन उडवण्यासाठी आवश्यक असते ट्रेनिंग : 

लार्ज ड्रोन उडवण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) केंद्रांवर प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण डीजीसीएच्या अधिकृत केंद्रात दिले जाते. प्रशिक्षणासाठी 1,000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागते. 10वी पास आणि 18 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला ड्रोन उडवण्याची परवानगी आहे.

ड्रोन उडवण्यासाठी सर्वांनाच परवानगी मिळते का? :

ड्रोन उडवण्याची परवानगी पूर्वी इतकी सोपी नव्हती. नोव्हेंबर 2021 मध्ये सरकारने ही प्रक्रिया सुलभ केली आहे. ड्रोनशी संबंधित सर्व नियम आणि कायदे डिजिटल स्काय पोर्टलवर तपासले जाऊ शकतात. ड्रोन उड्डाणाची परवानगी, प्रमाणन यासंबंधीचे नियम आणि कायदे येथे पाहता येतील. काही संवेदनशील भागात ड्रोन उडवण्याची परवानगी नाकारली जाते.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.