महागड्या साधनांऐवजी या घरगुती पदार्थांनी करा मेक अप रिमुव्ह

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आजकाल मेक अप करणं ही केवळ विशेष प्रसंगाची बाब नाही तर गरजेची बाब बनली आहे. अनेकदा कामाच्या ठिकाणी टापटिप आणि प्रेझेंटेबल राहणं काळाची गरज बनली आहे. त्यामुळे अनेकदा मेक अप केला जातो. सकाळी केलेल्या मेक अपला टच अपची गरजही असते.

अशा वेळी जेव्हा दिवस संपतो सगळ्यात महत्त्वाचं असतं ते केलेला मेक अप काढणं. मेक अप रिमुव्हींग ही मेक अप करण्याइतकीच गरजेची गोष्ट आहे. अनेकदा आळसापोटी केलेला मेक अप योग्य प्रकारे काढला जात नाही. मेक अप काढण्यासाठी असलेल्या बाजारातील प्रॉड्क्टसबाबत अनेकजणी साशंक असतात.

अशावेळी घरगुती रिमुव्हर तयार करु शकता. आम्ही तुम्हाला याबाबत काही टिप्स देतो आहे.

कच्च दुध – कच्चं दुध हा सर्वोत्तम क्लिंझिंग एजंट आहे. त्यामुळे कधी मेक अप रिमुव्हींगसाठी कच्च्या दुधाचा वापर करताना विचार करु नका. कोणतंही बाह्य केमिकल नसल्याने कोणत्याही स्कीन टाईपसाठी हे योग्य आहे.

काकडी – त्वचेला थंडावा देण्यासाठी काकडी सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावते. दिवसभर मेक अप असेल तर त्वचा खेचल्यासारखी होते. तिच्या आरोग्यावरही परिणाम व्हायची शक्यता असते. अशावेळी काकडी त्वचेला शांत ठेवते. बाहेरुनही हायड्रेट राहील याची काळजी घेते.

दही – दही चेह-यावर ग्लो आणतं हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पण तुम्हाला माहीती आहे का ? दही उत्तम मेक अप रिमुव्हर म्हणूनही काम करतं. यासाठी दही उत्तमप्रकारे फेटून घ्या. त्यानंतर कॉटन बुडवून चेह-यावर पसरवा. थोडा मसाज करुन पाण्याने धुवून टाका.

ऑलिव्ह ऑईल – ऑलिव्ह ऑईल त्वचेची रंगत निखरुन नितळ बनवण्यास मदत करते. पण हे ऑईल मेक अप रिमुव्हल म्हणूनही उत्तम काम करतं. तेल आणि पाणी समप्रमाणात घेऊन चेह-यावर लावावं. हळूवार मसाज करावा. नंतर टिश्युने हलकेच टिपून घ्यावं.

बेबी शॅंपू – हा एक मेक अप रिमुव्हलचा उत्तम ऑप्शन आहे. एक कप पाण्यात आठ टी स्पून ऑलिव्ह ऑईल आणि अर्धा टी स्पून बेबी शॅंम्पू मिक्स करा. एक मिश्रण एकत्र करुन गरजेनुसार वापरु शकता.

खोबरेल तेल – आपल्या सगळ्यांच्या घरात उपलब्ध असलेला ऑप्शन म्हणजे खोबरेल तेल. त्वचा, ओठ आणि केस यांसाठी ते अत्यंत उपयुक्त आहे. हातावर थोडं तेल घेऊन हलक्या हाताने चेह-यावर मसाज करा. त्यानंतर टिशु पेपरने हलकेच टिपून घ्या. याने चेहरा स्वच्छ होईलच. पण त्वचेलाही पोषण मिळेल.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा