या सिनेमांचे सिक्वेलही पहिल्या भागांइतकेच झाले होते तुफान लोकप्रिय

Uncategorized

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

एखादा सिनेमा हिट झाला की त्याच्या सीक्वेलबाबत चर्चा होऊ लागतात. एखाद्या सिनेमाचा शेवट हा उत्कंठा वाढवणारा, रंजक असा असेल तर नक्कीच त्याच्या सिक्वेलची चर्चा होते. तुम्हाला माहिती आहे का? बॉलिवूडच्या पहिल्या वहिल्या प्रीक्वेल सिनेमाचं नाव होतं हंटरवाली. अभिनेत्री नादिया या सिनेमात मुख्य भूमिकेत होती. 1935 ला हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाचा सिक्वेल 1945 मध्ये हंटरवाली की बेटी की या नावाने आला होता.

अर्थात यातही फिअरलेस लेडी म्हणून ओळखल्या जाणा-या नादिया यांनीच भूमिका साकारली आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासात या सिनेमाने सिक्वेलची सुरुवात झाली.
यानंतर अनेक दर्जेदार सिनेमांचे सिक्वेल आले आणि प्रेक्षकांनी ते डोक्यावरही घेतले. पाहुयात कोणते कोणते सुपरहिट सिक्वेल्स आहेत हे……

तनू वेड्स मनू 2- शांत स्वभावाचा मुलगा आणि बंडखोर मुलगी यांच्या प्रेमकहानीवर बेतलेला सिनेमा म्हणजे तनू वेड्स मनू. पण या जोडीच्या लग्नानंतरची धमाल कथा दिसली तनू वेड्स मनू 2 या सिनेमात. कंगनाच्या डबल रोलने या प्रेक्षकांची मनं जिंकली.

Tanu weds Manu returns movie poster on Behance

धुम 2 – आतापर्यंतची यशस्वी फ्रॅंचाईजी म्हणून या सिनेमांकडे पाहिलं जातं. या फ्रॅंचाईजीचे आतापर्यंत तीन सिनेमे येऊन गेले आहेत. या सिनेमाच्या सिक्वेलला प्रेक्षकांनी खास पसंती दिली. ऐश्वर्या हृतिकची रोमॅंटिक केमिस्ट्री यात प्रेक्षकांना खास आवडली.

Dhoom 2 turns 14: Hrithik Roshan, Bipasha, Shiamak Davar and others reminisce fond memories | Celebrities News – India TV

लगे रहो मुन्नाभाई – मुन्नाभाई एम बी बी एसच्या दमदार यशानंतर मुन्ना आणि सर्किट लगे रहो मुन्नाभाईची हटके स्टोरी घेऊन आले. या सिनेमातील गांधीगिरीच्या तडक्याने सिनेमाला एक वेगळाच टच मिळाला.

Prime Video: Lage Raho Munna Bhai

क्रिश- कोइ मिल गया या सिनेमाने यशाचे नवे रेकॉर्ड्स बनवले. तर क्रिशने भारतीय सिनेमाला नवा सुपर हिरो दिला. कोई मिल गया च्या सिक्वेलला प्रत्येक वयोगटाने पसंती दिलीच पण यानंतर आलेल्या क्रिश 2 ला ही उत्तम प्रतिसाद मिळाला.

Watch Krrish | Prime Video

फिर हेरा फेरी – विनोदी सिनेमांच्या यादीत हेरा फेरीचं नाव सगळ्यात वर आहे. या सिनेमाने आबालवृद्धांना वेड लावलं. पण याच्या सिक्वेलने विनोदाचा नवा अध्याय लिहिला.

Phir Hera Pheri Songs Download: Phir Hera Pheri MP3 Songs Online Free on Gaana.com

सिंघम रिटर्न्स आणि गोलमाल 2 – खरंतर या दोन्ही सिनेमांचा जॉनर वेगळा पण रोहित शेट्टीने या सिनेमाच्या माध्यमातून नवं सिनेयुनिव्हर्सच चाहत्यांना दिलं. या दोन्ही सिनेमांनी उत्तम गल्ला जमवलाच. याशिवाय पुढील सिक्वेलच्या माध्यमातून आणखी मनोरंजनाचा नवा नजराना दिला.

Singham Returns | Watch Full Movie Online | Eros Now

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.