नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
शोध लावण्यासाठी तुम्ही शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक असणं आवश्यक असतं कां? किंवा एखादं यंत्र बनविण्यासाठी तुम्ही इंजिनिअर असणं गरजेचं असतं कां? या दोन्ही प्रश्नांचं उत्तर नाही असंच असेल. शिक्षणाला पर्याय नाही हे खरं असलं, तरी शोधक वृत्ती मुळातच असायला हवी आणि हे सिद्ध केलं आहे भानजीभाई माथुकिया यांनी.
गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील एका खेडेगावात शेतकरी कुटुंबात जन्मलेले भानजीभाई यांचं सगळं आयुष्य निरनिराळे शोध लावण्यात गेलं आहे. कमी किंमतीचे ट्रॅक्टर बनवण्यापासून संपूर्ण गुजरात आणि राजस्थानमध्ये २५ हून अधिक बंधारे बांधण्यापर्यंत त्यांच्या कामाची व्याप्ती आहे. त्यांच्या इतर शोधांमध्ये भुईमूग फवारणी यंत्र, कमी किंमतीत धान्य साठवण्याची यंत्रणा आणि कृषी फवारणी यंत्र यांचा समावेश होतो.
८० च्या दशकात भानजीभाईंच्या लक्षात आलं की भुईमूग आणि फळबागा पिकवणाऱ्या लहान शेतकऱ्यांना खरं तर उच्च क्षमतेच्या ट्रॅक्टरची गरज नसते. सौराष्ट्र मध्ये राहणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांना असे ट्रॅक्टर परवडणारे देखील नव्हते. भानजीभाईंनी डिझेल इंजिन आणि जीपच्या चॅसिचा वापर करून १० अश्वशक्तीचा ट्रॅक्टर बनवला. बाजारात उपलब्ध पर्यायांपैकी निम्म्याहून कमी किंमतीत उपलब्ध असलेले भानजीभाईंचे तीन आणि चार चाकी ट्रॅक्टर लगेच लोकप्रिय झाले. त्यांच्या मुलाच्या आणि पुतण्याच्या मदतीने त्यांनी आणखी नऊ ट्रॅक्टर बनवले आणि शेतकर्यांकडून त्यांना मोठी मागणी येऊ लागली.
पण काही दिवसांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने त्यांनी बनवलेल्या ट्रॅक्टरच्या डिझाइनबद्दल शंका व्यक्त केली आणि आपण रस्त्यावर ट्रॅक्टर चालवणार नाही असे नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्रावर त्यांना स्वाक्षरी करावी लागली. ग्रासरूट्स इनोव्हेशन ऑगमेंटेशन नेटवर्क (GIAN) यांनी भानजीभाईंना ट्रॅक्टरच्या डिझाइनचे मानकीकरण करण्यात आणि त्यांना मोठ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात मदत केली.
नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन (इंडिया) चे संस्थापक आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद (आयआयएम-ए) मधील वरिष्ठ प्राध्यापक अनिल के. गुप्ता यांनी एका मुलाखतीत सांगितले, की मोठ्या कंपन्यांचे उच्च अश्वशक्तीचे ट्रॅक्टर चांगला व्यवसाय करत आहेत, पण लहान शेतकर्यांची संख्या लक्षात घेऊन १० ते १२ एचपी ट्रॅक्टरसाठी निधी लवकरच उपलब्ध होईल.
२००२ मध्ये जेव्हा सौराष्ट्रातील शेतकरी भूगर्भातील कमी होणारे पाणी आणि कमी पाऊस याविरुद्ध झगडत होते, तेव्हां भानजीभाई पाणीटंचाई सोडवण्यासाठी पुन्हां एकदा मदतीसाठी पुढे आले. अवघे १०,००० रुपये खर्चून त्यांनी त्यांच्या गावातून जाणाऱ्या धारफड नदीवर चेक डॅम बांधला. एक गवंडी आणि चार मजूर मिळून त्यांनी चार दिवसांत हा बंधारा बांधला, त्यामुळे जवळपासच्या परिसरातील विहिरींमधील पाणी वाढले. लवकरच त्यांना गावकऱ्यांनी आणखी बंधारे बांधण्यास सांगितले आणि हा उपक्रम आजतागायत सुरू आहे.
या धरणांच्या फायद्याविषयी बोलताना भानजीभाई यांनी सांगितले की, “सिंचनासाठी प्रमुख स्त्रोत म्हणजे विहीर. परंतु पावसाळा संपल्यानंतर धबधब्यांची भूगर्भातील पातळी कमालीची कमी होते. चेक डॅममुळे पाणी वाहून जाण्यापासून बचाव होतो आणि पुनर्भरण देखील होते.”
भानजीभाईंना त्यांच्या नवकल्पनांसाठी २०१७ मध्ये नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील कॉमनवेल्थ सायन्स कौन्सिलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनच्या संशोधन सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा