‘The sky is not limit’ हा संदेश देणा-या शिवांगी सिंग बाबत जाणून घ्या

लोकप्रिय

नुकताच 73 वा प्रजासत्ताक दिवस साजरा झाला. यावेळी सैन्यदलाच्या चित्तथरारक कसरतींनी डोळ्यांचं पारणं फेडलं. यावेळी लक्षवेधी ठरली ती फायटर प्लेनची सलामी. या फायटर प्लेनचं सारथ्य करत होती जाबाज रणरागिनी शिवांगी सिंह. शिवांगी यापुर्वीही चर्चेत आली आहे ती राफेल विमानांदरम्यान.

2020 मध्ये राफेल विमानांची पहिली खेप भारतात आली. ही टीम अंबाला एअरपोर्टवर लॅंड झाली. यावेळी राफेल घेऊन आलेल्या पायलटमध्ये पहिली महिला फ्लाईट लेफ्टनंट म्हणून जॉईन झाली होती. देशाची पहिली महिला फायटर पायलट बनून शिवांगीने देशातील प्रत्येक स्वप्न बघणा-या मुलीसमोर नवा आदर्श ठेवला. प्रत्येक आव्हान मेहनत, जिद्द आणि चिकाटी यामधून पुर्ण करता येतं. याचं उदाहरणच तिने सगळ्यांसमोर ठेवलं आहे.

Rafale Rani' Shivangi Singh: All You Need To Know About India's 1st Woman  Rafale Fighter

शिवांगीबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तिचा प्रेरणादायी प्रवास डोळ्यासमोर आला आता तो आम्ही आमच्या चाहत्यांशी शेअर करत आहोत. शिवांगी मुळची उत्तर प्रदेशच्या वाराणसी जिल्ह्याची राहणारी. एका सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणेच शिवांगीचीही जडण घडण झाली. आई- वडील 2 भाऊ आणि एक बहीण आहे. शालेय जीवनात असल्यापासूनच तिचा एनसीसीकडे ओढा होता. विशेषत: खेळाकडे तिची रुची कायमच होती.

भालाफेकीत तिने राष्ट्रीय स्तरावर ओळख बनवली होती. यात तिला गोल्ड मेडलही मिळालं होतं. सेना जॉईन करण्याची प्रेरणा शिवांगीला तिच्या आजोबांकडून मिळाली. तिचे आजोबा व्ही. ए सिंग आर्मीमध्ये कर्नल पदावर होते. यावेळी आजोबांसोबत तिने एकदा एअरफोर्स म्युझियमला भेट दिली. वायु सेनेचा पराक्रम, युनिफॉर्म पाहून शिवांगी भलतीच प्रभावी झाली होती. त्यावेळीच शिवांगीने फायटर विमानासोबत झेप घेण्याचं नक्की केलं होतं.

Shivangi Singh (Lieutenant Pilot) Biography, Wiki, Boyfriend, Age & More

एमएससी झाल्यानंतर तिने 2015 मध्ये वायुसेनेची परिक्षा पास केली. यानंतर सर्वार्थाने कस पाहणारं दिड वर्षाचं ट्रेनिंगही पुर्ण केलं. आपल्या योग्यतेच्या बळावर तिची 2017 मध्ये तिला देशातील पाच महिला फायटर प्लेन पायलटच्या टीममध्ये निवडलं गेलं. त्यानंतर ती मिग -21 ची फायटर प्लेन पायलट बनली. 2013मध्ये शिवांगीने प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व केलं होतं. नुकत्याच पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये तिने इंडियन एअरफोर्सचं प्रतिनिधित्व केलं. हे करणारी ती दुसरी महिला फायटर प्लेन पायलट आहे.