आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी असलेल्या या पिकांचं उत्पादन घेऊन व्हा मालामाल

शेती

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आज आपण तीन अशा उत्पादनाबद्दल बघणार आहोत. ज्यांना तर मागणी खूप आहे पण उत्पन्न कमी प्रमाणात आहे.

आपल्या ऑफिस कॉलेज किंवा मित्र परिवारात असे असतात ज्यांच्याकडे शेतजमीन असते, पण काही अडचणींमुळे पुरेशी माहिती नसल्याने त्यांनी ती इतरांना नंदावयला दिलेली असते म्हणजे भाड्याने दिलेली असते नाहीतर ती तशीच पडून असते. सध्या करोना आणि लॉकडाऊन या परिस्थितीमुळे जे लोक मोठ्या शहरात जाऊन काम करत होते ते गावी परतले आहेत आणि घरून काम करत आहे. त्यामुळे त्यांना आधुनिक शेतीचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा टाइम उपलब्ध झालेला आहे.

अशा वेळी आपण नेटवर जाऊन भारतातून एक्सपोर्ट होणारे व्हेजिटेबल्स, फ्रुट्स आणि इतर बरेच काही गोष्टींबद्दल माहिती गोळा करू शकतो. माझा एक मित्र आहे जो अशाच एका कंपनीमध्ये काम करतो.जिथून खूप व्हेजिटेबल्स, फ्रुट्स प्रोसेस झाल्यानंतर बाहेरच्या देशात एक्सपोर्ट होतात. हे सर्व व्हेजिटेबल्स कंपनी अगदी शेतकऱ्यांच्या शेतात गाडी पाठवून घेऊन जातात. त्यासाठी आपल्याला फक्त अशा कंपनीशी योग्य मार्गाने जाऊन कॉन्टॅक्ट आणि कॉन्टॅक्ट करणे गरजेचे आहे.

Growing Peppers for Profit - Pepper and Chilies Farming - Wikifarmer

त्यातलं पहिलं पीक आहे घेरकिन हे एक पीक आहे ही काकडीची एक जात आहे.जी मिडल ईस्ट देशांमधून म्हणजेच यूएई,कतार,इजिप्त,सौदी अरेबिया या देशांकडून खूप मागणी आहे.हे देश खूप उष्ण वातावरण असलेले आहे त्यामुळे तिथे आपल्या शरीरातील पाण्याचे तसेच इतर तत्वे म्हणजे शुगर, सॉल्ट यांचे प्रमाण योग्य तितके ठेवणे अतिशय गरजेचे असते. या सर्व गोष्टीसाठी घरकिन हे खूप लाभदायी आहे.

त्यामुळे सर्व सामान्य देशात लोक घरकींचे मोठ्या प्रमाणात सेवन करताना.जी भारतासारख्या देशातून इम्पोर्ट होत असते. दुसरे पीक आहे एलापिनो. एलापिनो ही एक मिरचीची जात आहे. या मिरचीचा वापर फास्ट फूड तसेच पिझ्झा,बर्गर,सँडविच अशा पदार्थामध्ये खुप प्रमाणात होतो.या मिरचीला भारताबरोबरच इतर देशातून सुद्धा खूप चांगली मागणी असते. आणि खूपदा ही मागणी पूर्ण होऊ शकत नाही,कारण हे पीक खूप कमी लोक घेतात.

या मिरचीत व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते आणि काही प्रमाणात व्हिटॅमिन के आणि काही प्रमाणात व्हिटॅमिन बी. प्रदेशात या मिरचीचे लोणचे खाल्ले जाते.आपल्या देशातसुध्दा आपण जर पिझ्झा खायला गेलो तर त्यावर य मिरचीचा उपयोग भरपूर प्रमाणात केलेला आढळून येतो. तिसरे आणि शेवटचे पीक आहे ड्रमस्टीक्स. ड्रमस्टीक्स म्हणजे शेवगा. हा आपल्या सर्वांना जवळून माहिती असलेल्या भाज्यांचा एक प्रकार आहे.

आपल्याकडे या ची पातळ भाजी करून खाल्ले जाते.शेवगा हा हेल्थसाठी अतिशय चांगला असतो.यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते आणि काही प्रमाणात कॅल्शियम आढळून येते आणि आयनसुद्धा आढळून येतो.शेवगा हा परदेशात सुप बनवण्यासाठी तसेच काही ठिकाणी कुठली करी तयार करण्यासाठी बेसिक म्हणून वापरला जातो.शेवग्याच्या बिया आणि फुले यांना सुद्धा काही प्रमाणात मागणी असते.हे होते तीन असे भाजीचे प्रकार जे तुम्ही आवर्जून घेऊ शकता आणि हो खूप पैसा मिळवून देणारे आहेत. तुम्ही नेट वर जाऊन याचा खोलवर अभ्यास करू शकता. आणि एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीचा कॉन्टॅक्ट करून याबद्दल अधिक मार्गदर्शन मिळवु शकता.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.