अवघ्या 8 वर्षात सव्वा 20 कोटींची उलाढाल करणारा ‘गूळ’वंत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील अनिकेत खालकर !!

अर्थकारण लोकप्रिय शेती

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरू करून कोटी रुपये कमवणारा व्यावसायिक अनिकेत खालकर. आपल्याला वाटत असेल हा आपल्या देशातलाच आहे ना ? आपल्या भारतासारख्या शेतीप्रधान देशात एवढ्या कमी वयात एवढा व्यवसाय उभा करणे सोप्पे नाही. पण हे करून दाखवल आहे अनिकेतने. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील अनिकेत खालकर याने शेतीच्या मदतीने हा व्यवसाय सुरू केला.

आणि फक्त तीन वर्षात तो भरभराटीला देखील आला. आंबेगाव मधील अनिकेत खालकर, सिव्हिल इंजिनीअरिंग च्या प्रथम वर्षात शिकत होता, त्यात च पुढे करिअर करायच असा त्याचा विचार होता, परंतु जेव्हा त्याला कळले, एकाच परवन्यावर अनेक ठेकेदार काम करतात. तेव्हा मात्र त्याला काहीच कळेनासे झाले, आपण सिव्हिल इंजिनिअर झालो तर आपलं पण असच होईल अशी भीती त्याला वाटू लागली.

आणि त्याने इंजिनीअरिंग सोडून स्वतः चा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात उसाच उत्पादन होत होतं. म्हणून त्यांनी गुऱ्हाळ चालू करण्याचं ठरवल. त्यासाठी साधारणतः दहा लाख रुपये खर्च लागेल असे अनिकेत ला वाटत होते, परंतु जेव्हा प्रत्यक्ष पणे त्यांनी हे गुऱ्हाळ चालु केले तेव्हा हा खर्च 45 लाख रुपयांवर पोचला. त्यामुळे अर्थातच घरच्यांचा थोडा विरोध होता, तुला काय करायचं ते कर अस म्हणून त्यांनी त्याच्या कडे लक्ष दिलं नाही, पण अनिकेत ने जिद्द सोडली नाही.

त्याने ठाम पणे सर्व करण्याचा निर्णय घेतला, मशीन घेण्यासाठी त्याला मुजफ्फरनगर ला जावं लागलं, तिथे एक महिना राहावं लागलं, अनिकेत लहान असल्या मुळे, लोकांची त्याच्याकडे बघण्याची मानसिकता ही वेगळी होती, हा काय लहान आहे याला काय कळतंय, काहीही माथी मारलं तरी चालेल, अस लोकांना वाटत होतं, परंतु अनिकेत या सर्व बाबी जाणून होता. अनिकेत ने स्वतः च डिझाईन दिल आणि त्याप्रमाणे मशीन बनवून घेतलं.

पहिल्या वर्षी मात्र अनिकेतला तोटा सहन करावा लागला, कोल्हापूर ला जाऊन त्याने व्यवसायाची माहिती घेतली होती, परंतु त्याला चोथा व्यवस्थापन बद्दल लक्षात आलं नाही आणि त्याला पावसाळ्यात दीड लाख रुपयांचा चोथा विकत घ्यावा लागला. नंतर अनिकेत ने मशीन ला जाळी लावून घेतली, आता त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात चोथा शिल्लक राहतो. सुरुवातीला शेतकऱ्यांचा विश्वास जिंकणं हे देखील एक मोठं काम होत.

सध्या अनिकेत कडे दीडशे शेतकरी सभासद आहेत तर जवळपास दोनशे शेतकरी अनिकेत कडून ऑर्डर मिळण्याची वाट पाहत आहे. ऊस घेतल्यावर पंधरा दिवसात अनिकेत कडून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळतात, भाव पण चांगला मिळतो, त्यामुळे बरेच शेतकरी अनिकेत कडे वळले आहेत. इथे बनवलेला गूळ हा बाहेर निर्यात करण्यात येतो, मोठं मोठे मॉल, दुकाने, ग्राहक पेठ अशा अनेक ठिकाणी हा गुळ पाठवला जातो.

एवढंच नव्हे ते दुबई, लंडन, अमेरिका सारख्या ठिकाणी देखील या गुळाला मागणी आहे. गुळाची चव पाहून ग्राहकांची मागणी देखील वाढत आहे कारण इथे फक्त 86032 या जातीचाच गूळ बनतो. एका मशीन मध्ये दोन टन पर्यंत ऊस टाकला जातो, त्याचा रस काढून तो गरम केला जातो, त्यावरची मळी काढली जाते, आणि तो रस आटवला जातो, गुळाला नैसर्गिक आणि उत्तम रंग येण्यासाठी त्याला छान एकजीव केल्या जात. त्यापासून जवळपास 260 टन गूळ बनतो. आणि नंतर तो आवश्यकेतेनुसार पॅक करून निर्यात करण्यात येतो.

अनिकेत ने त्यावर पॅकिंग करण्यासाठी खास 19 मायक्रोन च प्लास्टिक गुजरात वरून मागवलं. या प्लास्टिक पिशवी मध्ये हा गूळ भरून त्याला लॅमीनेशन केलं जातं. यामुळे गुळाच पॅकिंग चकचकीत दिसत. त्यामुळे ग्राहक त्याकडे आकर्षित होतात. अनिकेत ने चालू केलेल्या गुऱ्हाळाची क्षमता ही साठ ते सत्तर टनाची आहे, आणि  ही आणखी तीन टन वाढवण्याचा अनिकेत चा विचार आहे. आज अनिकेत चा व्यवसाय हा तीन कोटींवर पोचला आहे. अनिकेत ची धडाडी आणि जिद्द याचा आज त्याच्या घरच्यांना देखील अभिमान वाटतो.