हक्कसोडपत्र म्हणजे काय, ते कश्या पद्धतीने केल जाते, त्याच्या अटी, नियम आणि शर्ती काय आहेत? हक्कसोड करत असतांना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

अर्थकारण शेती शैक्षणिक

मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की हक्कसोडपत्र म्हणजे काय, ते कश्या पद्धतीने केल जाते, त्याच्या अटी, नियम आणि शर्ती काय आहेत? हक्कसोड करत असतांना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या ! मित्रांनो आपण बघुया

हक्कसोडपत्र म्हणजे काय?: हक्कसोडपत्र म्हणजे एकत्र कुटुंबातील कोणत्याही सदस्याने सहिस्सेदाराने, त्याच्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीवरील, स्वतःच्या हिस्साच्या वैयक्तिक हक्क, त्याच एकत्र कुटुंबाच्या सदस्याचे किंवा सहदायककाच्या लाभात, स्वेच्छेने आणि कायमस्वरूपी सोडून दिल्याबाबत नोंदणीकृत दस्त.

म्हणजेच मित्रांनो, जे आपल्या घरातील वडील असतिल, भाऊ,बहीण, आत्या किंवा चुलती जी काही नातेवाईक येतात ज्यांना आपण रक्ताचे नातेवाईक म्हणतो, यांनी त्यांचा हिस्सा, जी काही जमीन- जागा असेल ते सोडायला हक्कसोड म्हटले जाते आणि सरकारी कागदपत्रां नुसार त्याला सोडायलाच हक्कसोडपत्र म्हटले जाते.

हक्कसोडपत्र कुणाला करता येते?: एकत्र कुटुंबाचा कोणत्याही स्त्री अथवा पुरुष सदस्य, सहिस्सेदार हक्कसोड करू शकतो. म्हणजे एकाच कुटुंबातील सदस्य तेच फक्त किंवा जमिनीत जे कुणी सहिस्सेदार किंवा वारस असेल तोच फक्त हक्कसोड करू शकतो. हक्कसोडपत्र कोणत्या मिळकतीचे करता येते?: फक्त वारसाहक्काने मिळालेल्या किंवा मिळू शकणार्‍या एकत्र कुटुंबातील मिळकतींतील स्वतः च्या हिस्साच्या मिळकतीपुरते हक्कसोडपत्र करता येत.

म्हणजेच मित्रांनो, वारसा हक्काने जी काही मालमत्ता चालत आलेली असते, त्यावरतीच फक्त हे हक्कसोडपत्र करता येत, तेही फक्त रक्ताचे नातेवाईक किंवा मालमत्तेच्या फक्त वारसाला यांनाच फक्त हे करता येत. आता आपण बघू, हक्कसोडपत्र कोणाच्या लाभात करता येत म्हणजेच याचा लाभ कुणाला घेता येतो जर कुणी करत असेल तर?: फक्त त्याच एकत्र कुटुंबाच्या स्त्री अथवा पुरुष सदस्य, सहिस्सेदार यांच्या लाभात हक्कसोड करू शकतो/ करता येत.

त्या एकत्र कुटुंबाचे सदस्य किंवा सहिस्सेदार नसलेल्या व्यक्तीच्या लाभात झालेल्या दस्त हक्कसोडपत्र होत नाही, म्हणजेच मित्रानो जर एखाद्या कुटुंबाचा सदस्य नसलेली ती व्यक्ति असेल, पण तो त्या जमिनीची / मालमत्तेची सहिस्सेदार असेल किंवा तो त्या जमिनीचा वारस असेल नाही.

तर इतर काही रित्या जमिनीचा मालकी हक्क सांगू शकत असेल तर तो हक्कसोडपत्र करत असतांनाच त्यांनी मुंबई मुद्रांक कायदा 1958 मधील तरतुदीनुसार मूल्यांकनास म्हणजे मुद्रांक शुल्क ज्याला म्हणतात त्यानुसार तो हक्कसोड करू शकतो पण त्याला त्यावरची मुद्रांक शुल्क भरावे लागेल.

आता जे काही हक्कसोडपत्राचा मोबदला कसा देता येतो ते बघूया: सर्वसाधारणपणे हक्कसोडपत्र विना मोबदला केल्या जाते परंतु हक्कसोड हे मोबदल्यासह सुद्धा केले जाऊ शकते, म्हणजे मित्रांनो आपली जी काही मालमत्ता असेल, जमीन असेल, घर असेल किंवा इतर जी काही मालमत्ता असेल तर ती हक्कसोड करत असताना कायद्यामध्ये अशी तरतुदी आहेत की तुम्ही हक्कसोड करत असताना ते विना मोबदला ना करावे,

असाही कुठला बंधन नाही की तुम्ही तुमचा हक्क सोडत असताना त्यामधील काही हिस्सा किंवा पैसे आपण घेऊ शकत नाही, अश्या प्रकारची कुठलीही नोंद तिथे नाहिये, त्यामुळे आर्थिक व्यवहाराने तुम्ही तुमचा हक्कसोड करू शकता. मित्रांनो मोबदला सह असणारे हक्कसोडपत्र त्याच एकत्र कुटुंबातील सदस्य किंवा सहिस्सेदार यांच्या लाभात असणे त्यावर मुद्रांक शुल्क आकारले जात नाही. फक्त हक्कसोडपत्रा साठीचे शुल्क आकारले जातील.

हक्कसोडपत्र नोंदणीकृत असावे काय? होय, हक्कसोडपत्र नोंदणीकृत आणि लेखी असणे आवश्यक आहे नाही तर त्याची नोंद सरकारी दप्तरात होणार नाही. हक्कसोडपत्र कसे करावे?: एकत्र कुटुंबातील मिळकतीवर हक्क सोडणारा आणि तो हक्क ग्रहण करणारा यांना स्वतंत्रपणे अथवा सर्व सदस्यांना संयुक्तपणे, त्याच एकत्र कुटुंबातील एकाच्या किंवा एकापेक्षा जास्त सदस्यांच्या लाभात हक्कसोडपत्राचा दस्त करता येते. असा दस्त रक्कम साधारणतः रु.200 च्या मुद्रांक पत्रावर लेखी असावा.

हक्कसोडपत्राच्या दस्त मध्ये काय नमूद असाव्यात?: हक्कसोडपत्र लिहून देणार यांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतची तपशील. एकत्र कुटुंबातील सर्व शाखांची वंशावळ. एकत्र कुटुंबाची मिळकतीचे हिस्सा निहाय विवरण. दोन निष्पक्ष आणि लायक साक्षीदारांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतची तपशील व स्वाक्षरी. दास्ताचे अधिकृतरीत्या नोंदणी.

हक्कसोडपत्राची मुदत: हक्कसोडपत्र कधीही करता येते, त्यात मुदतीची बंधन नाही. हक्कसोडपत्रासाठी 7/12 अथवा मिळकत पत्रिकेवर कुटुंबाच्या सदस्याचे नाव दाखल असण्याची आवश्यकता नसते. फक्त तो एकत्र कुटुंबातील सदस्य असल्याचे सिद्ध करण्याइतपत पुरावा असावा.

सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती हीसध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “हक्कसोडपत्र म्हणजे काय, ते कश्या पद्धतीने केल जाते, त्याच्या अटी, नियम आणि शर्ती काय आहेत? हक्कसोड करत असतांना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

  1. हक्कसोड पत्ताचा नमुना भेटेल का

Comments are closed.