ओबडधोबड कातळांच्या मागे लपलेला वैभवशाली साम्राज्याचा इतिहास : हंपी

प्रवास

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

संपूर्ण जगाला भुरळ घालणारी लेणी – हंपी बदामी भारतामध्ये एखाद्याला जर कुठे ऐतिहासिक शहरात फिरायला जायचं असेल त्यांच्या यादीत उत्तर कर्नाटकातील हंपी हे शहर नक्कीच असते. डोळ्यांचे पारणे फेडणारे हे विजयनगर साम्राज्यातील एक महत्वाचे शहर.

उमेदीच्या काळात श्रीमंतीने, सौंदर्याने आणि संपत्तीने ठासून भरलेल्या या शहरात कित्येक राजांनी हंपी वर आक्रमण केले आणि तेथील संपत्ती लुटून नेली. दक्षिण भारतातील विजयनगर म्हणजेच विजयाची नगरी इ.स. १३६५ ते १५६५ हा काळ बलाढ्य हिंदू साम्राज्याचे राजा कृष्णदेवराय सम्राट असताना विजयनगर साम्राज्याचा सुवर्णकाळ होता. याच काळात हंपीची या शहराची पायाभरणी सुरु झाली आणि जगातील सुंदर शहरांपैकी एक शहर निर्माण झाले.

Hampi - Wikipedia

 

पण पोर्तुगीज, बहामनी राज्य यांच्या आक्रमणात विजयनगर हंपी चा पराभव झाला आणि तिथपासून हंपी ची उतरती कळा सुरु झाली आणि बहमनींनी हंपी लुटायला सुरु केले. तब्बल तीन महिने या शहराची लूट चालू होती. तेथील राजवाडे आणि इतर वास्तू अक्षरशः आगीने जाळून खाक केल्या गेल्या तरी आजही शिल्लक राहिलेल्या वास्तू दिमाखात उभ्या आहेत. हंपीचे सौंदर्य अजूनही तिथल्या सुंदर शिलांमधून आणि वस्तूंमध्ये टिकून आहे.

तर आताच्या काळात हे शहर तेथील दगडांच्या विशिष्ट ठेवणी आणि सुंदर अशा तर्हेने कोरलेल्या मुर्त्या आणि मंदिरे हि या हंपी शहराची खासियत आहे. शहराच्या सानिध्यात राहणाऱ्या माणसांसाठी हंपी या शहरात जाणे म्हणजे एक स्वर्गसुख आहे असे म्हणल्यास हरकत नाही. पर्यटनासाठी उत्तम असलेले उत्तर कर्नाटकात वसलेलं हंपी हे शहर कोल्हापूर पासून ३७० किलोमीटर आणि बंगळुरू पासून ३४० किलोमीटर आहे. ४० ते ५० किलोमीटर मध्ये वसलेले हे शहरातील भग्नावस्थेत पडलेल्या पण सुंदर अशा विविध वास्तू पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येथे दरवर्षी गर्दी करतात.

हंपी शहरामध्ये वसलेले विरुपाक्ष मंदिर आठ व्या शतकापासून ते सोळा व्या शतकापर्यंत साम्राज्याचे मुख्य केंद्रस्थान होते. साम्राज्याचा उदय आणि असत हा विरुपाक्ष मंदिराच्या साक्षीने च झाला. राज्य जळून खाक झाले पण मंदिर अजूनही तसेच डौलात उभे आहे. आपण आता शहराबद्दल जाणून घेऊया… हंपी या शहरात शिरण्याचा मुख्य रस्त्यावर अंदाजे नव्वद फूट उंचीच्या दोन शिळांची एक नैसर्गिक कमान तयार झालेली आहे.

All About Hampi | What to do in Hampi - Xplore The Earth

 

तिचे दगड म्हणजे दोन बहिणी हंपी राज्याचे संरक्षण करीत आहेत अशी दंतकथा सर्वांना सांगण्यात येतात. तसे पाहता हंपी चा संपूर्ण परिसर हा वेगवेगळ्या शिळांनीच तयार झालेला प्रतीत होतो. हंपीमधील विठ्ठल मंदिराची जगातील महान शिल्पामध्ये गणना केली जाते. विठ्ठल म्हणजे मराठी लोकांच्या मनात घर करून बसलेलं कुलदैवत. मंदिराच्या मुख्य अजश्र चौथऱ्यावर हे मंदिर उभे आहे. त्याला मुख्य तीन दरवाजे व देवघरात सुंदर विठ्ठलाची मूर्ती आहे.

तेथील हेमकुटा टेकडीवर पिरॅमिड च्या आकाराच्या कळसाची सुंदर अशी जैन मंदिरे आहेत. तेथे हिंदू देवदेवतांच्या मूर्ती, जैन साधूंचे पुतळे, हत्ती, सिंह विविध प्राण्यांच्या आकारांचे केले कोरीव काम संमिश्र संस्कृतीचे दर्शन देते. पुढे दोन उंच कमानीच्या आकाराच्या कोरीव अशा सुंदर तुला आजही उभ्या आहेत. याठिकाणी राजाची सोने मानकांनी तुला होत असे व ते सर्व दान केले जाई.

art&technology: Indian Digital Heritage | Digital Hampi Project | ASEF culture360

 

विजयनगर साम्राज्याचे काही अवशेष ही हंपीमध्ये आजही पाहायला मिळतात. येथे चौदाव्या शतकात तयार करण्यात आलेली शिल्पे त्यावरील बारीक नक्षीकाम आणि कोरिवकामासाठी प्रसिद्ध आहेत. या कोरीवकामामधून त्या काळात घडलेल्या विविध घटना आपल्या समोर मांडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सुंदर राण्या, पराभूत राजे, जमिनीला कसणारे शेतकरी, पुरुष, आणि स्त्रिया, त्यांचे प्रेम, देवदासी यांसारख्या अनेक गोष्टी ही शिल्पे आपसूक सांगून जातात.

तेथील सोळाव्या शतकात बांधण्यात आलेले विथला मंदिर, कोरीव आणि नक्षीदार खांबावर उभा असलेला सभामंडप व दगडाचा रथ आपल्याला पाहायला मिळतो. सभामंडपातील ग्रॅनाईट च्या खांबावर भरपूर शिल्पे त्या काळी रेखाटलेली आहेत आणि ती अजूनही तशीच टिकून आहेत हे नवलच. तेथील मुख्य आकर्षण आहेत ते तेथे असलेले सांगीतिक खांब ज्यावर टकटक केल्यास आपल्याला संगीत ऐकू येते.

Hampi Temples: A 2022 Guide To This Spiritually Rich City Of Karnataka!

 

विजयनगर चा राजा देवराय दुसरा याने पंधराव्या शतकात राम मंदिर बांधले होते. या मंदिरातील हजारो प्रकारचे कोरीवकाम आणि शिलालेखांवरील रामायणाची कहाणी प्रतीत करणारी चित्रे असल्यामुळे त्या मंदिराला हजारा राम मंदिर असे नाव देण्यात आले आहे. हंपी मधील सुंदर वास्तूंमधील ही मुख्य वास्तू आहे. विजयनगर साम्राज्यातील राणींवंशांसाठी राखीव असलेला कमळ महाल हा शहरातील अद्भुत येतो.

हे भव्य बांधकाम तेथील जनानखाण्याचा भाग आहे. आश्चर्य म्हणजे हंपी शहरामध्ये लुटीसाठी झालेल्या स्वाऱ्यांमध्ये ही वास्तू जसी च्या तशी तग धरून अजूनही उभी आहे. आजच्या काळात ४० ते ५० किलोमीटर च्या परिसरात भग्नावस्थेत उभे ठाकलेले महाल, दगडी कमानी, बाजाराचा मुख्य रस्ता, स्नानकुंडे, देवदेवतांच्या मूर्ती, टेकड्या, माळरान आणि टेकड्यांवरील शिळा पाहून मन भरून येते. हे पाहिल्या नंतर एका चित्रपटासारखं हंपीचा संपूर्ण इतिहास आपल्या डोळ्यासमोर आपसूक उभा राहतो.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.