ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र (सिनियर सिटीझन सर्टिफिकेट) घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने कसे काढायचे जाणून घ्या या लेखातून !

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

घरात तुमच्या जर 60 वर्षा पेक्षा जास्त वयाचे व्यक्ती असतील तर आजच त्यांच्या नावाने जेष्ठ नागरिक कार्ड म्हणजे (सिनियर सिटीजन )कार्ड किंवा प्रमाणपत्र काढून घ्या. सर्व प्रोसेस ऑनलाइन आहे त्यामुळे घरी राहून मोबाईल द्वारे देखील अर्ज करता येतो. तो कसा करायचा, सिनिअर सिटीजण कार्ड मुळे कोणते लाभ मिळतात? हे सर्व आपण जाणून घेणार आहोत.

जेष्ठ नागरिक कार्ड किंवा सिनियर सिटीजण कार्ड / प्रमाणपत्र म्हणजे काय त्याज्यासाठी क्रायटेरिया काय आहे? थोडक्यात सांगायचे झाले तर जेष्ठ नागरिकांना सरकारी विभाग, सार्वजनिक कंपनी, खाजगी किंवा व्यवस्थापना मार्फत दिल्या जाणाऱ्या सवलती, सेवा, तसेच प्राधान्य सेवांमध्ये ऍडमिशन, प्रवेश सुलभ करण्यासाठी वयाचा पुरावा म्हणून जेष्ठ नागरिक, किंवा सीनियर सिटीजन कार्ड वापरता येते.

60 वर्षापेक्षा अधिक वय असणारे लोक जे एकटे किंवा जोडीदार सोबत महाराष्ट्र राज्यातील रहिवासी आहे. त्यांना विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेला फॉर्म आवश्यक कागदपत्र आणि फोटो सहित या कार्डसाठी अर्ज करता येतो. सीनियर सिटीजन कार्ड चे लाभ कोणते? साठ वर्ष व साठ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना रेल्वेमध्ये प्रवासासाठी 30 टक्के सवलत मिळते. त्याचप्रमाणे तिकीट किंवा रिझर्वेशन साठी ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी रांग असते.

महाराष्ट्र राज्य परिवहन म्हणजे एस्टी मध्ये प्रवास करण्यासाठी 65 वर्षे वय किंवा त्याहून अधिक वयाचे लोकांना तिकिट मध्ये 50 टक्के सवलत. हवाई म्हणजे विमानाच्या प्रवासासाठी 65 वर्षे किंवा अधिक वयाच्या व्यक्तींना प्रवासाच्या मूलभूत भाड्यावर 50 टक्के सवलत मिळते. अनेक खाजगी हॉस्पिटल्समध्ये कमीत कमी साठ वर्षे असणाऱ्या व्यक्तींना 30 टक्के सवलत दिली जाते.

आणि जर व्यक्ती 60 किंवा त्याहून अधिक वयाची असेल तर सरकारी हॉस्पिटल मध्ये त्यांचा मोफत उपचार केला जातो. बँकिंग क्षेत्रात याचा लाभ मिळतो. म्हणजे खातेदारकाचे वय 60 वर्षे असेल तर बँकेमार्फत 0.5% इंटरेस्ट इतके अतिरिक्त व्याज मिळते. हायकोर्ट किंवा उच्च न्यायालय मध्ये 65 वर्ष असणाऱ्या व्यक्तीच्या सुनावणीसाठी प्राधान्य दिले जाते.

65 किंवा त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र व्यवसायिक करांमध्ये सूट असते. त्यांना कोणताही कर भरावा लागत नाही. तसेच महानगर टेलिफोन निगम लिमिटेड एमटीएनएल मध्येसुद्धा 65 वर्षीय असणाऱ्या नागरिकांना 25 टक्के सवलत मिळते. सर्व जेष्ठ नागरिकांना इन्कम टॅक्स आयकर विभाग सुद्धा सवलत दिली जाते जर वृद्धाश्रमात प्रवेश हवा असेल तर तो कमीत कमी खर्चात किंवा मोफत दिला जातो.

सीनियर सिटीजन कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदाता ओळख पत्र, म्हणजे तुमचा वोटर आयडी, अर्जदाराचा फोटो, निमशासकीय ओळखपत्र, आरएसबीवाय कार्ड, रोल युवर जॉब कार्ड, आणि ड्रायव्हिंग लायसन्स, यापैकी एक.

ऍड्रेस प्रूफ किंवा पत्याचा पुरावा म्हणून पासपोर्ट, लाईट बिल, भाडे पावती, शिधापत्रिका, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, मालमत्ता कर पावती, म्हणजे घरपट्टी, मतदार यादीचा उतारा, मालमत्ता नोंदणी उतारा, सातबारा आणि आठ(अ) चा उतारा, किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, यापैकी एक. एज प्रूफ वयाच्या पुराव्यासाठी, जन्माचा दाखला,

बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, प्राथमिक शाळेचे प्रवेशाचा उतारा, सेवा पुस्तिका, यापैकी कमीत कमी एक दस्तऐवज रहिवासी पुरावा म्हणून रहिवासी असल्याबाबत ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला, किंवा रहिवासी असल्याबाबत कलेक्टर यांनी दिलेला दाखला, यापैकी कोणताही एक.

आणि त्यासोबत स्वघोषणा पत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन. ऑनलाईन अर्ज कुठे आणि कसा करावा? यासाठी महाराष्ट्र शासनाची “आपले सरकर” (Aaple sarkar) ही अधिकृत वेबसाईट आहे. याची लिंक तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल. वेबसाइट यूजर फ्रेंडली असल्याने तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा व्यवस्थित चालते. किंवा आपले सरकार या नावाने मोबाईल ॲप प्ले स्टोअर मध्ये सुद्धा मिळेल.

आता वेबसाईट अथवा ॲप वर सर्व प्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल. जे पूर्णपणे फ्री आहे. त्यासाठी “नवीन युजर येथे नोंदणी करा” या बटन वर क्लिक करून दिलेल्या सूचनांचे पालन करून अकाऊंट तयार करा. लक्षात असू द्या फक्त साठ वर्ष किंवा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींना आपले सरकार पोर्टल वर स्वतःच्या अकाउंट तयार करून सीनियर सिटीजन कार्ड किंवा प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येईल.

इतर कमी वयाच्या व्यक्तीच्या अकाउंट वरून प्रयत्न केला तर तुम्हाला एक मेसेज डिस्प्ले होईल. आता तयार केलेला युजर आयडी आणि पासवर्डने वेबसाईट वर लॉगिन केल्यानंतर वेब पेजच्या डाव्या बाजूला सर्व विभागांची लिस्ट आहे. त्यातून “महसूल विभाग” निवडा. त्यांनतर उपविभाग यांमध्ये “महसूल सेवा” सिलेक्ट करून “पुढे जा” या बटणावर क्लिक करा. विभागांतर्गत सर्व सेवा उपलब्ध आहेत त्यांची नावे डिस्प्ले होतील. त्यातून “ज्येष्ठ नागरीक प्रमाणपत्र” या ऑप्शनवर क्लिक करा.

आणि पुन्हा “पुढे जा” हे बटन क्लिक करा. आलेल्या पेजवर परत “ज्येष्ठ नागरीक प्रमाणपत्र” यावर क्लिक करा. पुढच्‍या पेजवर आधी बघितल्याप्रमाणे आवश्यक सर्व कागदपत्रांची माहिती डिस्प्ले केली जाईल. त्यापैकी प्रत्येक कागदपत्र तुमच्याकडे उपलब्ध असल्याची खात्री करा, आणि “पुढे जा” हे बटन क्लिक करा. तीन स्टेजमध्ये या ठिकाणी अर्ज भरायचा आहे.

अर्जदाराचा वैयक्तिक तपशील म्हणजे सर्व विचारलेली पर्सनल माहिती. नंतर आवश्यक कागदपत्र अपलोड करणे. आणि शेवटी सेवाशुल्क म्हणजे चार्जेस भरणे. वैयक्तिक माहिती भरतांना संबोधन मध्ये श्री किंवा श्रीमती इत्यादी सिलेक्ट करा. अर्जदाराचे नाव आधीपासूनच फॉर्म वर उपलब्ध असेल. त्यानंतर वडिलांचे संपूर्ण नाव इंग्रजी मध्ये टाईप करा तेच नाव मराठीमध्ये आपोआप या विंडोमध्ये केले जाईल.

त्या खाली जन्मतारीख, मोबाईल नंबर, जेंडर, ईमेल आयडी असेल तर तो याठिकाणी एंटर करा. त्यानंतर तुमचा जो व्यवसाय असेल तो निवडून त्या शेजारी तुमचा आधार नंबर एंटर करा. आता त्याखाली असलेला “आय ॲग्री” या बॉक्सवर क्लिक करा. ज्यामुळे महसूल विभागाला तुमचा आधार नंबर व्हेरिफाय करता येईल. नंतरच्या सेक्शनमध्ये तुमचा संपूर्ण पत्ता एंटर करा. सोबत गाव, तालुका, जिल्हा, आणि पिनकोड भरा.

त्यानंतर वैद्यकीय तपशील मध्ये तुमचा ब्लड ग्रुप कोणता आहे तो सिलेक्ट करा. इमर्जन्सी मध्ये कोणाला कॉन्टॅक्ट करावा त्या व्यक्तीचे पूर्ण नाव, आणि मोबाईल नंबर या सेक्शनमध्ये इंटर करून “समावेश करा” हे बटन क्लिक करा. आता अर्ज जमा झाला आहे आणि त्यासाठीचा अर्ज क्रमांक स्क्रीनवर डिस्प्ले केला जाईल, यावर “ओके” क्लिक करा.

दुसऱ्या स्लीपमध्ये सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत. जे कागदपत्र अपलोड करायचे आहे त्याची साईज आणि फॉरमॅट याबद्दल डिटेल्स इथे प्रत्येक कागदपत्र सोबत दिलेली आहे. जसे अर्जदाराच्या फोटोची साईज 160*212 पिक्सेल असले पाहिजे. ते कसे करायचे याची तुम्हाला कल्पना नसेल तर वेबसाईट वरच फोटो योग्य साईज मधे क्रॉप करण्याची सोय सुद्धा आहे. त्यासाठी या ठिकाणी “क्लिक हीअर टु क्रॉप फोटो” त्यावर क्लिक करून सर्व सूचना फॉलो करा. आता फोटो अटॅच करण्यासाठी “चुस फाईल” या बटन वर क्लिक करा व फोटो सिलेक्ट करा.

तसेच ओळखीचा पुरावा म्हणून यापैकी जे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे त्यावर क्लिक करा. या सूचनांप्रमाणे बनवलेले डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आता “अपलोड फाईल” ऑप्शन सिलेक्ट करुन ती फाईल निवडा. इथे तुम्ही बघू शकता अशाप्रकारे तुमची फाईल फॉर्म सोबत जोडली जाईल. आणि याच प्रकारे पत्त्याचा पुरावा, वयाचा पुरावा, आणि रहिवासी पुरावा सोडून द्यावा. आणि शेवटी स्वघोषणापत्र जोडून घ्या ते आधी तिथे असलेल्या बटणावर क्लिक करून प्रिंट करा. संपूर्ण माहिती भरून त्याचा फोटो काढून अथवा स्कॅन करून या ठिकाणी इतर डॉक्युमेंट प्रमाणे जोडून घ्या.

आवश्यक कागदपत्र जोडल्यानंतर “अपलोड डॉक्युमेंट्स” बटन वर क्लिक करा. सर्व डॉक्युमेंट अपलोड झाले आहेत. आता या सेवेसाठी शुल्क म्हणजे चार्जेस भरावे लागतील त्यासाठी येथे “ओके” क्लिक करा. नेक्स्ट पेज वर तुमचे नाव, अर्ज क्रमांक आणि एकूण भरावी लागणारी रक्कम दिसेल. जी सर्व टॅक्सेक्स किंवा सेवा कर मिळून फक्त ते 30 रुपये 60 पैसे इतकी आहे. पुढे जाण्यासाठी “पुष्टी करा” या बटन वर क्लिक करा. पेमेंट करण्यासाठी अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत. त्यापैकी एक पेमेंट ऑप्शन निवडा. त्यासाठी लागणारे अतिरिक्त शुल्क किंवा (Connivence fees) किती असेल याची माहितीसुद्धा डिस्प्ले केली जाईल.

जसे की जर, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड निवडले. आता उजव्या बाजूच्या बटणावर क्लिक करा. पुढे पेमेंट संबंधित सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल. तिथे “प्रोसेस फोर पेमेंट” यावर क्लिक करा. नेक्स्ट स्क्रीन वर जे कार्ड वापरत असाल ते निवडा. आणि सर्व आवश्यक माहीती भरून “मेक पेमेंट” यावर क्लिक करा. त्यांनतर एक बॉक्स डिस्प्ले होईल यावर “प्रोसिड फॉर पेमेंट” यावर क्लिक करा.

डेबिट कार्ड सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी या ठिकाणी इंटर करून “सबमिट” बटन क्लिक करा. पेमेंट सक्सेसफुल. अशाप्रकारे तुमचा सीनियर सिटीजन प्रमाणपत्रासाठी अर्ज जमा झाला असून प्रमाणपत्र याच वेबसाईटवर सात दिवसांमध्ये तुम्हाला डाऊनलोड करता येईल. यासाठी वेबसाईटचा मेन पेज वर “तुमच्या अर्जांचा आढावा” सेक्शन मध्ये सर्व डिटेल्स बघायला मिळतील. अर्ज रिजेक्ट झाला तर नाकारण्याची स्थिती आणि कारण इथे दाखवले जाईल. किंवा प्रमाणपत्र उपलब्ध होतात ते इथे डाऊनलोड करता येईल.

सेवा प्राप्त होण्यासाठी लागणारा कमाल कालावधी सात दिवसांमध्ये असे इथे नमूद आहे. तर अर्जाची स्थिती काही दिवसात कळेलच. त्यासोबत हा अर्ज सांगितलेल्या वेळेत पूर्ण होतो का किंवा अर्ज रीजेक्ट झाल्यानंतर काय करावे लागेल, प्रमाणपत्र आपले सरकार वेबसाईट वरून डाऊनलोड होते का? याची माहिती तुम्हाला उपलब्ध असेल.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.