स्टॉक बाय बॅक करणे म्हणजे काय? शेअर होल्डर साठी ह्याचे काय महत्व आहे ? जाणून घ्या या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

स्टॉक बाय बॅक करणे म्हणजे काय? : कंपनी आपले शेअर पुन्हा आपणच विकत घेते याला बाय बॅक करणे म्हणतात. त्याच्या मागे अनेक कारणे आहेत याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. सर्वात पहिला प्रश्न, कंपनी बाय बॅक का करते? आणि त्याचा कंपनीला काय फायदा होतो आणि आपल्याला काय फायदा होतो? सर्वात पहिल्यांदा आपण पाहू, कंपनी स्टॉक बाय बॅक त्यांच्या फायद्यासाठी का करते? जेव्हा स्टॉक अंडर व्हॅलुड असतो.

म्हणजे काय समजा एखाद्या शेअरची किंमत तीनशे रुपये आहे. आणि जेव्हा त्याची किंमत पुन्हा कमी होऊन दोनशे रुपये वर येते, अडिचशे रुपये वर येते. त्याला म्हणतात अंडर व्हॅलुड होण. शेअरची किंमत कमी होणं. जेव्हा शेअरची किंमत कमी होईल तेव्हा ते स्टॉक पुन्हा कंपनी बायबॅक करते. ज्यामुळे काय होतं कधी न कधी त्याची किंमत वाढणार आहे. आणि कमी झालेली किंमत पुन्हा वाढल्यानंतर कंपनीचा खूप मोठा फायदा होतो.

ज्यामुळे कंपनी त्या स्टॉक ला बाय बॅक करते. दुसरं कारण आहे जे शेअर होल्डर आहे, तुमच्या सारखे आमच्यासारखे ज्या लोकांनी शेअरची खरेदी केली आहे त्या लोकांना शेअर होल्डर्स म्हटलं जातं. जेव्हा शेअरची किंमत कमी होते त्यावेळी त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो. तुम्ही बघितला असेल त्यावेळी एखाद्या शेअरची घसरण होत असते किंमत कमी होत असते.

तेव्हा अनेक लोक ते शेअर्स विकू लागतात. ज्याची पोझिशन आहे, तेच स्क्वेअर ऑफ करू लागतात. मग त्यामुळे थोडं लॉस असेल किंवा मोठं लॉस असेल. कारण प्रत्येकाला माहीत असते जेव्हा शेअरची किंमत कमी होऊ लागली, की ती कमी होत जाते. एक मोठा डाऊन फॉल दिसू लागतो. म्हणून काय होतं मॅक्सीमम लोक बुकिंग करू लागतात. किंवा लॉस मध्ये असेल तरी लोक सुद्धा बुक करतात.

मग या केस मध्ये काय होतं, जेव्हा कंपनी आपले शहर पुन्हा बाय बॅक करते. याचा अर्थ आपलं मोरल इंक्रीस होतं. जे स्टॉक होल्डर आहेत त्यांना वाटतं कंपनी स्वतः स्टॉक बाय बॅक करते. याचा अर्थ कंपनीला जे काही लॉसेस होत आहेत कंपनी ज्या नेगेटिव्ह फेज मधून पुढे जात आहे, ति फेज कधी ना कधी जाणार आहे.

आपल्याला या परिस्थितीला घाबरून स्क्वेअर ऑफ करण्याची काहीच गरज नाही. म्हणून वेगवेगळे स्टॉक होल्डर पुन्हा ते स्टॉक होल्ड करतात. पोझिशन स्क्वेअर ऑफ करत नाही. जेव्हा ही न्यूज येते की कंपनी स्टॉक बाय बॅक करत आहे त्यावेळी अनेक स्टॉकहोल्डर त्या स्टॉक ना होल्ड करतात. कारण त्यांना माहिती असतं पुन्हा चांगले दिवस येणार प्राईज वरच्या दिशेने जाणार.

यामध्ये तिसरं महत्त्वाचं कारण असतं प्रमोटर्स ना आपले स्टॉक वाढवायचे असतात. त्यामुळे ते पुन्हा बाय बॅक करतात. यामुळे त्यांचा मालकीहक्क वाढतो. म्हणजेच काय जर ते त्या कंपनीचे 70 टक्के भागीदार असतील 75 टक्के असतील 80 टक्के असतील तर त्यांची भागिदारी अजून वाढत जाते. कारण त्यांच्याकडे तेवढी शेअर सुद्धा वाढतात.

म्हणजेच काय होतं जर त्यांच्याकडे शेअर होल्डिंग वाढत जाईल तेवढे त्यांचे प्रॉफिट सुद्धा वाढत जातं. तुम्हाला माहिती असेल जेव्हा कंपनीला प्रॉफिट होतं तेव्हा डीव्हीडेंट च्या स्वरूपात शेअर च्या स्वरूपात तुम्हाला मिळतं. जे काही शेअरहोल्डर आहेत ते कंपनीचे मालक असतात. जेवढे शेअर जास्त तेवढा मालकीहक्क जास्त. आणि जेवढे शेअर होल्डिंग जास्त तेवढा प्रॉफिटचा हिस्सा सुद्धा जास्त वाढत जातो.

चौथं आणि खूप महत्त्वाचं कारण जेव्हा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असते तेव्हा मी तुम्हाला सांगतो की पी इ रेशिओ चेक करायला हवा. हा जर जास्त असेल तर शेअर मार्केट महागडा आहे. जर कमी असेल तर शेअर मार्केट स्वस्त आहे. किंवा मॉडरेट आहे असे आपण म्हणू शकतो. पण या केस मध्ये काय होतं पी इ रेशिओ असेल, आर ओ इ असेल किंवा आर ओ आय असेल सर्वकाही मॅनेज करण्यासाठी हे स्टॉक बायबॅक केले जातात.

जेव्हा कंपनी शेअर्स पुन्हा बाय बॅक करते शेअर बायबॅक करण्याला एक डिव्हिडंड देण्याच्या स्वरूपात सुद्धा मानलं जातं. त्यामुळे काय होतं? यामुळे टॅक्स बेनिफिट मिळतो म्हणजेच काय? समजा एक कोटी 50 लाखाचे शेअर बायबॅक केले तसा पण उदाहरण पाहिलं होतं. या 15000000 रुपयावर टॅक्स द्यावा लागत नाही.

आता टॅक्स किती असतो? 20% 30% कंपनीला टॅक्स द्यावा लागतो. समजू शकता आपण खूप कमी अमाऊंट पाहतोय. एक कोटी 50 लाख. अशी हजार कोटी रुपयांचे बाय बॅक केले जातात. आता हजारो कोटी रुपयांच्या 25 टक्के, 30 टक्के किती होते? ते तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही. लाखो, हजारो कोटी रुपयांची बचत होऊ शकतात. म्हणून कंपनीने आपले शेअर बायबॅक करते. आता तुम्ही म्हणाल हे सगळे कंपनीचे फायदे झाले. पण या पासून आपला काय फायदा किंवा नुकसान होऊ शकतं का?

चला तर आता आपण पाहू याचा आपल्याला काय फायदा आणि नुकसान होईल. फायदा आपण म्हणू शकतो की कंपनी फंडामेंटलि स्ट्रॉंग असेल. त्या कंपनीला स्वतःच्या शेअर्स प्राईज वाढवायचे असेल किंवा कंपनीचा परफॉर्मन्स अजून वाढवायचा असेल. चांगल्या फिगर्स दाखवायचे असतील तर त्या केसमध्ये जर कंपनी अशा काही गोष्टी करत असेल तर आपल्यासाठी सुद्धा ठीक आहे. कारण ऑलरेडी जर तुम्ही इथे शेअर बाय केलेल्या असतील तर ते पुन्हा सेल न करता होल्ड करायचे.

आणि जसा कंपनीचा परफॉर्मन्स वाढेल तसा तुमचा परफॉर्मन्स सुद्धा वाढेल. तुमच्या शेअरची प्राईस सुद्धा वाढेल. म्हणून जेवढे शेअर ची प्राईज वाढेल तेवढा आपला फायदा होईल. अगदी सोपे आहे. पण यातून नुकसान काय होईल? समजा एखादी लॉस मेकिंग कंपनी असेल. पैशाची कमतरता असेल किंवा जे काही कंपनीकडे पैसे आहेत त्याला कुठे इन्व्हेस्ट करायचं याच्या साठी काही नवीन आयडी अजुन असतील. नवीन प्लॉन असतील तर त्या केसमध्ये ही कंपनी पुन्हा बाय बॅक करते.

अशा कंपनीचा फ्युचर थोडं कठीण असतं. कारण फ्युचर ग्रोथ नसेल, काही नवीन आयडियाज नसतील, नवीन प्रोजेक्ट नसतील. प्रोडक्शन वाढणार नसेल, सर्विसेस जे काही त्या कंपन्या देत असेल. ती जर सर्विस त्यांची एक्स्पान्ड होत नसेल. तर त्या केसमध्ये अशी बाय बॅक करण्याचे चान्स असतात. ज्यामुळे कंपनीची ग्रोथ होत नाही. विनाकारण आपले पैसे तेथे अडकून राहतात. अशा कंपन्यांमध्ये त्यावेळी इन्व्हेस्ट करू नका.

बऱ्याच वेळा काय होतं बायबॅक करण्याच्या आशेपोटी कंपनीने इमर्जन्सी फंड सेव्ह केले होते, ते फंड युटिलाईज करते. ज्यावेळी असे इमर्जन्सी फंड संपतात त्यावेळी कंपनीला खूप मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची शक्यता असते. त्यामुळे एक गोष्टी लक्षात ठेवा. जर कंपनी त्यांचे स्टॉक बायबॅक करत असेल तर त्यावेळी तुम्हाला सावध राहणे गरजेचे आहे.

एक तर तुमचा प्रॉफिट होऊ शकतो किंवा लॉस सुद्धा होऊ शकतो. जर कंपनी फंडामेंटलि स्ट्रॉंग असेल, कंपनी चांगली असेल, प्रमोटर चांगला असेल, प्रत्येक गोष्ट चांगली असेल. तर डेफिनेटली तुम्ही तिथे पोझिशन होल्ड करू शकता. अजून पुढे कंटिन्यू करू शकता. पण जर कंपनी फंडामेंटली वीक असेल, जर कंपनीचे प्रमोटर चांगले नसतील, जर तुमच्या मनामध्ये काही शंका येत असेल. तर अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करु नका.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.